तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 20 October 2019

अंत:करणपुर्वक विचार करून मतदान करा-डॉ शिंदेप्रतिनिधी

पाथरी:-प्रस्थापित नेत्यांनी निवडणुक डाेळ्या समाेर ठेऊन समाजकार्य केल्याचा आव आणला आहे.निवडून आल्यावर चारचार वर्ष मतदार संघात ताेंड न दाखवणारे नेते स्वार्थी राजकारणी आहेत हे सर्वजन जाणता आहात साेशल मिडिया मुळे नेमका काेण काय आणि केंव्हा पासूं करताे याची युवा वर्गाला जाणिव आहे. या नेत्यांच्या समाेर काम घेऊन गेल्यास हात बांधून उभे राहावे लागते.मी मात्र खांद्यावर हात ठेऊन चाेविसतास उपलब्ध असेल.त्या मुळे अंत:करण  पुर्वक विचार करून मतदान करण्याचे आवाहन डॉ जगदीश शिंदे यांनी केले आहे.

या विषयी बाेलतांना पाथरी विधानसभा मतदार संघातील समाजसेवक म्हणून सर्वत्र ख्याती असलेले अपक्ष उमेदवार डॉ जगदीश शिंदे म्हणाले की, आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी जे जे  काम केले त्या कामांना मी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मी आज पर्यंत पाथरी परिसरात लहानाचा मोठा झालो आहे. पण परिस्थिती मध्ये काहीही बदल झालेला नाही, कसलाही विकास झालेला दिसत नाही,औद्योगिक विकास नाही, शैक्षणिक मागासलेपणा वाढतांना दिसतोय, तरुण पिढी बेरोजगारी मुळे व्यसनांच्या आहारी जात आहे  या गोष्टीची खंत मला रोज झोपू देत नाही. सतत मला प्रश्न पडतो की, पश्चिम महाराष्ट्राचा विकास झपाट्याने होऊ शकतो तर मराठवाड्याचा विकास का होऊ शकत नाही? उत्तर आहे आपल्या भागातील निष्क्रिय नेते मंडळी व अपुरी राजकीय इच्छा शक्ती. मला सतत वाटतं की हे सगळे कुठे तरी थांबलं पाहिजे व आपण देखील विकसनशील झाले पाहिजे. खरं तर मी माझ्या वैद्यकीय व्यवसायात व्यस्त राहून पैसे कमवून सुखी राहू शकलो असतो. पण डोळे बंद करून सहन करीत राहण्याचा आता कंटाळा आला आहे. म्हणूनच, मी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या या निर्णयात मला तुमची साथ हवी आहे.... येणाऱ्या २१ तारखेला आपण सर्वजण "चावी"या चिन्हाचे बटण दाबा मतदान करा व मी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा द्या.
    चला आपण सगळे मिळून विकासाच्या व प्रगतीच्या थांबलेल्या गाडीला "चावी " देऊन गतिमान करू. असे आवाहन डॉ. जगदीश शिंदे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment