तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 November 2019

वाडी खु.येथे रिलायन्स फाउन्डेसन यांच्या वतीने शिबीर संपन्न

अरुणा शर्मा

 पालम :- तालुक्यातील वाडी खु. येथे रिलायन्स फाउन्डेसन व ऊदयगिरी लायन्स कल्ब यांच्या सयुक्त मोफत डोळे तपासणी शिबीर ठेवण्यात आले होते. या शिबीराला प्रमुख उपस्थित गणेशराव दादा रोकडे जि.प.सदस्य व माधवराव गायकवाड पत्रकार संघ अध्यक्ष, सरपंच कैरव मोरताटे, माणिकराव गायकवाड, बापुसाहेब पौळ, डॉक्टर बिरादार, डॉ.सौ. बिरादार मॉडम, उत्तमराव भस्के (सामाजिक कार्यकर्ते), खुशालराव भस्के (अध्यक्ष शा.व्य.स.वाडी खु.) गजानन भस्के (ग्रा.पं.सदस्य वाडी खु.), आबासाहेब भस्के (ग्रा.पं.सदस्य वाडी खु.), वैजनाथ भस्के, तुकाराम चाळक, मंचकराव चाळक, काशीनाथ भस्के, माधवराव भस्के, भिमराव भस्के अदि उपस्थित होते.

हिवरखेडा येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

 हिवरखेडा येथे श्रीमद् भागवत कथा सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की मौजे हिवरखेडा येथे गुरुवारी हरिभक्त पारायण नागोजीराव महाराज यांच्या कृपेने हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण व तसेच भागवत कथा सोहळा आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी परिसरातील भजनी मंडळ गावकरी मंडळी यांनी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा सप्ताह नेतृत्व श्री ह .भ .प.ण्यानबाराव महाराज मकोडिकर भागवत वाचक श्री ह .भ .प .भिकाजी महाराज मोरगव्हानकर वेळ  दुपारी 1/ते 5 पाच सप्ताह दैनंदिन कार्यक्रम दररोज सकाळी 4 ते 6काकडा भजन 6ते 9 ज्ञानेश्वरी पारायन सकाळी 11/ते2 भागवत कथा संध्याकाळी 6 वाजता हरिपाठ व रात्री 9/ते 11 कीर्तन व नंतर हरिजाागर सप्ताह मधील कीर्तनकार दि .27/11/2019 श्री हर्षद महाराज हिवरखेडा दि  28/11/2019/ श्री सुरेश महाराज बोरखेडिकर दि .29 /11/2019/ सौ .शकुंतलाताई  चाकोते .साखरा दि 30/11/2019 श्री नामदेव महाराज भंडारी .दि .1/12/2019/ श्री माणिक महाराज देहगाव दि .2/12/2019 श्री छगन महाराज टाकळी  दि .3/2/2019/ श्री भिकाजी महाराज मोरगव्हारकर  दि 4/12/2019 ला सकाळी 9ते 11 ला ग्यानबाराव महाराज मकोडिकर यांचे कल्याचे कीर्तन होउल व नंतर महाप्रसाद श्री भावराव लिंबाराव हराल याच्या कडून देन्यात आली आहे तरी या पंच कोषितिल भाविक भक्तांनी लाभ घ्यावा

शेतकरी वा गरीब व्यक्ती यांच्यासोबत बँकांनी सलोख्याची वागणूक द्यावी

बीड (प्रतिनिधी) :- 
बँक ही नागरिकांसाठी आशेचा किरण असते, अशा व्यापक अर्थाने बँकेची भूमीका ही समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. शेतकरी, मध्यमवर्गीयासह गरीब हे अनेक संघर्ष करत, शेवटचा मदतीचा आशेचा किरण म्हणून ते बँकेच्या दिशेने वाटचाल करतात त्यांच्यासमवेत बँक कर्मचाऱ्यांनी सलोख्याची वागणूक द्यावी, त्यांना समस्या ऐकूण घेऊन सोडवणूकीचे मार्गदर्शन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
        शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने बँकांच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी चावडी (बँक इन्फो) एक दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाीटन जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास स्टेट बँकेचे उपमहाप्रबंधक रवीकुमार वर्मा, क्षेत्रीय प्रबंधक नदंकिशोर भोसले, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण, व्यवस्थापक संम्राट उपस्थित होते.

       जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले, स्टेट बँक ही देशामधील सर्वात मोठी बँक म्हणून कार्य करणारी आहे. बीड जिल्ह्याच्या संदर्भात बोलायचे झाल्यास मागील दोन-तीन वर्षापुर्वी या बँकेकडून शेतकरी कर्ज वाटपाचा टक्केवारी ही शंभर टक्के पूर्ण केलेली आहे. शेतकरी असो व इतर व्यवसायीकांनाही बँकेकडून चांगल्या प्रकारची सेवा दिली जात आहे. मात्र सध्य परिस्थितीमध्ये पहायचे झाल्यास निसर्गाचा असमतोल मुळे शेतकरी हा मोठ्या अडचणीत साडपत आहे. त्यामुळे शेतकरी असो कि कोणी गरीब हे अनेक संकटांना सामोरे जात आहे. त्यांना  या परिस्थितीमध्ये बँक हीच एक मदत व आशा घेऊन येतात यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी बँकेमध्ये येणाऱ्या शेतकरी, गरीब, किवा अन्य ग्राहकांशी बँक कर्मचाऱ्यांनी सलोख्याची वागणूक द्यावी. त्यांच्यासमवेत चर्चा करुन प्रश्न सोडवणूकीविषयी त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. त्यामुळे वादाचे प्रकार कमी होतील आणि बँकेची ख्याती वाढेल असेही त्यांनी आवाहन उपस्थितांना केले. यावेळी उपमहाप्रबंधक रवीकुमार वर्मा यांनी मार्गदर्शन केले तर क्षेत्रीय प्रबंधक नदंकिशो भोसले उपस्थितांचे आभार मानले.

जिल्हाधिकाऱ्यांनी विविध स्टॉलला दिल्या भेटी
स्टेट बँकेच्या चावडी कार्यक्रमातंर्गत वीस प्रकारचे विविध योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉलची उभाणी करण्यात आलेली आहे. या स्टॉलला जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी भेट देऊन विचारणा केली. दरम्यान महिला बचत गटाच्या वस्तूंची पाहणी केली तसेच महिला बचत गटाने तयार केलेल्या धपाटे – दहीचाही जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी आस्वाद घेऊन गटाच्या महिलांना प्रोत्साहन दिले.

