तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 October 2019

सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येते शेतकऱ्याकडून काळे झेंडे दाखवून शासनाचा निषेध(विश्वनाथ देशमुख सेनगावकर)

सेनगाव/प्रतिनिधी:-  सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बांधावर काळे झेंडे दाखवून प्रशासणाचा तीव्र शब्दात निषेध केला. 
       मागील १० ते १५ दिवसापासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे यामध्ये शेतालमधील सोयाबीन,तूर,कापूस,झेंडू या पिकांचे खूप नुकसान झाले असतांना प्रशासनाने पंचनामे करण्यास विलंब लावत असल्याने येथील शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. ताकतोडा येथे ९०० हेक्टर जमीन असतांना येथे ताकतोडा सर्वे करण्यासाठी फक्त ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वे कसा होईल असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
        यावेळी हेक्टरी ५०००० रुपये शासनाने सरसगट मदत जाहीर करावी.एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतांना नेतेमंडळी मुख्यमंत्री पदासाठी भांडत असल्याने याचाही तीव्र शब्दात निषेध केला. तसेच आमदार खासदार फक्त बांधावर उभे राहून फोटो बाजी करत असल्याचा आरोप येथील उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे. यावेळी नामदेव पतंगे,दशरथ सावके,कैलास सावके,राजू नवघरे,मंचकराव देशमुख,रमेश नवघरे,शंकर कोरडे,त्र्यंबक कोरडे,बबन उजळे व इत्यादी शेतकरी उपक्षित होते.

No comments:

Post a comment