तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

"आज बीड आया तो मेरे मित्र गोपीनाथजी की मुझे बहोत याद आयी।"; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भावनिक ट्विट
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या लोकोत्तर व्यक्तीमत्वाची नाळ सर्व सामान्यांपासून ते सर्व स्तरातील लोकांशी घट्ट असल्याचे नेहमीच पहावयास मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांचे व्यक्तीगत नाते किती घट्ट आणि आत्मियतेचे होते हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भावनिक ट्विटमधून दिसुन येते. 
     महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी १७ परळीत  आले होते. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जन्मभूमी व कर्मभूमीत येताना त्यांची आठवण होणार नाही हे शक्यच नाही. मात्र एक गहरे आत्मियतेचे नाते असलेला आपला मित्र आज आपल्यात नाही याची वेदना व हुरहुर पंतप्रधान मोदी पेक्षाही मित्र मोदींना अधिक असल्याचे त्यांनी केलेल्या भावनिक ट्विटमधून दिसुन येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 
"आज जब बीड आया हुं तो मुझे मेरे मित्र गोपीनाथ मुंडे जी की बहोत याद आयी ।
     चाहे कनेक्टिविटी हो या पर्यटन को बढ़ावा देने की बात हो, हम उनके सपनों को पूरा कर रहे है ।"
     या आत्मियतेच्या ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.
  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment