तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

एमआयएमचे अली खान यांचा मतदारांच्या भेटीगाठीवर भरपरभणी / प्रतिनिधी
  परभणी विधानसभा मतदार संघातील एमआयएमचे अधिकृत  उमेदवार अली खान मोईन खान यांच्या प्रचारला सुरुवात झाली असून अली खान यांच्या प्रचारार्थ ९ आॅक्टोबर रोजी बॅ.खा. असदोद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा दर्गा रोड येथे घेण्यात आली या सभेत हजारोंच्या संख्येने नागरीकांची उपस्थिती होती. या नंतर अली खान यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला असून  शहरातील अपना कॉर्नर भागात मतदारांशी संवाद साधण्यात आला. 
   परभणी विधानसभा मतदार संघातील एआयएमआयएम  चे अधिकृत उमेदवार अली खान मोईन खान हे वेगळ्या पध्दतीने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यांमध्ये  शहरातील सराफा बाजार, गांधी पार्क, एकबाल नगर, स्टेशन रोड,गुलशनबाग आदी ठिकाणी भेटी देऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. तसेच त्यांना असणाºया विविध समस्यांची विचारपूस करून त्या सोडविण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे सांगितले. शहरासह तालुक्यातील ,जांब, पारवा, धर्मापुरी, आसोला, खानापूर आदी गावांना भेटी दिल्या. यावेळी गावागावांतील ग्रामस्थ, मतदारांच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. तसेच नागरिकांनी त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर अली खान मोईन खान यांनी या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे सांगीतले. तसेच येणाº्या काळात आपण राजकारणाच्या माध्यमातून विविंध सामाजिक कार्य करून जनसामान्यांची सेवा करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरीकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment