तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

परळी विधानसभा मतदारसंघात पंकजाताईचा सुसंस्कृत चेहरा आणि पाच वर्षात केलेला विकास हाच मुद्दा प्रभावी ; सामान्य जनतेने केले लेकीच्या विजयावर शिक्कामोर्तब!परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणुक नेहमीप्रमाणे अटीतटीची वाटत असली तरी यंदाचं राजकिय चित्र आणि मतदारांत झालेली वैचारिक जागृती वेगळ्या स्वरूपाची आहे. भाजपा महायुतीच्या उमेदवार ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचा सुसंस्कृत आणि सकारात्मक राजकिय नेतृत्वाचा चेहरा आणि त्यांनी केलेला विकास हेच फार मोठं बलस्थान मतदारांच्या मनात निर्माण झालं आहे. सामान्य लोकांना अभिप्रेत असणारी भुमिका या मतदारसंघात मंत्री पंकजाताईनं सतत घेतल्याने त्यांना पुन्हा एकदा निवडुन देण्याचा जणु काही मतदारांनी निर्धार केल्याचं चित्र शहरी आणि ग्रामीण भागात दिसत आहे.नेहमीपेक्षा परळी शहरात यंदा त्यांच्या नेतृत्वाबाबत प्रचंड सहानुभुती पसरलेली दिसत आहे.

राजकारणातल्या नेतृत्वाकडे नेहमीच मतदारराजा हा वेगवेगळ्या दृष्टीने आणि चष्म्यातुन पाहत असतो. अलीकडच्या राजकिय व्यवस्थेत सामान्य लोकांना सुसंस्कृत तथा ऱ्हदयस्थ भाव असलेला आणि सामाजिक जाणिवतेने संवेदनशीलपणे राजकारण करणारा चेहरा हवा असतो. अशा नेत्यांच्या पाठीमागे सामान्य जनता खंबीरपणे उभा राहते. जो लोकप्रतिनिधी सकारात्मक भुमिका घेवुन केवळ विकासाचं राजकारण करतो असेच लोक समाजातील सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आवडतात. या मतदारसंघात नेमकं हेच घडत असुन उमेदवार पंकजाताईचा चेहरा हीच फार जमेची बाजु आहे. पाच वर्षात त्यांनी मतदारसंघाचा केलेला चौफेर विकास आणि हे करताना स्वच्छ आणि पारदर्शक राजकारण याचाही विचार वैचारिक पातळीवर मतदारसंघात सामान्य जनता बोलुन दाखवत आहे. विकासाचं राजकारण करताना पंकजाताईनं या मतदारसंघातील सामान्य जनतेला आपलं दैवत समजुन मागच्या पाच-दहा वर्षात त्यांची सेवा केली आहे.विकास काय असतो?याची ओळख त्यांनी खेड्यापाड्यातील माय-बाप जनतेला दाखवुन दिली.महिला बचत गटाच्या माध्यमातुन या वर्गसमुहाची आर्थिक क्रांती त्यांनी केल्याने प्रत्येक ठिकाणी महिला वर्गाचा उत्साह फार मोठा दिसुन येतो.विकास कामे करताना कुठल्याही प्रकारचं राजकारण त्यांनी केलं नाही. अगदी राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायती असतानाही करोडो रूपये विकासकामासाठी निधी त्या ग्रामपंचायतीला दिला.ना सुडाचं राजकारण ना द्वेषाचं राजकारण.ज्यामुळे विरोधकसुद्धा आपले पक्ष सोडुन केवळ अशा नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी भाजपवासी होवु लागले.कॉंग्रेसमधुन प्रा.टि.पी.मुंडे पक्षात आले. येण्यामागे हा त्यांचा असाच दृष्टीकोन होता.निळकंठ चाटेसारखा युवकही विकासाच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी भाजपात्ा आला.सांगायचं तात्पर्य निवडणुक अटीतटीची वाटत असली तरी गेल्या तीस वर्षात या मतदारसंघात निवडणुकीच्या काळात अशाच प्रकारची चर्चा होते हा इतिहास आहे.स्व.गोपीनाथराव मुंडे असताना देखील अशा प्रकारची चर्चा व्हायची. लोकसभा निवडणुकीतही डॉ.प्रितमताई मुंडेंना मतदारसंघात मताधिक्य मिळणारच नाही अशी चर्चा विरोधकांनी घडवुन आणली.मात्र नेहमीच भ्रमाचा भोपळा मताधिक्यानंतर फुटतो. त्याचं कारण या मतदारसंघात अठरापगड जातीधर्माचे लोक वैचारिक पातळीवर ना.पंकजाताई मुंडेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहताना दिसतात. त्यांचा सुसंस्कृत चेहरा आणि केलेला विकास हाच या निवडणुकीत कळीचा मुद्दा सामान्य जनतेसाठी महत्वाचा ठरत आहे. पंकजाताई हे नेतृत्व आता भविष्यात मोठं होणार त्यामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे नेतृत्व सांभाळण्यासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात सकारात्मक बाजु प्रभावीपणे पुढे येताना दिसत आहे.

No comments:

Post a comment