तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

विधानसभा निवडणूक मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

- जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
•         ९ लाख ५८ हजार मतदार बजाविणार हक्क
•         दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

वाशिम, दि. १९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले. 
जिल्ह्यात ५ लाख ४५१ पुरुष, ४ लाख ५८ हजार ९० महिला व १० तृतीयपंथी असे एकूण ९ लाख ५८ हजार ५५१  मतदार आहेत. यामध्ये ११ हजार २९० दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सोमवारी १ हजार ५२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन या प्रमाणे जिल्ह्यात ०६ ‘सखी मतदार केंद्रे’ स्थापन केली जाणार आहेत. तसेच प्रत्येक मतदारसंघात एक आदर्श मतदान केंद्र स्थापन केले जाईल. मतदानादिवशी जिल्ह्यातील १०५ मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे 'वेब कास्टिंग' होणार आहे. या मतदान केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’द्वारे निवडणूक यंत्रणेची थेट नजर राहणार आहे, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी म्हणाले, मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, स्वयंसेवक आदी किमान सुविधा पुरविण्यात येणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग बांधवांसाठी मोफत वाहतूक व्यवस्था, मदतीसाठी स्वयंसेवक नियुक्त केले जाणार आहेत. लहान मुलांसह मतदानास येणाऱ्या महिला मतदारांच्या मुलांकरिता मतदान केंद्रांवर पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी १ हजार ७८८ बॅलेट युनिट आणि १ हजार ३६० कंट्रोल युनिट तर सुमारे १ हजार ३९९ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे ४ हजार ६३६ लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. 
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व १०५२ मतदान केंद्रांवर २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजतापासून ते २१ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत ५ व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना एकाच ठिकाणी जमाव करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा
मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे. तसेच मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाईन-१९५०’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मतदारांना माहिती मिळवता येईल. मतदारांसाठी निवडणूक आयोगाने ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ ही सुरु केले आहे.
मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र
मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र नसेल अशावेळी पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र अथवा आधारकार्ड यापैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा : जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
मतदार जागृतीसाठी जिल्ह्यात ‘स्वीप’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २१ ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क

No comments:

Post a comment