तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 26 October 2019

उतणार नाही मातणार नाही, जनसेवा आणि जन संघर्षाचा तुमचा वारसा सोडणार नाही ; धनंजय मुंडे झाले स्व.मुंडे साहेब, स्व.पंडितअण्णांच्या समाधीसमोर नतमस्तक

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.25.......... उतणार नाही मातणार नाही, तुम्ही दिलेला जनसेवेचा आणि जन संघर्षाचा वारसा सोडणार नाही, असा निश्चय करत विधानसभेवर दिमाखदार विजय मिळवणारे धनंजय मुंडे आज स्व.गोपीनाथराव मुंडे, स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर नतमस्तक झाले.

परळी विधानसभा मतदारसंघातून दैदिप्यमान विजय संपादन केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या गोपीनाथगड या समाधीस्थळी जाऊन नमन केले, तसेच वडील स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊनही त्यांनी नमन केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीही त्यांनी समाधीस्थळी जात आशीर्वाद घेतले होते, त्यानंतर विजयानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी या दोन्ही ठिकाणी जाऊन नमन केले. 

स्व.मुंडे साहेब आणि स्व.अण्णांच्या आठवणीने भावूक होताना त्यांनी उतणार नाही मातणार नाही, स्व.मुंडे साहेब आणि स्व.अण्णांकडून आपल्याला मिळालेला जनसेवा करण्याचा आणि जन संघर्षाचा वारसा सोडणार नाही, असे सांगितले. 

यावेळी त्यांच्या समवेत कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती सुर्यभान मुंडे, संचालक माणिकभाऊ फड, शिवाजीराव सिरसाट, विश्वंभर फड, पं.स.उपसभापती पिंटू मुंडे, बालाजी गित्ते, वाल्मिक गोल्हेर, अतुल मुंडे,  सोमनाथ फड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a comment