तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 30 October 2019

शेतकऱ्यांना रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी-प्रविण पट्टेबहादूर


महसूल विभागाने सर्वेक्षण करण्याची मागणी

रिपाई आठवले गट प्रणित बहुजन विद्यार्थी परिषदची मागणी

फुलचंद भगत
 वाशिम - मागील दहा दिवसापासून जिल्ह्यात प्रथमच सतत पाऊस चालू असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.यावर्षी सारखा पाऊस दिवाळीत कधीच झाला नाही. दिवाळीत पाऊस पडेल याची कधी शंका देखील व्यक्त केली नाही.यावर्षी मात्र शेतकर्यांच्या तोंडी आलेला घास मात्र निसर्गाने हिरावून घेतला आहे.यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला आहे.या शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत करून संकटातून बाहेर काढावे अशी मागणी रिपाई आठवले गटाचे बहुजन विद्यार्थी परिषद वाशिम जिल्हाध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर यांनी प्रसिद्धीपत्रकातून जिल्हा प्रशासनाला केली आहे. पुढे बोलतांना प्रविण पट्टेबहादूर म्हणाले की,बळीराजाने आपली संपूर्ण शेतातील कामे ही आटोपून शेतकरी आनंदात दिवाळी सण साजरा करण्यासाठी आतुर होता. मात्र या आनंदावर पावसाने विरजण करून शेतकऱ्याला हवालदिल केले आहे.अजूनही शेतात सोयाबीन पिकांची गंजी लावून आहे,त्याला अति प्रमाणात पाऊस पडल्याने शेवटी कोंब फुटून सोयाबीन पीक धोक्यात आले आहे.असाचपाऊस पडत राहिला तर रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.म्हणून शेतकऱ्यांना आताच महसूल विभागाने सर्वेक्षण करून मदत द्यावी अशी शेतकरी हिताची मागणी रिपाई आठवले गटाचे प्रविण पट्टेबहादूर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a Comment