तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 October 2019

. डोणगांव सारपंचपदाचे भिजत घोगडे कायमचं!. नागपूर खंडपीठाने दिलेल्या अंतरिम आदेशाने मत मोजणी प्रक्रिया स्थगित.
. डोणगांव येथील जनतेच्या उत्सुकतेचा हिरमोड.

डोणगांव १४
डोणगांव ग्राम पंचायत नेहमी प्रमाणे या वेळेसही चर्चेतच राहिली येथील सरपंच पदाच्या निवडणुकीच्या निकालाचे भिजत घोंगडे मागील १५ महिन्या जसेच्या तसेच आहे अखेर १५ अक्टोबर रोजी निकाल लागणार होता मात्र यावर नागपूर खंडपीठात प्रभारी सरपंच याने मागितलेल्या दाद नुसार पुढील आदेशा परियानंत निवडणूक निकाल राखून ठेवला
     डोणगांव येथील प्रभारी सरपंच जोईप खान यांनी नागपूर खंडपीठ मध्ये याचिका दाखल केली त्यावर उंचच न्यायालयाने याचिकेत मागणी केलेल्या विनंती कलमा मधील कलम दोन मध्ये मागितले नमूद साह्य अंतरिम आदेशाने मंजूर केले असून पुढील सुनावणी ४ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे परत ग्राम पांच्यातचा कारभार प्रभारी कडेच राहील असे दिसून येत आहे 
   डोणगांव येथील सरपंच पदाचे निकाल आज लागणार त्यामुळे येथील जनतेची उत्सुकता शिंगेला पोचली होती मात्र अत्ता यासाठी न्यायालयाच्या पुढच्या आदेशाची वाट पाहावी लागणार एवढे मात्र खरे

No comments:

Post a comment