तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

राष्ट्रीय चर्चासत्रातून मूल्य निर्मीती होते. प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन


                       
तेजज हे
डलाईन्स प्रतिनिधी 
सोनपेठ : येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व हिंदी विभाग यांच्याकडून भारतीय सामाजिक शास्त्रे संशोधन संस्था(ICSSR) प्रायोजित एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक 5 आक्टोबर 2019 रोजी  करण्यात आले होते.  या चर्चासत्राचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे   प्र .कुलगुरू मा. डाॅ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, "आज समाजात नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे.याबरोबरच आपली जुनी सामाजिक मूल्ये जपणे  आवश्यक आहे. भारतात प्राचीन काळापासून चालत आलेल्या मानवी मूल्यांची जपणूक होण्यासाठी अशा राष्ट्रीय चर्चासत्राची मदत होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व्यंकटराव कदम हे होते. तर प्रमुख उपस्थितीत हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम, व्यवस्थापन समिती सदस्य  व उपप्राचार्य रमाकांत घाडगे , प्राचार्य वसंत सातपुते , समन्वयक डाॅ.एम.डी.कच्छवे व डाॅ .एस.ए.वडचकर हे उपस्थितीत होते .
             'सोशल मीडियाचा समाजावरील प्रभाव' या विषयावर एकदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे बीजभाषण महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक व दैनिक लोकसत्ता चे परभणी जिल्हा प्रतिनिधी मा. आसाराम लोमटे यांनी केले. प्रिन्ट मिडिया पासून ते सोशल मिडिया पर्यंतचा प्रवास सांगून आज सोशल नेटवर्किंग मुळे समाजात सकारात्मक व नकारात्मक परिमाण झाले आहेत असे म्हटले . 
    'भारतीय समाज और विकलांग(दिव्यांग) विमर्श' या विषयावर एकदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे बीजभाषण हिंदीतील जेष्ठ साहित्यिक डाॅ. महेंद्रकुमार ठाकूरदास यांनी शारिरीक विकलांगतेपेक्षा मानसिक विकलांगता समाजासाठी हानिकारक आहे असे म्हटले.  
          या पार्श्वभूमीवर देशाच्या विविध भागातील संशोधकांनी  आपले शोध निबंध सादर  केले. या चर्चासत्रासाठी दोनशेहून अधिक संशोधकांनी आपले शोधनिबंध पाठवून ते Peer reviewed जर्नल मध्ये प्रकाशित केल्या गेले.  या चर्चासत्राच्या  ऊद्घाटनावेळी शोधनिबंधाच्या स्मरणिका प्रकाशित करण्यात आल्या. याशिवाय डाॅ. मारोती कच्छवे यांचे  भारतीय बँकिंग व्यवस्थापन हे पुस्तकही यावेळी प्रकाशित करण्यात आले. 
           या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग संचालक डाॅ.शिवराज बोकाडे, माजी संचालक डाॅ. डी.डी.पवार, संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.ज्योतीताई कदम  व प्राचार्य वसंत सातपुते  यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 
            या राष्ट्रीय चर्चासत्राचा लाभ परिसरातील संशोधक विद्यार्थी अभ्यासक यांनी घेतला . या चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्रा. सखाराम कदम डाॅ. बापुराव आंधळे डाॅ..मुक्ता सोमवंशी व डाॅ. वनिता कुलकर्णी यांनी केले तर आभार  समन्वयक डाॅ. मारोतराव कच्छवे व डाॅ. संतोष रणखांब  यांनी मानले. या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment