तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

पंडीत मुक्त गेवराई हे मुंडे साहेबांचे स्वप्न - पालकमंत्री पंकजा मुंडे

  

सुभाष मुळे..
-----------------
गेवराई, दि. १० _ पंडीत मुक्त गेवराई हे स्व. मुंडे साहेबांचे स्वप्न आहे. चांगल्या माणसाच्या मागे मी ठामपणे उभी राहणार आहे. माझ्या मनात कसलीही शंका नाही. माझ्या पक्षाचे सगळे आमदार माझे सहकारी आहेत. परंतू, सगळ्यात नंबर एकचे काम आमदार लक्ष्मण अण्णांनी केले आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त मताने त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी येथे बोलताना केला आहे. 
       गुरूवार, दि. १० रोजी टाकरवण येथे भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार अॅड. लक्ष्मण पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार सुरेश धस, सुरेशराव हात्ते, मोहनराव जगताप, जेडी शहा, वाघमोडे, राजेंद्र भंडारी, रंजना नागरे, मनोज पाटील, शरद कचरे, सरपंच श्रीराम घाटूळ, मुरलीधर गरूड, पस सदस्य सिद्धार्थ नरवडे, बाळासाहेब खडके, अरूण चाळक यांची उपस्थिती होती.  
त्या बोलताना पुढे म्हणाल्या की, नितीमत्ता आणि प्रमाणीकपणा जोपासणाऱ्या आमदारांना साथ द्या, असे आवाहन करून त्यांनी सांगितले की, स्वार्थी पंडीत आमच्याकडे होते. परंतू त्यांनी भ्रष्टाचार करून तालुका खड्यात नेला. त्यामुळे जनतेने पंडीत मुक्त गेवराई चे स्वप्न मुंडे साहेबांनी पाहीले होते. आमदार पवार यांच्या रूपाने ते पूर्ण झाले आहे. आमदार पवार गरीबांसाठी शांत पण गडी जशात तसे वागणारा गडी आहे. त्यांनी काही मागितले नाही. पूर्वी रस्ते खराब होते. रस्ता कधी झालाच नाही. झाला फक्त कागदावर, असे बोगस रस्ते पंडीतांनी केल्याचे त्यांनी सांगितले.  आमदार पवार यांनी मतदारसंघात चांगले काम केले आहे. जिल्ह्य़ात आमदार म्हणून काम करणारे
माझे सहकारी चांगले आहेत. परंतू सगळ्यात नंबर एक चे काम आमदार लक्ष्मण पवार यांनी केल्याचे ना. मुंडे म्हणाल्या. मुंडे साहेबांनी गोदावरी परीक्रमा करून, शेतकरी बांधवांचे नेतृत्व करून त्यांचे अश्रू पुसले. आता 
शेतकर्‍यांच्या हिताचे सरकार आले आहे. शेतकरी अडचणीत आल्यावर, मी दुष्काळात सुध्दा  निधीचा पाऊस पाडण्याचे काम तुमची लेक म्हणून प्रमाणीकपणे केले असल्याचे शेवटी ना. पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

--------
पंडीतांना हद्दपार करा - सुरेशराव हात्ते
-------------------------------------------
पंडीतांनी कामे केली नाहीत, केवळ बिले उचलली. जनतेची  मुस्कटदाबी केली, दबाव आणला, त्यामुळे शेतकर्‍यांना दमबाजी करून राजकारण करणाऱ्या पंडीतांना हद्दपार करून आमदार पवार यांना विजयी करण्याचे आवाहन सुरेशराल हात्ते यांनी केले. 

---------
दोन्ही पंडीतांनी फोन केले - मोहनराव जगताप 
मला दोन्ही पंडीतांचे फोन आले. परंतू त्यांना सांगितले की, ज्यांचे मंगळसूत्र बांधले त्यांचेच काम करणार असून, महायुतीचे उमेदवार लक्ष्मण पवार यांना मनातून सहकार्य करणार आहे. 

--------
आमदार पवार चांगला माणूस - आमदार सुरेश धस
------------------------------------------------------------
चांगला आमदार ताईंनी दिला आहे. या माणसाला जपला पाहिजे. कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे आमदार पवार यांना निवडून दिलेच पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. सरकारच्या वतीने अनेक योजनेतून शेतकर्‍यांना मदत केली आहे. विरोधकांना हे पटत नसेल तर त्यांना कावीळ झाल्याची टिका करून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नक्कल केल्याने आमदार धस यांच्या भाषणाला मतदारांनी प्रचंड दाद दिली.
//
--------
दोन्ही पंडीतांनी मुंडे साहेबांना त्रास दिला - आमदार पवार
---------------------------------------------------------------------
छत्रपती कारखान्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन मोहन जगताप यांना करून, तुम्ही आदेश द्या मी तुमचा शब्द खाली पडू देणार नाही, असा शब्द दिला. मला मतदारसंघ समृद्ध करायचा आहे. मतदारसंघ सिंचनाखाली आणायचा प्रयत्न करत आहे. सरकार आणि पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पाचॆगाव - टाकरवन  रस्त्य्याचे १५३ कोटी रुपयांचे काम सुरू झाले आहे. हा रस्ता दर्जेदार करणार आहे. दोन्ही पंडीतांनी मुंडे साहेबांना त्रास दिला होता. मी कोणत्याही अटी घातल्या नाहीत, त्यांचा कार्यकर्ता म्हणून मुंडे साहेब मला स्वर्गातून आशीर्वाद देत असतील असे आमदार पवार यांनी सांगितले. टाकरवनचा रस्ता पून्हा करतो, मी शब्द देतो, मला राजकारणातून पैसे कमवायचे नाहीत. एकदा पून्हा संधी देण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजाभाऊ काळे यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार प्रल्हाद येळापुरे यांनी मानले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्

No comments:

Post a comment