हेळंब येथे श्री. खंडोबा यात्रेची जय्यत तयारी सुरू!हेळंब येथील खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

2 ते 4 डिसेंबर दरम्यान यात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हेळंब येथील प्रसिध्द खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असुन चार्तुमासातील रविवारी भाविकांची ही गर्दी हजारोंच्या संख्येने होत आहे. दि.०२ डिसेंबर रोजी मोठी यात्रा भरणार असुन यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
हेळंब येथील खंडोबाचे देवस्थान प्रसिध्द असुन मुंबई, पुणे, औरंगाबाद, हैद्राबाद आदी भागातुन भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. मागील चार महिन्यापासुन प्रत्येक रविवारी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. दरवर्षी चंपाषष्ठीला तीन दिवशीय यात्रा भरत असते. यावर्षीही यात्रा २ डिसेंबर रोजी येत आहे.  

          तालुक्यातील हेळंबच्या श्री खंडोबाची यात्रा दि. 02 ते 04 डिसेंबर 2019  दरम्यान होणार आहे.  यात्रेची जोरदार तयारी सध्या  सुरु आहे. या ठिकाणी दरवर्षी यात्रेला  मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. यात्रेच्या पार्श्‍वभुमीवर हेळंब येथे  घरोघरी भाविक व नातेवाईकांच्या स्वागताची तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. दररविवारी ही या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी असते.   हेळंब येथे श्री. खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला इथे  मोठी यात्रा भरते. याहीवर्षी ही यात्रा जोरदार होणार आहे. यात्रा जवळ आली असुन यात्रेची जोरदार तयारी सुरु आहे. नवसाला पावणारा खंडेराया अशी या देवसस्थानची पंचक्रोशीत ओळख आहे. परिसरातील गावोगावचे नागरिक दर्शनासाठी, नवस करण्यासाठी व नवसाच्या पुर्तेतेसाठी येथे गर्दी करीत असतात. या पार्श्‍वभुमीवर ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छतेसह इतर तयारीला वेग आला आहे. यात्रे निमित्त गावामध्ये दि. 02 ते 04 डिसेंबर या कालावधीत श्रींची पालखी मिरवणुक, शोभेची दारु आदींसह कबड्डी स्पर्धा, कुस्त्या व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहेत.
        श्री खंडोबाचे मंदिर हे हेळंब गावापासून  पासुन १ किलोमिटर अंतरावर असुन रस्त्याची डागडुजी व सुशोभिकरण करण्यासाठी नागरिक सरसावले आहेत.  श्रींच्या मंदिराची रंगरंगोटी करण्यात येत  असुन विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. गावातील युवक व खंडोबा भक्त यात्रेच्या तयारीला लागले आहेत. घरोघरी मोहरवासिनी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्या स्वागताचीही तयारी सुरु आहे. कामा निमित्त बाहेर गावी गेलेले नागरिकही यात्रेनिमित्त आवर्जुन गावाकडे येतात. दरम्यान पंचक्रोशीतुन मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. यात्रेची तयारी सुरू असुन यात्रोत्सव काळात लागणार्‍या सुविधा व येणाऱ्या भाविकभक्तांची सोय करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत व गावकरी तयारी करत असल्याचे सरपंच लक्ष्मीबाई होळंबे व उपसरपंच सौ.लक्ष्मी राम पाळवदे यांनी सांगितले आहे.

पिक विमा प्रश्नी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्नबीड (प्रतिनिधी) :- 
गेल्या वर्षी कमी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अद्यापही विमा न मिळाल्यामुळे आज  जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी ओरिएन्टल इन्शूरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जोशी यांच्यासमवेत शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेतली.  २०१८-१९ मधील खरीप हंगामातील विम्याचा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. येत्या १४ ते १५ डिसेंबरपर्यंत शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ यामुळे मिळू शकणार आहे.
गेल्या वर्षीच्या अर्ज त्रुटींमुळे शेतकर्‍यांचा खरीपाचा विमा मिळाला नव्हता. वारंवार पूर्तता अर्ज  केल्यानंतरही बीड जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांना विमा मिळाला नाही व  अद्यापही  शेतकरी खरीपाच्या विम्यापासून वंचित आहेत. ही बाब जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी गांभीर्याने घेतली. त्या अनुषंगाने ओरिएन्टल इन्शूरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जोशी यांना बीड येथे त्यांच्यासमवेत बैठक घेतली. जे शेतकरी खरेच विम्यासाठी पात्र ठरतील अशा शेतकर्‍यांच्या खात्यावर १४ ते १५ डिसेंबरपर्यंत विम्याची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती देण्यात आली. या बैठकीला अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम यांच्यासह ओरिएन्टल इन्शूरन्स कंपनीचे अन्य अधिकारीही उपस्थित होते.

या आपले शहर घडवूया उपक्रमा अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल स्वच्छता मोहिमेतील शनिवारी दुसरा टप्पा शहरवासीयांनी सहभागी होण्याचे आवाहनबीड :-
 जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांण्डेय यांच्या संकल्पनेतून या आपले शहर घडवूया या उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुल स्वच्छता अभियानाचा शनिवारी दुसरा टप्पा असून या अभियानात  शहरातील नागरिक , खेळाडू , खेळ संघटना, प्रशिक्षक व स्वयंसेवी संस्थानी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
         क्रीडा संकुलामध्ये नियमित सरावाला येणाऱ्या विविध खेळाच्या शेकडो खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरिकयांचा मोठ्या प्रमाणामध्ये संकुलामध्ये वावर आहे. या क्रीडा संकुलामध्ये स्वच्छता अभियान राबवून या आपले शहर घडवूया या उपक्रमा अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी केलेला आहे.गत शनिवारी दि.२३ नोव्हेंबर २०१९ रोजी या स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. प्रत्यक्ष जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांण्डेय यांच्यासह उप- विभागीय अधिकारी नामदेव टिळेकर ,तहसीलदार सचिन खाडे, एन आय सीचे प्रमुख प्रविण चोपडे ,नगर परिषदेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरखूलकर,जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्यासह विविध सामाजिक व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, नागरिक व खेळाडूं यामध्ये सहभागी होणार आहेत. दुसरा टप्पा शनिवारी दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते १० या वेळेमध्ये क्रीडा संकुलाची स्वच्छता मोहीम अंतर्गत इनडोअर हाॕल , पॕव्हेलीयन , वस्तीगृह आदी पाण्याने स्वच्छ धुवून भिंतीवर रंगरंगोटी करण्यात येणार आहे. बीड नगर परिषदे अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
        स्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची आखणी करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल येथे गुरुवारी सायंकाळी ६ वा. उप विभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडलीत ,तहसीलदार  सचिन खाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर , क्रीडा संघटक डाॕ.अविनाश बारगजे अजहर शेख ,रेवननाथ शेलार ,धनेश करांडे, मुकेश बिराजदार , किशोर काळे , रतन कोकाटे, सचिन जाधव आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.
या आपले शहर घडवूया उपक्रमा अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल स्वच्छता मोहिमेतील शनिवारी दुसरा टप्पा होत असून यामध्ये
शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या महासरकारचे परळी तीनही पक्षांकडून जल्लोषात स्वागत चंदुलाल बियाणी यांच्या वतीने ११ हजार लाडूंचे वाटप

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी मिळून केलेल्या महाविकास आघाडीचा नेत्रदिपक महाशपथविधी सोहळा दि.२८ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर पार पडला. याप्रसंगी आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली. याप्रसंगाचा आनंदोत्सव परळीत जल्लोषात साजरा करण्यात आला. राजकारणाच्या ईतिहासात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत परळीत पहिल्यांदाच जल्लोष केला. शहरात सर्वत्र फिरून महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन व पुष्पहार अर्पण केला तर राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्याचा आनंदोत्सव परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून परळीतील नागरीकांना ११ हजार लाडू पाकीटे वाटून तोंड गोड करण्यात आले. गुरूकृपा नगर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम शपथविधी सोहळ्याच्या वेळी म्हणजे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला होता. नव्या सरकारची स्थापना व आ.धनंजय मुंडे यांचा होत असलेला मंत्रीमंडळातील समावेश या दुग्धशर्करा योग साधून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गुरूवार, दि.२८ नोव्हेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.  यावेळी महाविकास आघाडी सरकारचा विजय असो… स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो… खा.शरद पवार यांचा विजय असो… सोनियाजी गांधी यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.

परळीत साजरा करण्यात आलेल्या आनंद  सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी, शिवसेनेचे तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अड.अनिल मुंडे, शहराध्यक्ष बाबु नंबरदार, शिवसेना विद्यार्थी आघाडीचे जिल्हा प्रमुख प्रा.अतुल दुबे, शिवसेना शहर प्रमुख राजेश विभूते, रा.काँ.जेष्ठ नेते केशवभाऊ बळवंत, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक, अड.जीवनराव देशमुख, चेतन सौंदळे, नगरसेवक शंकर आडेपवार, शकील कुरेशी, अनिल अष्टेकर, विजयप्रकाश लड्डा, रज्जाक कच्छी, माधवराव ताटे, विश्वनाथराव गायकवाड, रमेश भोयटे, विजयप्रसाद अवस्थी, देवेंद्र कासार, पिन्टू सारडा, शम्मोभाई, रमेश चौंडे, महेंद्र रोडे, सुरेंद्र कावरे, सय्यद ईफरोज, गणपत कोरे, शेख निस्सार, गिरीष भोसले, फरकुंद अली आदींसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.चंदुलाल बियाणी यांनी केले परळीकरांचे तोंड गोड!

महाराष्ट्राचा महाशपथविधी सोहळा व परळीचे विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे यांचा मंत्रीमंडळात होत असलेल्या समावेशाच्या अनंदात राष्ट्रावादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या वतीने शहरातील नागरीकांना ११ हजार लाडूंचे पाकीटे वाटून तोंड गोड करण्यात आले.

‘आटपाडी नाईट्स’ साठी सुबोध भावे बनला प्रस्तुतकर्ता

(प्रतिनिधी) :- 
 मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमात वैविध्यपूर्ण भूमिकांमधून अभिनेता सुबोध भावेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच चित्रपट दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही त्याने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटविला आहे. सुबोध आता पुन्हा एकदा नव्या इनिंग साठी सज्ज झाला असून तो ‘आटपाडी नाईट्स’या चित्रपटाच्या माध्यमातून प्रस्तुतकर्ता म्हणून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

‘लोकमान्य’, ‘बालगंधर्व’, ‘... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ असे चरित्रपट असो की ‘तुला पाहते रे’ मधील खलनायकी छटा असलेला विक्रांत सरंजामे किंवा ‘अश्रूंची झाली फुले’ मध्ये रंगमंचावर बिनधास्त वावर असलेला लाल्या, माध्यम कोणतेही असो सुबोध भावेने प्रत्येक व्यक्तीरेखेला आपल्या अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. अभिनेता म्हणून दमदार वाटचाल सुरु असताना त्याने चित्रपट दिग्दर्शनात पाउल टाकले आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकाला चित्रपटरुपात प्रेक्षकांसमोर आणण्याची कामगिरी उत्तम निभावली. तर ‘पुष्पक विमान’ या चित्रपटातून निर्माता म्हणून पदार्पण करत एक वेगळा विषय प्रेक्षकांपुढे आणला. यानंतर आता चित्रपट क्षेत्रातील अजून एक शिखर सर करण्यास सुबोध भावे सज्ज झाला असून प्रस्तुतकर्ता म्हणून ‘आटपाडी नाईट्स’ हा त्याचा पहिला चित्रपट असणार आहे. मायदेश मिडिया निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केले असून त्यांचा ‘बडे अब्बू’ हा चित्रपट गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या ५० व्या इफ्फी मध्ये झळकला होता. ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्री सायली संजीव या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात असलेल्या इतर कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती गुंफण्यात आलेल्या ‘आटपाडी नाईट्स’ची कथा एका संवेदनशील विषयावर अतिशय वेगळ्या अंदाजात, खुमासदार शैलीत भाष्य करणारी असल्याचे समजते.  ‘आटपाडी नाईट्स’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

छायाचित्रकार शांतनु दास यांचे एक उत्कृष्ट पारसी कला क्षणांचे दर्शन जितेंद्र यांनी पाहिले
मुंबई (प्रतिनिधी) :- 
एक उत्साही कला संग्रहकर्ते, क्यूरेटर आणि उद्योजक परवेज दमानिया व शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि पारसी खाद्यप्रेमी असलेले फ्रावाशी शाळेचे रतन लूथ आयोजित 'पारसी - अ टाइमलेस लिगसी' या ताओ आर्ट गॅलरीत भरविण्यात आलेल्या फोटोग्राफी प्रदर्शनात प्रख्यात पुरस्कार प्राप्त छायाचित्रकार शांतनु दास यांनी त्यांच्या गोठविलेल्या कलाचौकटीत कैद केलेल्या पारसी समुदायाच्या काही शाश्वत क्षणांचे दर्शन घडविले. प्रसंगी जीतेंद्र, रोशनी दमानिया, अरीश दमानिया, शर्वरी लूथ, मिक्की मेहता, कुणाल विजयकर, बीना अजीज, कैलाश आणि आरती सुरेंद्रनाथ, कल्पना शाह, अनहिता देसाई, याझदी देसाई, अर्मायती तिरंदाज़, विराफ मेहता, रैल पदंसी, अनन्या गोएंका, रश्मी खट्टम आणि सतीश किशनचंदानी  यांच्यासह पारसी समाजातील अन्य ज्येष्ठ सदस्यांनीही 'पारसी - अ टाईमलेस लिगसी' च्या पूर्वावलोकनास उपस्थिती दर्शविली.
वारसा:
पारसी होण्यासाठी पर्सिया (इराण) मधील झोरोस्ट्रिअनच्या पहिल्या स्थलांतरातील वंशज म्हणून ओळखले जाणे गरजेचे असते, ज्यांना हजारो वर्षांपूर्वी निवास, संरक्षण आणि सुरक्षित आश्रय मिळालेला होता. पारसी असणे म्हणजे भारतातील वेगाने कमी होत जाणाऱ्या संस्कृतीच्या वांशिक समुदायाशी संबंधित आहे. आणि पारसी होणे म्हणजे जगातील सर्वात प्राचीन एकेश्वरवादी धर्माची ज्योत टिकवून ठेवण्याची अत्यंत मौल्यवान जबाबदारी स्वीकारणे.
संकुचित समुदाय:
स्थलांतराचे आवाहन, आंतरविवाहाचे परिणाम आणि पाश्चात्य मार्गांच्या आमिषाने भारतात आता फारसे पारसी शिल्लक राहिलेली नाहीत. २०१६ च्या आकडेवारीनुसार त्यांची संख्या ६१,००० पर्यंत खाली आली आहे आणि दिवसेंदिवस त्यात आणखीन घट होत आहे. ४०,००० आणखीन पारसी जगातील विविध कोपऱ्यात विखुरलेले आहेत आणि त्यांच्या विशिष्ट ओळखीसाठी त्यांची एक धडपड सुरू आहे. याबद्दल सांगताना परवेझ दमानिया म्हणतात की, “मला पारसी समुदायाचे नेहमीच आकर्षण वाटले आहे आणि मी याच समुदायाचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. आम्ही पारसी समुदायाच्या आयुष्याविषयी आणि त्यांच्या अस्तित्वाबद्दल लोकांना ज्ञान देण्यासाठी या प्रदर्शनाचा विचार केला. पारसी लोकांची संख्या कमी आहे, परंतु त्यांनी भारतासाठी मोठे योगदान दिलेले आहे. काही कलाकारांनी पारशी लोकांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी वेळ दिला आहे आणि बर्‍याचदा खाजगी आणि वैयक्तिक परंपरा असलेल्या गोष्टी कागदोपत्री ठेवण्याची परवानगी फार कमी लोकांना मिळाली आहे. पारसी संस्कृती, संस्कार आणि परंपरा अधिकाधिक लोकांमध्ये सामायिक करण्यासाठी आम्हाला ही संधी घ्यायची होती." पुढे रतन लूथसांगतात की, “हे प्रदर्शन वेगाने कमी होत चाललेल्या वांशिक समुदायाच्या संस्कृती, संस्कार आणि परंपरा यांचे दस्तावेजीकरण आणि जतन करण्याचा एक प्रयत्न आहे. पारशी वारसा लक्षात ठेवणे आणि सध्याची पिढी आणि पुढील पिढ्यांसाठी हे कायम लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. काळाच्या ओघात ते कायमचे नष्ट होणार नाही याची आम्ही खात्री करुन घेतो आहोत.”

छायाचित्रांचे वैशिष्ट्य :
या विशिष्ट प्रदर्शनात नेट जिओ ट्रॅव्हल अ‍ॅवॉर्ड सह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते फोटो जर्नलिस्ट शांतनु दास यांचे अंदाजे पन्नास कलाविष्कार दर्शविले जातील. शांतनु दास यांना संस्काराच्या सीमारेषा पार करण्याची परवानगी होती, त्यांनी पारसी लोकांच्या रूढी, परंपरांना मोहिनी घालून त्यांची संस्कृती, संस्कार तसेच कामाच्या ठिकाणी, समारंभात लोकांच्या ज्वलंत प्रतिमांना अनुभवत त्यांच्याबरोबर अनेक उत्सव साजरे केले आहेत .
शांतनु दास यांनी पाच ते सहा वर्षांच्या कालावधीतील या प्रदर्शनाचे कागदोपत्रीकरण केले आहे आणि इतर शहरांपैकी फक्त मुंबईतच नव्हे तर सुरत, उदवाडा आणि कोलकता येथेही शूट केले आहे. ते म्हणतात की, “पारसी लोक फार आनांदायक आणि उत्साहवर्धक आहेत. पारसी समुदायाला समर्पित असे हे माझे दुसरे प्रदर्शन आहे. बरीच वर्षे मी त्यांच्याशी संवाद साधत शूट करत आलो आहे, आणि त्यातून मी जाणले की  ते एक अतिशय दयाळू आहेत व इतरांच्या मदतीस नेहमी तत्पर असतात त्याचप्रमाणे ते कधीच कोणासाठीही कोणत्याही प्रकारच्या वाईट भावना, द्वेष मनात ठेवत नाहीत."
या विशिष्ट समुदाय आणि त्यातील उदात्त लोकांबद्दल एकता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘पारसी - अ टाइमलेस लिगसीच्या या उद्घाटन सोहळ्यास विविध क्षेत्रातील ख्यातनाम आणि मान्यवर व्यक्तीमत्व उपस्थित असतील. या प्रदर्शनाची एक मनोरंजक बाब म्हणजे सेलिब्रिटीज बरोबर काही पारसी स्त्रिया आणि पुरुष ही ह्या उद्घाटन सोहळ्यात सामील असतील. ते आपल्या पारंपरिक पोशाखात म्हणजे दुग्ली व फेटामध्ये पुरुष तर महिला - भरतकामाच्या गॅरा परिधान करून उपस्थि

सेलूत जैन मंदिर शताब्दी, वेदी प्रतिष्ठा महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सेलू ( जि.परभणी ) / प्रतिनिधी :  येथीलश्री नेमीनाथ दिंगबर जैन मंदिराच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून शुक्रवारपासून ( २९ नोव्हेंबर ) शताब्दी व वेदी प्रतिष्ठा महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता जैन मंदिरापासून महेशनगरपर्यंत श्री जिनेंद्र भगवान च्या प्रतिमेची रथातून मिरवणूक  काढण्यात आली. मिरवणुकीत महिलांनी कलश घेऊन सहभाग नोंदविला, तर मुले-मुली उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मंगल कलशाची स्थापना निलेश व पियुष बिनायके यांच्या हस्ते झाली. प्रकाशचंद बिनायके यांनी ध्वजारोहण, तर मंडपाचे उद्घाटन बाबूराव कोकणे यांनी केले.
अष्ट प्रतिहार्य जिनवाणीची स्थापना पं.अभिनंदन शास्त्री, पं.विवेक जैन, पं.बिपीन, पं.सुनील शास्त्री, पं.प्रांजल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दुपारी चार वाजता 'श्रद्धा' या विषयावर बिपिन शास्त्री, तर 
' धर्मकक्ष ' व '  कुणीही कुणाचा कर्ता नाही ' या विषयावर पं.सुनील शास्त्री यांचे प्रवचन झाले. सायंकाळी इंद्र सभा झाली. तीन दिवसीय महोत्सवाचा रविवारी समारोप आहे. या महोत्सवात जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

फोटो : सेलू ( जि.परभणी ) येथील जैन मंदिराचा शताब्दी व वेदी प्रतिष्ठा महोत्सवानिमित्त श्री जिनेंद्र भगवानची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

