तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 23 October 2019

परळीची बाजारपेठ दिवाळीनिमित्त सजली आकाश दिव्यांनीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांनाच 25 ऑक्टोंबर पासुन दिवाळीचा सण सुरु होत आहे. दिवाळीनिमित्त परळीच्या बाजारपेठेत विविध रंगाच्या व विविध आकाराच्या आकाश दिव्यांनी बाजारपेठ सजल्याचे दिसत आहे. नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे.
नुकतीच महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. 24 ऑक्टोंबर रोजी निकाल घोषित होणार आहे. याच दरम्यान दिवाळीचा सण 25 ऑक्टोंबर पासुन सुरु होत आहे. दिवाळीसाठी घरोघरी लावले जाणार्‍या आकाश दिव्यांची व्यापार्‍यांनी विक्रीसाठी जोरदार तयारी केली आहे. विविध प्रकारचे आकर्षक व चितवेधक आकाश दिवे बाजारात ग्राहाकांचे लक्षवेधून घेत आहेत.
शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्यामुळे विद्यार्थी व पालकांचीही बाजारात दिवाळी सणाच्या खरेदीसाठी गर्दी होतांना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment