तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

'मी राहुलभाऊ समर्थक' असे लिहिलेले टी-शर्ट घालून युवकाची आत्महत्या:-बुलडाणा जिल्ह्यातील या आठवड्यातील दुसरी घटना, राजकीय वर्तुळात खळबळ

बुलडाणा,17 ऑक्टोबर:'मी राहुलभाऊ समर्थक' असे लिहिलेले टी- शर्ट घालून एका तरूणाने आत्महत्या केल्याने बुलडाणासह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
 धाड येथे ही घटना घडली असून सतीश मोरे (21) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. बुलडाणा जिल्ह्यातील या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
मिळालेली माहिती अशी की, आत्महत्या केलेल्या तरुणाने चिखली मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार आणि आमदार राहुल बोन्द्रे यांच्या प्रचारासाठी 'मी राहुलभाऊ समर्थक' नावाचे टी शर्ट घातलेले होते. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. घातलेल्या कापड्यावरून सतीश हा काँग्रेस नेते राहुल बोन्द्रे यांचा समर्थक असल्याचे समजते. मागील दोन दिवसांपासून सतीश हा टी शर्ट घालून फिरत असल्याचे शहरातील नागरिकांनी सांगितले. सतीशच्या पश्चात त्याच्या घरी आई-वडील आणि एक भाऊ आहे. 
सतीश मोरे हा बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जातो, असे सांगून घराबाहेर पडला होता. सतीश हा धाड येथील चिवडा विकणाऱ्या व्यापाऱ्याकडे चिवडा तयार काम करण्याचे काम करत होता. तो कामावरून घरी न आल्याने सर्वत्र शोध घेण्यात आला. गुरूवारी सकाळी धाड गावाच्या बाहेर दूध डेअरीजवळ असलेल्या सागवानच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. हे वृत्त वाऱ्यासारखी गावात पसरताच खळबळ उडाली. मात्र, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळाताच धाड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, मृतदेह बुलडाणा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी धाड पोलीस अधिक तपास करत आहेत.

चार दिवसांपूर्वी भाजपचे टी-शर्ट घालून आत्महत्या
धक्कादायक म्हणजे 4 दिवसांपूर्वी अशीच एक घटना जळगाव जामोद मतदार संघातील शेगाव तालुक्यात घडली होती. खातखेड येथील एका युवकाने 'पुन्हा आणूया आपले सरकार' असे लिहिलेले भाजपचे टी-शर्ट परिधान करून आत्महत्या केली होती. या दोन्ही घटनेमुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे

No comments:

Post a comment