तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

भाजपाने बळजबरीने फसवणूक करून प्रवेश घेतलेले लेंडेवाडीचे कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीच्या स्वगृही परतले
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.11............ परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक अवघड जावू लागली म्हणून पाया खालची वाळू घसरलेल्या भाजपाने आता वातावरण निर्मितीसाठी कार्यकर्त्यांचे खोटे प्रवेश सोहळे सुरू केले असून, हे कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू लागल्याने भाजपचे पितळ उघडे पडू लागले आहे.

लेंडेवाडी, इंदिरानगर तांडा येथील काही कार्यकर्त्यांना 4 दिवसांपूर्वी फसवणूक करून बळजबरीने भाजपामध्ये प्रवेश करायला लावला. मात्र मनाने राष्ट्रवादीतच असलेल्या या कार्यकर्त्यांनी 4 दिवसातच आपल्या स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतण्याचा निर्णय घेतल्याने भाजपाची चांगलीच गोची झाली आहे. 

लेंडेवाडी इंदिरानगर तांडा येथील भाजपचे बुथ प्रमुख भुजंग जाधव, कृष्णा राठोड, गणेश राठोड, रावसाहेब राठोड, श्रावण चव्हाण, विलास चव्हाण, दिलीप जाधव, भगवान चव्हाण, संजय चव्हाण, राहुल जाधव, राजेभाऊ राठोड, ज्ञानोबा राठोड, सचिन राठोड, पाताळ राठोड, बबन चव्हाण, सतिश चव्हाण, बाळू चव्हाण, बाळू पंडीत चव्हाण, दिनेश राठोड,  गणेश राठोड, राहुल राठोड, किरण चव्हाण, विनोद जाधव, अनिल चव्हाण, सुनिल चव्हाण, रोहिदास चव्हाण, राजेभाऊ चव्हाण, मोहन चव्हाण, संतोष राठोड, सुनिल राठोड, अर्जुन चव्हाण, बिभिषण चव्हाण, संजय राठोड, सुनिल राठोड, अनिल राठोड, रणजित चव्हाण, परशुराम राठोड, नरसिंग राठोड, अजय चव्हाण, विजय चव्हाण, विकास चव्हाण, आकाश चव्हाण, आकाश ज्ञानोबा राठोड, सुभाष जाधव, आभास चव्हाण, परशुराम पवार, सचिन चव्हाण, सुधाकर चव्हाण, संजय चव्हाण, महादेव राठोड, दिपक जाधव आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

No comments:

Post a comment