तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

यशवंत दहिफळे यांची तालुका कृषी अधिकारीपदी निवडपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- तालुक्यातील मौजे खोडवा सावरगाव येथील शेतकरी कुटुंबातील यशवंत बळीराम दहिफळे यांनी एमपीएससीद्वारे घेण्यात आलेल्या परिक्षेत घवघवीत यश संपादित केले. यामुळे त्याची तालुका कृषी अधिकारीपदी त्यांची निवड झाली आहे.
परळी तालुक्यातील मौजे खोडवा सावरगाव येथील शेतकरी बळीराम दहिफळे यांनी प्रतिकुल परिस्थितीत मुलगा यशवंत दहिफळे यांना एम. एस्सी.अ‍ॅग्रीपर्यंत शिक्षण दिले आहे. यशवंतनेही चिद्द व चिकाटीने परीक्षेत यश मिळवले. यशवंत यापुर्वीही पीएसआय, एसआयटी, राज्यसेवा, वनपरिक्षेत्र आदि स्पर्धा परिक्षा दिलेल्या आहेत. त्यांच्या यशाबद्दल वैभव दहिफळे, चंद्रकांत बाल्टे, विष्णु दहिफळे, गणेश दहिफळे, संतोष दहिफळे सह आदींसह खोडवा सावरगाव येथील ग्रामस्थांनी यशवंत दहिफळे यांचे अभिनंदन केले आहे. यशवंतचा हा आदर्श ग्रामिण भागातील इतर विद्याथ्यार्ंंनी घेतल्यास तेही उच्च पदावर पोहोंचू शकतात. 

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment