तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

पालम तालुक्याचा चेहरा बदलणार विशाल कदम यांचे आवाहन
अरुणा शर्मा


पालम :- तालुक्यांचा चेहरा बदलून दाखवतो, अशी भूमिका गंगाखेड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विशाल कदम यांनी मांडली.
   स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही या तालुक्यात अजूनही अनेक गावांना रस्ता नाही, बसस्थानक नाही, पाण्याची समस्या सतावत आहे. मूलभूत प्रश्न अनेक आहेत. त्यामुळे विकास कोसोदूर राहिला आहे.
  तालुक्यांतील नद्या व उपनद्यांवर लहान-मोठे बंधारे बांधू व डिग्रस बंधारयांतील पाण्याचे न्यायवाटप करण्यासाठी प्रयत्न करणार. त्याचा फायदा सिंचन व पाणीपुरवठा योजनेसाठी होईल. बंधारयाचे पाणी पुढील जिल्हास दिले जाते त्याचे न्यायवाटप करु. उत्तम आरोग्यसेवा पुरवू. ग्रामीण भागातील शिक्षण व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाला चालना देऊ. महिला सक्षमीकरणासाठी लघुउद्योग व प्रशिक्षण केंद्र उभारु पालम येथे भव्य बसस्थानक उभारण्यात येईल असे अभिवचन विशाल कदम यांनी दिले.
 या मतदारसंघात मागील काही निवडणुकांपासून लक्ष्मीअस्त्र्याचा वापर केला जातोय. त्यामुळे जनतेचे व विकासाचे प्रश्न तसेच प्रलंबित राहतात. त्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी महायुतीला या निवडणुकीत विजयी करुन आपल्या भागातील विकास घडवून आणा, असे आवाहन कदम यांनी केले. सामान्य जनतेच्या समस्येचे निराकरण करणारा आमदार हवा असेल माझ्यासारख्या जनतेशी बांधिल असणारया शेतकरी कुटुंबातील उमेदवाराला विजयी करा व शेतकरयांची फसवणूक करणारया शक्तीना धडा शिकवा, असे त्यांनी आवाहन केले.

No comments:

Post a Comment