वार्तांकन : बाबासाहेब हेलसकर

शिवसेना मुख्यमंत्री निबंदी चे जिंतूरात जल्लोषात स्वागतजिंतूर
शिवसेना पक्षप्रमुख मा .उध्दवजी ठाकरे साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल जिंतूर येथे शिवसैनिकांनी शिवाजी  चौकात फटाके वाजून व पेढे वाटुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला 
या वेळी उपस्थित राम शर्मा, बंडू लांडगे,नवनाथ देशमुख, सचिन देशमुख, किरन देशमुख, रितेश पांडे, गंगाधर मोरे, झनक जाधव, रामप्रसाद कंटाळे, अरविंद कटारे, किशोर कटारे, मुरली मस्के, परमेश्वर ठोंबरे, विशाल देशमुख,
बबन घुगे, आदि उपस्थित होते

पाण्याचा ताळेबंदसाठी प्रशासनाचे सर्वोतोपरी सहकार्य-ऋषिकेश मोडक यशदाने प्रकाशित केलेली पुस्तिका दिली भेट

फुलचंद भगत
 वाशिम ( प्रतिनिधी)संपूर्ण वाशिम जिल्ह्यात पाण्याची लोकचळवळ उभी करण्याकरिता जलसंधारण विभाग वाशिम यांनी नियुक्त केलेले जलप्रेमी,जलदुत यांना यशदा यांनी प्रशिक्षित केले आहे.हे जलदुत,जलप्रेमी वाशिम जिल्हा संपूर्ण पाण्याचा ताळेबंद सादर करणार आहेत.याबाबत वाशिम जिल्ह्यातील जलदुत, जलप्रेमी यांनी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांची भेट घेऊन सदर पाण्याच्या ताळेबंद बाबत सविस्तर चर्चा करून त्यांना संत साहित्यातील संतवाणी हि यशदा पुणे ने प्रकाशित केलेली माहिती पुस्तिका भेट दिली आहे.यावेळी बोलत असतांना जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी जिल्हास्तरावरून आपणास सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची भावना बोलून दाखवली.व आगामी कार्यासाठी त्यांनी जलदुत,जलप्रेमी यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी जलप्रेमी भास्कर गुडदे, प्रभू कांबळे, जलदुत प्रवीण पट्टेबहादूर,अरविंद उचित रवींद्र इंगोले,स्वाती राऊत उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

24 वर्षांनी भेटले वर्ग मित्र एकत्र शालेय मित्र भेटल्याने बालपनीच्या आठवणी जाग्या झाल्या-शेख जमीरपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
शहरातील इमदादूल उलूम शाळेचे 1995 च्या बॅचचे विद्यार्थी 24 वर्षांनंतर एकत्र आले. आणि त्यांनी गेटटुगेदर कार्यक्रम साजरा केला. शालेय मित्र भेटल्याने बालपनीच्या आठवणींना उजाळा मिळाला असे मत शेख जमीर यांनी व्यक्त केले.
नुकता या शाळेतील 1994-95 च्या वर्षातील वर्ग मित्रांनी एकत्रीत येऊन कार्यक्रम साजरा केला. शाळा सुटल्यानंतर प्रत्येकजन आपआपल्या व्यवसायात व्यस्त असतो. परंतु यानिमित्ताने शाळेतील मित्र भेटल्याचा आनंद वेगळा असतो. सर्व मित्र एकत्रीत येऊन एकमेकांची विचारपुस, चर्चा, गप्पा गोष्टी यामध्ये दिवसभर वेळ घातला.
या वर्ग मित्र मध्ये इक्बाल सर, आयाज सर, अतीख सर, बाखर सर, सिराज सईद, उमर खान, रफिक खदीर, जमाल कादर मतीन, अजाम पाशा (उमरगा), खुदुस (बसवकल्याण), अय्युब (भाल्की), मुस्तजीब (औरंगाबाद), महेबुब सरफराज, मिस्किन जमीर, अजिम खान, शेख जमीर आदी उपस्थित होेते.

संस्कार प्राथमिक शाळेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती या ठिकाणी आज दिनांक 28नोव्हेंबर 2019 गुरुवार रोजी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली 
या वेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपक तांदळे सर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी आनकाडे सर यांची उपस्थित होती 
      या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते बोलताना असे मानले की आपला भारत हा देश मुख्यतः समाज, जाती, धर्म यावर आधारलेला असून याला मुळचा रस्ता दाखवण्यासाठी समाजसुधारकांचे सर्वात मोठे योगदान आहे.या संपूर्ण देशात महाराष्ट्रातील सर्वात जास्त समाजसुधारक होऊन गेले व त्यांचा वारसा आजपर्यंत ग्रंथालयात पुस्तकं द्वारे ग्रंथांद्वारे काव्या द्वारे ते समाज सुधारक आज मानवी जीवनातअमर झाले आहेत.
    असेच एक थोर महात्मा म्हणजेच ज्योतिराव गोविंदराव फुले हे क्रांतीसुर्य महात्मा फुले नावाने प्रसिद्ध हे मराठी लेखक विचारवंत आणि समाज सुधारक होते त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रात श्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली. ही पदवी त्यांना ई. स. 1888 मध्ये मिळाले शेतकऱ्यांच्या हितासाठी "शेतकऱ्यांचे आसूड" हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता.
एवढे बोलून त्यांनी जागा घेतली व नंतर अध्यक्षीय समारोप झाला. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते व त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रचंड लूट
शेतकऱ्यानि रक्ताचे पाणी करून पिकवलेल्या मालाला व्यापारी म्हणतात घाण

-आडते आणि खरेदीदारांची मनमानी, विनोद बोरेंच्या आंदोलनाला शेतकर्‍यांचा पाठिंबा
-शेतकऱ्यांनी दिला कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकास निवेदन.

मेहकर, ता. २८:-  मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रचंड लूट सुरू असून, याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शेतकर्‍यांनी घाम गाळून पिकविलेल्या सोयाबीन या पिकाचे आठ ते दहा ग्रेड पाडल्या जात आहेत. यामध्ये प्रत्येक ग्रेडचे वेगवेगळे भाव ठरवून शेतकर्‍यांचा जीव घेण्याचा प्रकार दिवसाढवळ्या सुरू आहे. पत्रकार व शेतकरी विनोद बोरे यांनी आज सोयाबिनचे 15 पोते आणले असता त्यांची सोयाबीन एम 5 ग्रेडमध्ये टाकण्यात आली. ज्या सोयाबीनला 3700 पर्यंत भाव मिळाला पाहिजे होता, त्याच मालाला 3435रुपये भाव देण्यात आला आहे. विशेष महत्वाची बाब म्हणजे एम 4 या ग्रेडला 3775 प्रती क्विंटल भाव देण्यात आला आहे. दोन ग्रेडमधील फरक हा फार झाला तर शंभर ते दीडशे  रुपये असतो, पण येथे साडेतीनशे रुपयांचा स्पष्ट फरक दिसत आहे. आडते विजय तोष्णीवाल आणि संबंधित खरेदीदाराने शेतकर्‍यांची लूट थांबवावी, यासाठी शेतकर्‍यांंनी 'बळीराजा वाचवा' अशा घोषणा दिल्या. विनोद बोरे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला शेतकर्‍यांनी दिलेला प्रतिसाद पाहून आडते आणि खरेदीदार चांगलेच भांबावून. 

:-- आडत्याच्या हमालाला 20 रुपये पोते आणि ढेर टाकण्यासह 30 रुपये देऊनही मालाची सांडसूंड बंद झालेली नाही. आडतेसुद्धा याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

:-- सीसीटीव्ही कॅमेरे तीन-चार महिन्यांपासून बंद

येथील काही आडतमधील सीसीटीव्ही कॅमेरे गत तीन ते चार महिन्यांपासून बंद आहेत.

भूमिहीन हमालसुद्धा शेतमालाचे मालक होत असल्याचा प्रकार सुरू आहे. शेतमाल सांडून दिवसाला दोन पोतेचे मालक हमाल होत आहेत. हा प्रकार सर्वजण पाहू शकता.रक्ताचे पाणी करून पीकवलेल्या मालाला व्यापारी घाण म्हणून संबोधतात 
   या सर्व समस्या निवारण करण्या साठी मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर येथे शेतकऱ्यांनी एक निवेदन दिले आणि लवकरात लवकर  समस्या सोडवण्याची  मागणी केली.

पुर्णेतील अतिसंवेदनशील दंगलग्रस्त भागातील देशी-विदेशी दारु दुकाने शहरा बाहेर स्थलांतरीत करा...!

पुर्णा शहर बचाव समितीने दिले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्तांना निवेदन

पुर्णा/शहर म्हणजे अतिसंवेदनशिल शहर या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या शहरातील दंगलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य बाजारपेठेतील टिळकरोड,स्वामी दयानंद सरस्वती चौकातील अगदी पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या परवाना धारक देशी-विदेशी वाईन शॉप तसेच देशी दारु अड्डा चालकांच्या मनमानी कारभाराला परिसरातील रहिवास्यांना प्रचंड सहन करावा लागत असून पहाटे ०५-०० वाजेपासूनच परिसरात अक्षरशः तळीरामांची जत्रा भरत आहे.संबंधित परवाना धारक रवि जैस्वाल वाईन शॉप चालक व याच परिसरातील वसंतलाल देशी दारु अड्डा चालक रात्री दारुची दुकाने बंद केल्यानंतर परिसरात बेकायदेशीर देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना दारु साठा पुरवून रात्रंदिवस मद्य शौकीन तळीरामांची यथेच्छ व्यवस्था करित असल्यामुळे परिसरातील रहिवासी तसेच या मार्गासेवरून येणाऱ्या जाणाऱ्या महिला शाळकरी विद्यार्थींनीना तळीरामांच्या अश्लील भाषेचा छेडछाडीला सामोरे जावे लागत असल्याने जनसामान्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन पुर्णा शहर बचाव समितीच्या वतीने दि.२६/११/२०१९ रोजी औरंगाबाद येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्तांना लेखी स्वरुपात निवेदन देऊन दंगलग्रस्त व अतिसंवेदनशील असलेल्या लोकमान्य टिळक रोड,स्वामी दयानंद सरस्वती चौक,जुना मोंढा,महाविर नगर,बसस्थानक रोड परिसरातील परवाना धारक रवि रतनलाल जैस्वाल वाईन शॉप,वसंत जैस्वाल देशी दारु अड्डा,पुजा बिअरबार परमीट रुम,जुना मोंढा परिसरातील सुर्या बिअर शॉपी,विश्वरुपा बिअरबार परमीट रुम,अंबीका बिअर बार परमीट रुम तात्काळ शहरा बाहेर स्थलांतरीत करण्याची मागणी केली असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी परभणी,जिल्हा पोलीस अधिक्षक परभणी,जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक परभणी यांच्यासह पोलीस स्थानक पुर्णाऔ यांना देण्यात आल्या असून या निवेदनावर पुर्णा शहर बचाव समितीचे पत्रकार दिनेश चौधरी,युवा नेते राज नारायनकर,सामाजिक कार्यकर्ते दिनेश सोनकांबळे,रामा पारवे आदींसह परिसरातील तब्बल दोनशें ते सव्वा दोनशे नागरिक व्यापारी तसेच प्रतिष्ठितांसह महिलांच्या स्वाक्षरी आहेत..

महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्याचे डोणगावात जल्लोष डोणगाव:-  २९
येथे बस स्थानक परिसरात   महा विकास   आघाडीच्या  कार्यकर्त्याचा   जल्लोष डोणगावात करण्यात आला महा विकास  आघाडीची सत्ता स्थापन  झाली   असुन  या  ठिकाणी  फटाके फोडून  मिठाई वितरण करून व ढोल-ताशाच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरून जल्लोष केला पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांनी पदाची धुरा सांभाळली तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेत्यांनी मंत्री मंत्रीपदाची शपथ घेतली  यांचा  जल्लोष करू सर्व सर्व  सोनिया गांधी
आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आली नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने जय घोषणा करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हिंदुहुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र भगवा फडकला असून या राज्यांमध्ये  या सत्तेमध्ये सर्वसामान्य जनतेसह जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांना  व सर्वसामान्य जनतेचा न्याय मिळनार  असल्याची  प्रतिक्रिया जि प सदस्य राजेंद्र पळसकर यांनी व्यक्त केली  या प्रसंगी    अॅड  रामेश्वर  पळसकर,पं स सदस्य निंबाजी पांडव , बशीर अहेमद शेख ,राष्ट्रवादी कॉंग्रेस चे  युवा  नेते  संदीप पांडव ,   शिवसेना शहर प्रमुख प्रकाश ममानवतकर युवासेना शहरप्रमुख मुक्तेश्वर काळदाते सरपंच जुबेर खान, दिपक पाटिल आखाडे, अबरार खान मील्ली, हेमराज शर्मा, उत्तमराव परमाळे, काँग्रेस किसान सेल चे तालुका अध्यक्ष विनायक टाले,  अनिल आवटी, कॉग्रेस चे नाजीम कुरेशी ,   मोहन काळे, कॉग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष जैनुल आबेद्दीन, जमील पठाण, सुरेश फिसके, जावेद ठेकेदार, हमीद मुल्लाजी,पत्रकार सचिन गाभणे,कॉग्रेस चे तालुका उपाध्यक्ष जुबेर कुरेशी, यासीन कुरेशी ,जहीर कुरेशी, वसीम खान, यासीन बेग सह
  इतर  शेकडो महा विकास आघाडी चे  कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

