तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

परळीत दादागिरी करणारे भाजपात गेले; व्यापार्‍यांच्या केसालाही धक्का लागला तर माझ्या जीवाला धक्का - धनंजय मुंडे ; परळीच्या बाजारपेठेला गत वैभव प्राप्त करून देणे हेच माझे धेय


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.10...............  कधी काळी मराठवाड्यात नावलौकीक मिळवलेल्या परळीच्या बाजारपेठेला गत वैभव प्राप्त करून देणे हे माझे धेय आहे असे सांगून परळीत दादागिरी करणारेच आता भाजपात गेले आहेत, असा टोला लगावताना परळीच्या व्यापार्‍यांना काडीचाही त्रास होणार नाही, व्यापार्‍यांच्या केसालाही धक्का लागला तर माझ्या जीवाला धक्का असे मी समजेल असा विश्वास विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे यांनी दिला.

परळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या भागवत मंगल कार्यालयात बुधवार सायंकाळी झालेल्या व्यापार्‍यांच्या मेळाव्यात श्री.मुंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री पंडीतराव दौंड, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, डॉ.प्रदिप वांगीकर, प्रतिष्ठित व्यापारी गुलाबराव शेटे, देविदासराव कावरे, कचरूलाल वांगीकर, नागोराव देशमुख, प्रकाशराव टाक, विजयसेठ कुचेरीया, नंदकिशोर बियाणी, अभय वाकेकर, गोल्डीसेठ भाटीया, शंकरराव पेन्टेवार, मधुकरराव तांबट, केशवभाऊ बळवंत, किर्तीकुमार नरवणे, सुरेश मदनराव मुंडे, जी.एस.सौंदळे, रामेश्वर सारडा, भिकुलाल भन्साळी, बद्रीनारायण बाहेती, मनिष झंवर आदींसह शहरातील सर्व स्तरातील व्यापारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, कृ.उ.बा.समिती सभापती अ‍ॅड.गोविंद फड, उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी, वैजनाथराव सोळंके, जयपालशेठ लाहोटी, शंकर आडेपवार, सुरेश टाक, सुर्यभाननाना मुंडे, दिलीपदादा कराड, रमेश भोयटे, विजय भोयटे, अनिल मोदाणी, कमलकिशोर सारडा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

आपल्या भाषणात श्री.मुंडे म्हणाले मतदारसंघात सिंचन सुविधा, उद्योग उभारणी झाली तर त्याचा परिणाम बाजारपेठ विकसित होण्यावर होईल. त्यामुळे हेच प्रश्न घेवून मी निवडणुक लढवित असताना विरोधक दगड का विट असा प्रचार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दादागिरी करणारे दगड आता भाजपात गेले आहेत. काळजी करू नका परळीतल्या एकाही व्यापार्‍याच्या केसालाही धक्का लागणार नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, तुमची अडचण फक्त माझ्यापर्यंत येवू द्या तुमच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का असा विश्वास धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना दिला. 

व्यापार्‍यांना वेगवेगळ्या प्रसंगी केलेल्या मदतीचे उदाहरणे देवून या मातीतील माणसासाठी काम करणार्‍या माझ्यासारख्या सच्चा कार्यकर्त्याला एक संधी द्या, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून केले. 

धनंजय मुंडे हे विकासाभिमुख नेतृत्व असल्याने या निवडणूकीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन माजी मंत्री पंडीतराव दौंड यांनी केले. यावेळी सोमनाथअप्पा हालगे यांनी यावेळी केलेल्या भाषणात केले. प्रास्ताविक चंदुलाल बियाणी यांनी केले.  

No comments:

Post a Comment