तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 October 2019

भारतीय जनता पक्षाने व स्व मुंडे साहेबांच्या परिवाराने मला खूप काही दिलेमतदारसंघातील जनतेचा सदैव ऋणी- आ आर टी देशमुख

माजलगाव (प्रतिनिधी) :- 
माझा जन्म मोहया सारख्या खेडेगावात झाला लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले आईनी काबाडकष्ट करून वाढवले घरात अठरा विश्व दारिद्र्य तरीही स्व मुंडे साहेबांचा परिसस्पर्श झाल्याने आयुष्याचे सोने झाले,पक्षाने खूप काही दिले माजलगाव मतदार संघातील जनतेने जे प्रेम दिले त्या बद्दल सर्वांचा ऋणी राहील पक्षाने जो उमेदवार दिला आहे त्यांच्या पाठीशी सर्वांनी ठाम उभं रहावं असे प्रतिपादन आ आर टी देशमुख यांनी केले आहे 

विद्यमान आमदार आर टी देशमुख यांच्या तब्बेतीच्या कारणास्तव त्यांनी पक्षाकडे थांबण्याची विनंती करून इतर पर्याय शोधावे अस कळवलं होत त्या नंतरच रमेश आडसकर यांच्या उमेदवारी वर पक्षाने  शिक्कामोर्तब केले आज त्यांची उमेदवारी घोषित होताच आ आर टी देशमुखांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना विजया साठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आ देशमुखांनी त्यांना देण्यात आलेल्या संधी बद्दल भारतीय जनता पक्षाचे व स्व मुंडे साहेबांच्या परिवाराचे आभार मानले गेल्या 40 वर्षांपासून पक्षाचा कार्यकर्ता म्हणून वावरलो मुंडे साहेबांच्या, पंकजाताईंच्या परिसस्पर्शाने आयुष्याचे सोने झाले बालपण खूप कष्टात गेले कधी आमदार होईल असं वाटलंही नव्हत आयुष्यभर पक्षाचे इमानेइतबारे प्रामाणिक राहून कार्य केले त्या कार्याची पावती मला मिळाली असून मागील पाच वर्षात माजलगाव मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले मागील 2 वर्षा पासून तब्बेत साथ देत नसतानाही जनतेसाठी व कार्यकर्त्यासाठी उपलब्ध राहिलो मतदारसंघातील जनतेने जे प्रेम दिले त्या बद्दल सर्वांचा ऋणी असून आपल्या सर्वांच्या नेत्या ना पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व आणखीन फुलण्यासाठी,वाढण्यासाठी, शेवटच्या श्वासा पर्यंत कार्यरत राहणार असून जिल्ह्यातील भाजपाचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील अशी आशा त्यांनी व्यक्त करून सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे ,पत्रकारांचे, जनतेचे आभार मानले.

No comments:

Post a comment