जमील पठाण 
8805381333

शासकीय कापुस खरेदीचा जिल्ह्यात 2 डिसेंबरला शुभारंभ                                                            
 पर
भणी, दि. 29 :-हंगाम 2019-20 मध्ये परभणी विभागातील शासकीय कापूस खरेदी सीसीआयचे सबएजंट म्हणून कापुस पणन महासंघातर्फे पाथरी व गंगाखेड येथे सोमवार दि.2 डिसेंबर 2019 रोजी केंद्र शासनाच्या शासनाच्या किंमत आधारभूत किमतीनूसार कापुस खरेदीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कापुस शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीस आणावा. असे आवाहन कापुस पणन महासंघ परभणी विभागाचे संचालक पंडितराव चोखट व विभागीय व्यवस्थापक ए.डी.रेणके यांनी केले आहे.
 कापुस खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना अदा करावयाची रक्कम आरटीजीएस, एनईएफटीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तरी चालु हंगामातील कापुस पेऱ्याची अद्यावत नोंद असलेला सातबाराचा उतारा, बँकचे नाव, बँक शाखा, आयएफएससी कोडसह पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधारकार्डची प्रत व शेतकऱ्यांचा बँकेशी संलग्न केलेला मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रे सोबत आणावेत. 
 शासकीय कापुस खरेदी केंद्रावर फक्त एफएक्यु दर्जाचाच कापूस स्विकारण्यात येणार आहे. एफएक्यु दर्जाच्या कापसाला रुई धाग्याची लांबी, तलमता व आर्द्रता यानुसार भाव देण्यात येईल. 12 टक्के पर्यंत आर्द्रता असलेला कापुस स्विकाहार्य असेल तर यापेक्षा जास्त आर्द्रता असलेला कापुस स्विकारला जाणार नाही. असे महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक, परभणी यांनी कळविले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला अघाडीच्या जिल्हा बैठकिस उपस्थित रहा - संगीता तुपसागर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड येथे दि.02 डिसेंबर रोजी होणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस महिला अघाडीच्या जिल्हा स्तरिय बैठकिस बीड जिल्ह्यातील प्रतेक तालुक्यातील सर्व महिला पदाधिकार्‍यांनी उपस्थित रहण्याचे अवाहन महिला अघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.संगीता तुपसागर यांनी केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले की, या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या तथा माजी आमदार उषाताई दराडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच जिल्ह्यातील नविन कार्यकारणी निवडण्यात येणार आहे. 
 बीड येथिल राष्ट्रवादी भवन मध्ये 02 डिसेंबर रोजी होणार्‍या या बैठकीस जास्तीत जास्त महिला पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांंनी उपस्थित रहावे असेही सौ.संगीता तुपसागर यांनी म्हटले आहे.

निर्भीड पत्रकार संघाची गेवराई तालुक्याची कार्यकारणी जाहीरतालुका अध्यक्षपदी अमोल कापसे तर शहराध्यक्ष पदी शेख उस्मान यांची निवड

गेवराई (प्रतिनिधी) :- निर्भीड पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या पत्रकार संघा ची गेवराई तालुक्याची कार्यकारणी जाहीर झाली असून ही निवड निर्भीड पत्रकार संघा च्या संस्थापक अध्यक्षा सौ.रुचिता मलबारी यांच्या आदेशानुसार तर जिल्हाध्यक्ष शेख तय्यब यांच्या शिफारसीनुसार करण्यातआली. यावेळी गेवराई तालुका अध्यक्ष पदी अमोल कापसे तर शहराध्यक्ष पदी शेख उस्मान यांची निवड करण्यात आली. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात आले.यावेळी तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते. 

याविषयी सविस्तर माहिती अशी की, निर्भीड पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या पत्रकार संघा ची गेवराई तालुक्याची कार्यकारणी जाहीर झाली असून ही निवड निर्भीड पत्रकार संघा च्या संस्थापक अध्यक्षा सौ.रुचिता मलबारी यांच्या आदेशानुसार तर जिल्हाध्यक्ष शेख तय्यब यांच्या शिफारसीनुसार करण्यातआली. यावेळी गेवराई तालुका अध्यक्ष पदी अमोल कापसे,तालुका उपाध्यक्ष पदी शेख सलमान, तालुका सचिव लक्ष्मण आहेर, तालुका कोषाध्यक्ष पदी अजहर इनामदार,तालुका कार्याध्यक्ष पदी अशोक सुरासे, तर शहराध्यक्ष पदी शेख उस्मान, शहरउपाध्यक्ष पदी राजेंद्र चोरमले,शहर सचिव पदी शेख हारून,शहर कार्याध्यक्ष पदी शिवनाथ काळे,शहर संघटक खय्यूम बागवान, मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार राम रुकर, खदिर बागवान यांची निवड करण्यात आली. तर सदस्य पदी भानुदास महानोर,विष्णू राठोड,अशोक मोरे, यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाअध्यक्ष शेख तय्यब तालुका अध्यक्ष अमोल कापसे,शिवनाथ काळे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार शेख मेहबूब,पत्रकार सय्यद कौसर हे उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन खय्यूम बागवान यांनी केले तर आभार प्रदर्शन शेख सलमान यांनी मानले

मास रेसलिंगमध्ये व बेल्ट रेसलिंग मध्ये परळी चे यश

हैद्रबाद येथे राष्ट्रीय स्पर्धा पार पाडल्या :- आंतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  हैद्रबाद येथे पार पडलेल्या राष्ट्रीय खुल्या क्रीडा स्पर्धेत मास रेसलिंग व बेल्ट रेसलिंग या पारंपारीक क्रीडा स्पर्धेत परळी येथील गंगाधरे, तलवारे बंधु व राख आणि गुट्टे यांनी यश संपादन केले.
हैद्रबाद येथे 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यात राष्ट्रीय खुल्या क्रीडा पार पाडल्या.पारंपारिक रेसलिंग व  पेनक्रिएशन असोसिएशन आयोजित खुल्या चॅम्पियनशिप स्पर्धेत येथील योगेश दिलीप तलवारे यांने 40 ते 45 किलो वजनी गटात मास रेसलिंग मध्ये (कास्य पदक) प्राप्त केले.तसेच ऋषीकेश दिलीप तलवारे यांनी60 ते 70 किलो वजनी गटात मास रेसलिंग मध्ये (कास्य पदक) प्राप्त केले. योगेश व ऋषीकेश हे दोघेही जिल्हा परिषद शिक्षक दिलीप तलवारे यांचे मुले आहेत.
गजानन गंगाधरे 45 ते 50 किलो (सुवर्ण पदक), संतोष अक्रुर राख 50 ते 60 किलो वजनी गटात मासरेसलिंग मध्ये (कास्य पदक)प्राप्त केले.तसेच आकाश वैजनाथ गुट्टे यांने 60 ते 70किलो वजनी गटात मासीेसलिंग मध्ये (कास्य पदक) प्राप्त केले.या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक शिवराज तलवारे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
राष्ट्रीय स्पर्धेतील यशामुळे त्यांची निवड अंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
गंगाधरे,तलवारे बंधु,राख व गुट्टे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वस्तरातुन त्यांचे कौतूक होत आहे.

