तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

परळीची मान राज्यात अभिमानाने उंचावेल असे काम करू - ना. पंकजाताई मुं
औरंगाबाद येथे परळीतील आपल्या माणसांशी संवाद ; मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिला एकमुखी पाठिंबा 

विकासात अडथळे आणण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न हाणून पाडा

औरंगाबाद (प्रतिनिधी) :- दि. १० ----आम्ही परळी मतदार संघातील आहोत असे सांगताना तुमची मान अभिमानाने उंचावेल असे काम करीन, परळीच्या विकासाची अनेक स्वप्ने मला साकारायची आहेत, माझ्या भागातील सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळवून देणारे उद्योग उभारण्यासाठी मी काम करणार असुन यासाठी मला तुमचे आशिर्वाद द्या अशी साद राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा भाजपा महायुतीच्या उमेदवार  ना. पंकजाताई मुंडे यांनी येथील कार्यक्रमात बोलताना घातली. औरंगाबाद येथे स्थायिक परळीकरांनी ना. पंकजाताई मुंडे यांना एकमुखी पाठिंबा देत आमचे एकही मत राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार नाही असा शब्द उपस्थितांनी दिला.
      
परळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा - शिवसेना - रिपाइं - रासप - रयत क्रांती सेना महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी औरंगाबाद येथे स्थायिक परळीकरांशी "संवाद आपल्या माणसाशी" या कार्यक्रमांतर्गत मुक्त संवाद साधून हितगुज केले. यावेळी बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, परळी हा अतिशय भाग्यवान मतदार संघ आहे. १९८० पासुन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी परळीचे नावलौकिक वाढविणारे काम केले. आणि मला आता सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असून या संधीचे सोने करीत आहे. मी परळी मतदार संघात अनेक योजना राबवून विकासाला गती दिली आहे. तिर्थ क्षेत्र विकास, राष्ट्रीय महामार्ग, पंतप्रधान ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक, मुख्यमंत्री पेयजल योजना अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी आणुन विकास अगदी वाडी तांड्यापर्यंत पोंहचविला आहे. परळीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. असे सांगून आगामी काळात विकास आणखी गतीमान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परळीच्या विकासात अडथळे आणण्याचा प्रयत्न हाणून पाडा
------------------------------
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी आपल्या जनतेला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले. तोच वसा आणि वारसा पुढे चालवण्याचे काम मी करीत आहे त्यात काही लोक अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु आपल्या प्रेमाच्या ताकदीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडुन यशस्वी होईल आणि साहेबांच्या स्वप्नातील विकास मी प्रत्यक्षात करून दाखविल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
     परळी आणि परिसरातील भूमिपुत्रांना याच भागात रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून औद्योगिक वसाहत उभारणार असुन या भागात अनेक उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी विशेष योजना राबविणार असल्याचे सांगून तुम्हाला अभिमान वाटेल असे करणार असुन आपल्या गावाच्या विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी आपण मला आशिर्वाद द्या अशी साद ना. पंकजाताई मुंडे यांनी घातली.
     यावेळी मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, दिपक ढाकणे, शिवम घुले तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्ही तुमच्याच सोबत, राष्ट्रवादीला मत देणार नाही

दरम्यान, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत आमचे एकही मत राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार नाही अशी ग्वाही उपस्थितांनी दिली. आम्ही इकडे असलो तरी गावाकडे विकास होत असल्याचे आम्हाला माहिती आहे. आगामी काळातही आपणच विकास करणार आहात याची आम्हाला खात्री आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही प्रचंड मताधिक्य देणार असल्याच्या निर्धार व्यक्त केला.

No comments:

Post a Comment