तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

महाराष्ट्र सरकारने पाच वर्षात जनकल्याणाची कामे करून
सामान्य लोकांचा विश्‍वास कमावला.

राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार- खा.डॉ.प्रितमताई मुंडे


बीड (प्रतिनिधी) :- 

          देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बलाढ्य नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने पाच वर्षात काम करताना अठरा पगड जाती धर्माच्या वर्ग समुहाला सोबत घेवून विकासाची खरी ओळख सामान्य लोकाना करून दिली. आघाडी सरकारचा भ्रष्टाचार, अकार्यक्षमपणा आणि जनता विरोधी निर्णय या नैराश्याच्या वातावराणातून महाराष्ट्रातील जनतेला बाहेर काढताना पाच वर्षातील कारभार हा खरच नवमहाराष्ट्र घडवण्यासारखा असल्याचे प्रतिपादन जिल्हयाच्या खासदार डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांनी केले. उद्याच्या निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड बहुमतांनी महायुतीचे सरकार येईल हा विश्‍वास त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.

          खा.डॉ.प्रितम मुंडेंनी हॉटेल यशराज इन बीड येथे बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वेगवगेळया प्रश्‍नाला स्पष्टपणे उत्तरे दिली. या वेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी सोबत होते. निवेदन सादर करतांना त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षात सरकारने शेतकरी, कष्टकरी, वंचित उपेक्षित, गोरगरीब या सर्व वर्ग समुहाला डोळयासमोर ठेवून केलेली कामगिरी केवळ सामान्य जनतेच्या उध्दाराची आहे. शेतकर्‍यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना हाती घेवून डोक्यावरचे कर्ज माफ करताना पन्नास लाखाहून अधिक शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. आतापर्यत 43,92000/- शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ झाला. जलयुक्त शिवार दुष्काळमुक्तीसाठी योजना प्रभावीपणे हाती घेवून मागेल त्याला शेततळे दिले ज्यामुळे सिंचनाखाली शेतीचे प्रमाण वाढले. 1,67,000/- शेतकर्‍यांना त्याचा लाभ झाला. 2014 ते 2019 या पाच वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजने खाली 15,135 कोटीची नुकसान भरपाई दिली. नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई पोटी शेतकर्‍यांना 15,500 कोटीची मदत मिळवून दिली. भाजीपाला नियमनमुक्त करून शेतकर्‍यांना विक्रीसाठी मध्यस्थीची साखळी कमी केली. या शिवाय चौदा जिल्हयात स्वस्त धान्य योजने अंतर्गत गहू आणि तांदूळ प्रति किलो 2 आणि 3 रु प्रमाणे दिले ज्याचा लाभ 51,29000 शेतकर्‍यांनी घेतला. दुष्काळमुक्ती करताना टँकरची संख्या कमी झाली हे जलयुक्त शिवाराचे यश असून मराठवाडा वॉटरग्रिड योजना मंजुर करून अकरा धरणे एकमेकांना पाईलाईने जोडणार आहोत. ग्रामिण आणि शहरी लोकांना फिल्टरचे पाणी देण्यात येईल. या योजनेसाठी 20,000 कोटी तरतूद असून प्रत्यक्ष काम सुरु झाल्याचे त्या म्हणाल्या. राज्यात लोडशेंडीगचा प्रश्‍नच ठेवला नाही. पुर्वीची समस्या इतिहास जमा झाली असून शेतीसाठी पंपाना विज कनेक्शन पाच वर्षात 4,34,304 पंपाचे कनेक्शन देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यान योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना याचा लाभ राज्यात नव्वद टक्के नागरीकाना झाला असून आतापर्यत 24,85000 रुग्णांर शस्त्रक्रिया केल्याचे त्यांनी म्हटले. यासाठी स्वतंत्र मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला. विस लाखाहून आधिक रुग्णांना 900 कोटीच्या उपचाराचा लाभ दिला. राज्यातील गोरगरीबांना स्वतःचे घर आसावे त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 8,24000 हजार लोकांना घरे मिळवून दिली. 2022 साला पर्यत 19,40000 घरे बांधण्याचे उद्ष्टि ग्रामिण भागात पण 10,51000 लाभार्थ्यांची नोंद असून 77 टक्क घरांचे काम पुर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाडा आणि विदर्भ खर्‍या अर्थाने भागाचे भाग्य उजाळणारा समृध्दी महामार्ग ज्याची लांबी 701 कि.मी. आठ पदरी 120 मि. रुंदीचा रस्ता एकुण 10 जिल्हे जोडणार असून त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील रस्त्याचा विकास व्हावा, देखभाल दुरुस्ती व्हावी यासाठी प्रथमच हायब्रिड ऍन्युइटी योजना सुरु करून त्या अंतर्गत 30 हजार कोटीची 10 हजार कि.मी लांबीची कामे सुरु आहेत. मुंबई गोवा मार्गाचे काम वेगाने आहे तर गतिमान नागरी वाहतुकीसाठी नागपुर, मुंबई आणि पुणे शहरात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. या सरकारच्या पायगुणामुळे आर्थिक उत्पन्न वाढ झाली असून आम्ही सत्तेवर येण्यापुर्वी 16.50 लाख कोटी पाच वर्षात 10 लाख कोटीची वाढ होवून 26.60 लाख कोटी झाली आहे. परकिय गुंतवणुकदारांची महाराष्ट्राला पसंती असून देशातील एकुण गुंतवणुकीपैकी 30 टक्के महाराष्ट्रात गुंतवणुक आहे. रोजगार निर्मितीत प्रचंड वाढ झाल्याचा दावाही त्यांनी केला. मराठा समाजाला सरकारने सर्व कायदयाची पुर्तता करून न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवून दिले. पुर्वीच्या सरकारला जे जमले नाही ते आम्ही करून दाखवले. ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय, उसतोड कामगारासाठी महामंडळ, बारा बलुतेदार घटकांना 100 कोटी रुपये विकासासाठी तरत

No comments:

Post a Comment