तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

कोद्री येथील उच्चशिक्षीत युवा शेतकरी श्याम भारसाकळे याची शेती व्यसायात भरारी संबंधीत अधिकारी कडून पिक पाहणी संपन्न


संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील कोद्री येथील उच्च शिक्षीत  युवा शेतकरी श्याम विनायक भारसाकळे याने नोकरी न करता शेतीव्यवसाय  करण्याची गाठ मनाशी बांधुन स्वताला झोकुन देत शेतीत जातीने लक्ष दिल्याने  स्वावलंबी बनुन डबघाईत आलेल्या शेती व्यवसायात उतंग भरारी घेतली नव मल्लीका कंपनीचे अधिकारी व्यंटराव, फुडकर यांच्या मार्गदर्शनात कोद्री येथील युवा शेतकरी श्याम विनायकराव भारसाकळे यांनी ४ एकरात उन्हांळी शेतीची मशागत करुन पहिल्या नक्षत्रातच नव मल्लीका बी टी कपाशीचा पेरा केला नियमीत  रासायनिक खत  फवारणी नींदण वखर केल्याने दर्जेदार कपाशी पिक बहरले त्यामुळे याची दखल घेत  अधिकारी व्यंकटराव , फुंडकर यांनी कोद्री शिवारातील युवा शेतकरीच्या शेतात भेट देऊन पिक पाहणी केली व संबंधीत युवा शेतकरीला सह उपस्थीतांना मार्गदर्शन करून   योग्य वेळी योग्य गरजेनुसार कपाशी पिकाची काळजी घेतल्याने एकरी १५ किंटल कपाशी उत्पादन होणार असल्याची हमी देत उच्च शिक्षित युवा शेतकरी शेतीकडे वळल्याने कौतुक केले यावेळी शिवा पाटील, योगेश पाटील, सुभाष पाटील , संजय वाकळे, डिगांबर पाटील सह कळमखेड, जस्तगाव, आवार, उकळी आस्वंद कुंदेगाव पातुर्डा परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थीत होते

No comments:

Post a Comment