तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 October 2019

भंडारी मंडळाच्या मालमत्तेचा परस्पर विक्रीचा प्रयन्त.....माजी सरचिटणीस सुधिर नागवेकर यानी तब्बल एक कोटी रूपयांची केली फसवणूक.....तर विद्यमान सरचिटणीस नितीन आंबेरकर खजिनदारांची दिशाभूल करुन बॅंकेतून आर्थिक व्यवहार करून लाखो रुपयांची उचल.....कार्यकारणीला विश्वासात न घेताच केली, आर्थिक व्यवहार.घोटाळ्या प्रकरणी.....

भंडारी मंडळाच्या मालमत्तेचा  परस्पर विक्रीचा प्रयन्त.....माजी सरचिटणीस सुधिर नागवेकर यानी तब्बल एक कोटी रूपयांची केली फसवणूक.....तर विद्यमान सरचिटणीस  नितीन आंबेरकर खजिनदारांची दिशाभूल करुन बॅंकेतून आर्थिक व्यवहार करून लाखो रुपयांची उचल.....कार्यकारणीला विश्वासात न घेताच केली, आर्थिक व्यवहार.घोटाळ्या प्रकरणी.....
२ आक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजता भंडारी समाजाच्या सभासदांच्या उपस्थितीत सरचिटणीस यांच्या वरील निलंबनाच्या कारवाईवर  शिक्कामोर्तब ..... करणेसाठी
भंडारी मंडळाच्या
सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे भंडारी मंडळाचे अध्यक्ष  अशोक साळसकर यांचे आवाहन.

मुबई विषेश ( प्रतिनिधी)

भंडारी मंडळ दादर याची 
परवानगी न घेता भंडारी मंडळाच्या मालमत्तेचा  परस्पर विक्रीचा बेकायदेशीर आर्थिक  व्यवहार करून विकास करार केला .यातुन तब्बल एक कोटी रूपयांची फसवणूक  माजी सरचिटणीस यांनी करून गैरव्यवहार केला,  या बाबत कायदेशीर तक्रार चॅरेटी कमिशनर यांच्या वरळी कार्यालयाकडे दाखल आहे, तसेच भंडारी मंडळ ,दादर यांच्या विद्यमान कार्यकारणिचे विद्यमान सरचिटणीस  नितीन आंबेरकर यांनी तर भाडेकरूंच्या सदनिकांचे बेकायदेशीर हस्तातरंण करताना कार्यकारणीला विश्वासात न घेताच आर्थिक व्यवहार तर केलेच पण खजिनदारांची दिशाभूल करुन बॅंकेतून आर्थिक उचल केली व भंडारी मंडळाची फसवणूक केली, या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात भंडारी मंडळाच्या वतीने भ़डारी मंडळाचे अध्यक्ष  अशोक साळसकर यांनी तक्रार दाखल केली आहे बुधवार दिनांक २ आक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता विश्वस्त व भंडारी मंडळाचे सभासद यांच्या उपस्थिती निलंबनाची कारवाईवर शिक्कामोर्तब  करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.  त्यामूळे या सभेकडे सर्वाचे लक्ष लागुन राहिले आहे
     भंडारी समाजाचा १०० वर्षे वारसा सांगणाऱ्या दादर येथील भंडारी मंडळ दादर येथील मालमत्तेचा पुर्नविकास करण्याचा घाट प्रथम भंडारी मंडळाचे माजी सरचिटणीस सुधीर नागवेकर यांनी घातला व भंडारी मंडळाच्या मालमत्तेचा पुर्नविकासाच्या करण्याच्या नावाखाली चॅरेटी कमिशनर यांची परवानगी न घेता भंडारी मंडळाच्या मालमत्तेचा  परस्पर विक्रीचा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करूनविकास करार केला . या व्यवहारात विकासक   साने वागळे यांची तब्बल एक कोटी रूपयांची फसवणूक करून माजी सरचिटणीस यांनी गैरव्यवहार केला,  या बाबत कायदेशीर तक्रार चॅरेटी कमिशनर यांच्या वरळी कार्यालयाकडे दाखल आहे,  भंडारी मंडळ ,दादर यांच्या विद्यमान कार्यकारणिचे विद्यमान सरचिटणीस नितीन आंबेरकर यांनी तर भाडेकरूंच्या सदनिकांचे बेकायदेशीर हस्तातरंण करताना कार्यकारणीला विश्वासात न घेताच आर्थिक व्यवहार तर केलेच पण खजिनदारांची दिशाभूल करुन बॅंकेतून आर्थिक उचल केली व भंडारी मंडळाची फसवणूक केली, या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात भंडारी मंडळाच्या वतीने भ़डारी मंडळाचे अध्यक्ष अशोक साळसकर यांनी तक्रार दाखल केली, शिवाजी पार्क  पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी या प्रकरणाची दखल घेऊन भंडारी मंडळाच्या कार्यालयाचा  व दफ्तराचा ताबा भंडारी मंडळाच्या अध्यक्षांकडे द्यावा अशी तंबी सरचिटणीस  नितीन आंबेरकर यांना दिली व सरचिटणीस  नितीन आंबेरकर यांच्या विरुद्ध चॅरेटी कमिशनर कडे रितसर तक्रार करावी अशी सूचना केली. भंडारी मंडळाचे अध्यक्ष  अशोक साळसकर यांनी भंडारी मंडळाचे सरचिटणीस नितीन आंबेरकर यांचा राजीनामा स्विकारून रितसर निलंबन केले असून बुधवार दिनांक २ आक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता विश्वस्त व भंडारी मंडळाचे सभासद यांच्या उपस्थिती निलंबनाची कारवाईवर शिक्कामोर्तब  करण्याचा निर्णय घेतला आहे.  भंडारी मंडळाचे दफ्तर व कार्यालयाचा ताबा निलंबित सरचिटणीस  नितीन आंबेरकर यांच्या कडून रितसर घेताना सर्व भंडारी मंडळाच्या सभासदांनी मोठ्या संख्येने या प्रसंगी दादर येथील भंडारी भंडारी म़डळाच्या सभागृहात उपस्थित रहावे अशी विनंती भंडारी मंडळाचे अध्यक्ष  अशोक साळसकर यांनी केली आहे .

No comments:

Post a comment