तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

बरकतनगर भागात धनंजय मुंडेंच्या प्रचार फेरीस मोठा प्रतिसाद ; शास्त्रीनगर, नाथनगर भागातही प्रचार फेरीद्वारे आवाहन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.11............ परळी विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ बरकतनगर भागात आज काढण्यात आलेल्या प्रचार फेरीस मोठा प्रतिसाद मिळाला. 

उपनगराध्यक्ष अय्युबभाई पाठण, शहराध्यक्ष बाजीराम धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, काँग्रेस नेते वसंतराव मुंडे, शेख सिकंदर, फारूख खान, डॉ.कांबळे, जमील अध्यक्ष, साबळे सोब, शेख जुबेर, शेख कमरोद्दीन, शेख कलीम, आसेफ खान, महेमुदखान, सय्यद, आतिक भाई, शेख मुखीद, बाबुभाई, नशीरखान, निसार, शाकेर शेख, सुनेर खान, शारूख खान, बाबुराव, रईस, शेख मुखीद, बक्शभाई आदींसह आघाडीतील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरापर्यंत जावून धनंजय मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन करून त्यांना आवाहनपत्रक सुपूर्द केले. 

प्रभाग क्र.11 शास्त्रीनगर, नाथनगर भागातही धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी पाणी पुरवठा सभापती भाऊसाहेब कराड, शिक्षण सभापती संजय फड, योगीराज गित्ते, ज्ञानेश्वर होळंबे, पवन फुटके, जयदत्त नरवटे, अनंत ढोपरे, प्रदिप जाधवर, रोहित शेट्टे, जितेंद्र नव्हाडे, नितीने चने, धनराज गित्ते, विशाल उधनशिव, अतुल गडेकर, गणेश ढगे, अनिल कदम, पंकज शर्मा, योगेश स्वामी, महेंद्र, नागेश चोपडे, बालाजी निखे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments:

Post a comment