तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

पराभवाच्या भितीने पाया खालची वाळू घसरलीपंकजाताईंची जीभ घसरली ; धनंजय मुंडेंचा

दुष्ट राक्षस म्हणून उल्लेख परळीकरांमध्ये संतापाची लाट

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  पराभव दिसू लागल्याने परळी मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची जीभ घसरली असून, राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा त्यांनी दुष्ट राक्षस असा उल्लेख करत जाहीर सभेतून अपमानजनक भाष्य केल्याने परळीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 24 तास जनतेसाठी राबणारा, लोकांना पाणी देणारा माणूस देवदूत असतो, राक्षस नाही, हजारो बहिणींचे कन्यादान केल्याचे पुण्य ज्याच्या पाठीशी आहे, त्यांचा असा उल्लेख करणार्‍यांचा परळीची जनता तिव्र शब्दात निषेध करू लागली आहे. 

शुक्रवार परळीत झालेल्या एका सभेत पंकजाताई मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा दुष्ट राक्षस असा उल्लेख करत या राक्षसाच्या तोंडाला जॅमर बसवा, असे भाषण केले. हे भाषण ऐकुण उपस्थित भाजपा कार्यकर्ते ही अस्वस्थ होवून ताई हे काय बोलत आहेत असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर उमटले. अनेकांनी तेथेच अशा वक्तव्याची नाराजी व्यक्त केली. वर्तमानपत्रात आज या संबंधी बातम्या प्रसिध्द होताच शहरात संतापाची लाट उसळली असून, ताई पातळी सोडू नका असा वडीलकीचा सल्ला अनेकांनी त्यांना दिला आहे. 

परळीच्या जनतेसाठी तुम्ही भलेही विकास केला नसेल, मात्र सांगण्यासाठी काही नाही म्हणून विरोधकांना राक्षस म्हणणे ही कोणती संस्कृती ?  कोणते संस्कार ? आज स्व.गोपीनाथराव मुंडे हे आज हयातीत असते तर त्यांनाही हे आवडले नसते, एकीकडे धनंजय मुंडे आपल्या भाषणात ताईंविषयी बोलताना आमच्या बहिणबाई, आमच्या ताईसाहेब असा आदरार्थी उल्लेख करतात. दोन उमेदवारांमधील हा फरकही परळीकरांना आता दिसू लागला आहे.

No comments:

Post a comment