तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 25 October 2019

आशीर्वाद लॉन्स येथे दिवाळी पाडव्यानिमित्त इंदुरीकरांचे कीर्तनबीड (प्रतिनिधी) :- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बीड मधील बार्शी रोडवरील आशीर्वाद लॉन्स येथे दिवाळीच्या पाडव्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा समाजप्रबोधनकार ह.भ.प.  निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले आहे.दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी फराळाचा गोडवा असतो पण यामध्ये भर म्हणुन बीडकरांच्या दिवाळीचा गोडवा आणखी वाढवण्यासाठी विचारांची आणि प्रबोधनाची मेजवानी बीडकरांसाठी आयोजित केली आहे.सोमवार दि.२८ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडव्यादिवशी रात्री ०८ ते १० या वेळेत हि कीर्तनसेवा संपन्न होईल.तरी बीड व  परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या किर्तन सेवेचा लाभ घ्यावा आणि आपला दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे बीड जिल्हाध्यक्ष ह.भ.प.हरिदास (भाऊ)जोगदंड यांच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment