तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

नेहरू चौक भागात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार! ; युवानेते निरज देशमुख यांचा असंख्य युवक, महिला कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश, ना. पंकजाताई मुंडे यांचे हात बळकट करण्याचा निर्धार

 प
रळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
     राष्ट्रवादी काँग्रेसला शहराच्या नेहरू चौक भागात खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि संभाजी सेनेचे तालुकाध्यक्ष निरज देशमुख यांनी शेकडो युवक आणि महिला कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे हात बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वांचे प्रज्ञाताई मुंडे यांनी पक्षात स्वागत केले.
      राष्ट्रवादी काँग्रेस केवळ जातीयवादी राजकारण करून विकासाला खिळ घालण्याचे काम करीत आहे. ना. पंकजाताई मुंडे यांचे भवितव्य उज्ज्वल असुन त्यांना अडचणीत आणण्याच्या प्रयत्नाला कंटाळून आम्ही भाजपात प्रवेश करीत असल्याचे निरज देशमुख यांनी सांगितले. यावेळी निरज राजे देशमुख यांच्यासोबत शेख शकील, अनिकेत तिळकरी, प्रसाद महाजन, अनंता पवार, संदीप धोकटे, सचिन चिल्ले, गजानन वानखेडे, फकरोद्दीन शेख, किशोर गायकवाड, सौरभ साबणे, बालाजी बावने, सुनील बावने, सय्यद गयाज, शेख हबीब आदींसह शेकडो युवक आणि महिला कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
    आगामी काळात पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे हात बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. सर्व कार्यकर्त्यांचे प्रज्ञाताई मुंडे यांनी पक्षात स्वागत केले.
  यावेळी पक्षाचे राज्य चिटणीस राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, युवानेते निळकंठ चाटे, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभूते, बंडू कोरे, अभिजित गुट्टे आदींसह अनेक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment