तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 6 October 2019

इंजेगाव मध्ये भाजपाला खिंडार असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील इंजेगाव येथे भाजपाला खिंडार पडले असून, भाजपा मधुकर रामराव कराड, सुधाकर रामराव कराड, बाळासाहेब रामराव कराड, गुरू रामराव कराड, हनुमंत कुंभार  यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. परळी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आज तालुक्यातील इंजेगाव गाव येथील भाजपाचे असंख्य कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षांचा रुमाल गळ्यात टाकुन स्वागत करण्यात आले.


  आज शनिवार रोजी जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, राष्ट्रवादीचे युवा नेते रामेश्वर मुंडे, ज्येष्ठ नेते दिलीप कराड, अमोल कराड, मुक्ताराम गवळी, प्रल्हाद कराड, मुरलीधर कराड, हरिभाऊ कराड, बंटी कराड, लालू कराड, शाम कराड, विष्णु कराड व गावातील ग्रामस्थ व तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. इंजेगाव येथील गेल्या तीस वर्षांपासुन पक्षात काम करत होते. येथील पदाधिकार्‍यांच्या प्रवेशामुळे भाजपाला खिंडार पडले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे जड झाले आहे. विधानसभा निवडणूकीत धनंजय मुंडेंना आप-आपल्या गावातून मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकार्‍यांनी बोलून दाखवला. 

No comments:

Post a comment