तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

अपुर्‍या पावसाअभावी परळी तालुक्यातील कांदा उत्पादन घटणारपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
संपुर्ण महाराष्ट्रात नाशिक नंतर प्रसिध्द असलेल्या परळी तालुक्यातील कांद उत्पादक मांडवा गावातील कांदयाचे उत्पादन अपुर्‍या पावसाअभावी घटणार असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी विठ्ठलराव साखरे यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मांडवा या गावात कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. दरवर्षी सुमारे सातशे ते आठशे टन कांदा या गावातुन उत्पादीत होतो. त्यामुळे शेतकर्‍यांनाही चांगला आर्थिक नफा यातुन मिळतो. परंतु यावर्षी पावसाने दगा दिल्याने पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. कांदा हे पिक पाण्यावर अवलंबुन आहे. त्यामुळे पाणीच नाही. तर कांदा उत्पादन कसा होणार त्यातच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद करुन  शेतकर्‍यांची कंबरडे मोडले आहे.
दरम्यान या दुष्काळी परिस्थतीत किमान कृषी विभागाने तरी शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यायाला पाहिजेत. परंतु कृषी विभागाचे अधिकारी अद्यापही आमच्या गावात फिरकले नसल्याचे विठ्ठलराव साखरे, नाथराव फड म्हणाले.

No comments:

Post a Comment