तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 28 October 2019

परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या शक्तीकुंज वसाहतीत रंगली दिवाळी पहाटच्या सुमधुर गीतांची मैफिल स्वरनक्षत्रने केली स्वरांची बरसात
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
सोमवार दि.28 ऑक्टोंबर 2019 रोजी शक्तीकुंज वसाहत येथील के. जी.हॉल येथे विद्युत केंद्रातर्फे दिवाळी पहाटचे उत्सवी आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्य अभियंता श्री. एन एम शिंदे,  उपमुख्य अभियंता श्री , किशोर राऊत , अधीक्षक अभियंता श्री.डी.जी. इंगळे ,श्री डी.टी.खिल्लारे, श्री हिम्मतराव अवचार, श्री श्याम राठोड, श्री नरवाड, श्री. सी.आर. होळंबे  हे प्रमुख अधिकारी व त्यांचे कुटुंबीय  यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 मराठी-हिंदी गीतांच्या सुमधुर मैफिलीने श्रोत्यांची मने जिंकून घेतली. या संगीत मैफिलीचे सादरकर्तेे, श्री कृष्णा बळवंत,सौ. बळवंत व  स्वरनक्षत्र चमूने  मराठी-हिंदी गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केले व आपल्या बहारदार सुत्रसंचलनाने  श्री. सुनिल काळे यांनी उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमात  श्री खिल्लारे, श्री.अवचार व  श्री.बिक्कड  यांनीही  एकेक गीत सादर करून कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली.या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख श्री संतोष देशपांडे, डि.डि. कोकाटे , श्री ओव्हाळ , श्री सुरेश गर्जे विविध संघटनांचे पदाधिकारी श्री अरूण गित्ते,श्री. हरीरामजी गीते,श्री. संदीप पाटील , श्री. ज्ञानोबा माऊली फड  महानिर्मिती कामगार संघटना व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे सर्व अधिकारी  श्री. सुनील काळे,  श्री सुधाकर लोखंडे व श्री. मुरलीधर शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.दरवर्षी अश्याच कार्यक्रमाचे आयोजन व्हावे अशी भावना याप्रसंगी शक्तीकुंजवासियांनी  व्यक्त केली.

No comments:

Post a comment