२६/११ दहशतवादी हल्ला : सेना आणि पोलिसांच्या निर्भय सैनिकांसाठी अथर्व फाऊंडेशनला श्रद्धांजलीमुंबई (प्रतिनिधी) :-
           अथर्व फाऊंडेशनच्या निमित्ताने स्वातंत्र्य वीर सावरकर उद्यान मैदानावर आयोजित करण्यात आले होते, यावेळी श्री सुनील राणे (बोरिवलीचे आमदार आणि अथर्व फाउंडेशनचे अध्यक्ष), कर्नल विकास गुप्ता एससी, कर्नल आर.के. एस. चौहान, लेफ्टनंट कर्नल मनोज सिन्हा, मेजर अशोक कौल (सेवानिवृत्त). समन्वयक: कर्नल सुधीर राजे (सेवानिवृत्त); वर्षा राणे विश्वस्त किंवा फाउंडेशन उपस्थित होते.
अथर्व फाउंडेशनतर्फे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सर्वोच्च बलिदान देणारया सैन्य आणि पोलिसांच्या स्काउट्सना सलाम करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. सैन्यात आणि पोलिसांच्या कर्तव्याविषयी आणि सर्वोच्च बलिदान देणार्या सैनिकां विषयी युवकां मध्ये जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आपल्या सैनिकांच्या शौर्याचा अभिमान बाळगण्यास आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून देशाची सेवा करण्यासाठी तरुणांना प्रेरित करणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे. या निमित्ताने आयोजित देशभक्तीपर कार्यक्रमाच्या माध्यमातून शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे. यानंतर देशभक्तीशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.
सुमारे २६/११ दहशतवादी हल्लाः
हे लक्षात घेण्यासारखे आहे की २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला ११ वर्षे झाली आहेत परंतु २६/११ हल्ल्यांच्या भयानक आठवणी अजूनही लोकांच्या मनात ताज्या आहेत, जे अजूनही लोकांना घाबरवतात. २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी दहशतवादी समुद्री मार्गाने मुंबईला आले आणि लोकांवर अंदाधुंद गोळीबार केल्यावर १६६ सामान्य लोक, १८ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले आणि बरेच लोक जखमी झाले. या हल्ल्यात कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. एटीएसचे प्रमुख हे दिवंगत हेमंत करकरे, लष्कराचे मेजर दिवंगत संदीप उन्नीकृष्णन, हवलदार गजेंद्र सिंह, मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त कै.अशोक कामटे, वरिष्ठ पोलिस अधिकारी कै.विजय सालासकर, उपनिरीक्षक स्व.तुकाराम ओंबळे हे काही हल्ले दरम्यान दहशतवाद्यांशी लढले. शत्रूंचा सामना करताना त्याने आपले प्राण अर्पण केले आणि पराक्रमाचे अनन्य उदाहरण ठेवले. यावेळी, भारतीय सेना, एनएसजी कमांडो आणि मुंबई पोलिसांनी त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे लोकांच्या मनातील भीती दूर करून शहराचा आत्मा जिवंत ठेवला. अर्थात या काळात या शूर सैनिकांच्या कुटुंबियांना त्यांच्या चेहर्‍याचा अभाव जाणवला असेल. कदाचित हेच कारण आहे की हे शहर कधीच झोपत नाही आणि अगदी सर्वात गडद अंधारामध्ये अगदी गडद अर्थाने जगते.
कार्यक्रमाबद्दलः दहशतवाद्यांशी लढताना आपल्या बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांच्या कुटूंबियांचा २६ नोव्हेंबर २०१९ रोजी जाहीरपणे सन्मान करण्यात येणार आहे. उल्लेखनीय आहे की अथर्व फाऊंडेशनकडून २६/११ मध्ये शहीद झालेल्या पाच वीरांमधील कथा लोकांसमोर आणल्या जातील. सैन्याशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती मंचावर येतील आणि अशाच ५ सैनिकांच्या प्रेरणादायक कथा त्यांच्या शैलीत सादर करतील. यावेळी, सैन्याच्या प्रत्येक जवानांशी संबंधित एक दृकश्राव्य सादरीकरणही सादर केले जाईल. येथे सादर केलेली देशभक्तीपर गाणी लोकांच्या मनात देशाबद्दल आदर आणि प्रेम भरुन घेतील. या कार्यक्रमात शासकीय, शहीदांच्या कुटूंबाशी संबंधित मान्यवर व शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सैन्यातील माजी जवान, एनएसएस आणि एनसीसीचे विद्यार्थी, पोलिस आणि सामान्य नागरिकही आपले हजेरी नोंदवतील. हा कार्यक्रम आयोजित करणे आपल्यासाठी एक संधी आहे, ज्याद्वारे आपण एकत्र जमून सैन्याबद्दल आपला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करू शकतो. देशाच्या रक्षणासाठी स्वत: च्या जीवाचीसुद्धा काळजी न घेणार्या शूर सैनिकांना श्रद्धांजली देण्याची वेळ आली आहे.
आयोजित या विशेष कार्यक्रमादरम्यान श्री. मुनिमसिंह संतशरणसिंग भदोरिया (दिवंगत लान्स नायक गोपालसिंग भदौरिया एससी यांचे वडील), श्रीमती विनिता बिष्ट (स्व. हवलदार गजेंद्रसिंग बिष्ट एसी यांची पत्नी), श्रीमती अरुणा बापुराव दुर्गुडे (मुंबई पोलिसांचे स्व. उपनिरीक्षक श्री बापूसाहेब) दुर्गुडे एससीची पत्नी, श्रीमती स्नेहलता एम. चौधरी (रेल्वे पोलिसात पोलिस पदक, कै. श्री एम.एस. श्री. चौधरी यांच्या पत्नी), श्रीमती मनिषा अरुण चिट्टे (मुंबई पोलिसांनी अरुण उशीरा कॉन्स्टेबल केसी यांच्या पत्नी) सह चिन्हांकित चिन्हांकित करुन विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित आहेत
अथर्व फाउंडेशन बद्दलः अथर्व फाऊंडेशन सुरू करण्याचे श्रेय फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राणे यांना जाते. या फाउंडेशनचे उद्दीष्ट म्हणजे लोकांना शिक्षित करणे आणि महिला, मुले आणि तरुणांना प्रशिक्षण देणे जेणेकरुन ते स्वाभिमानाने जगू शकतील आणि स्वाव

भारतीय विद्यार्थी सेनाच्या वतीने आतिषबाजी करत आनंद साजरा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शपथ घेताच भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांच्या नेतृत्वाखाली आतिषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर परळी वैजनाथ येथे भारतीय विद्यार्थी सेनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी चौक ,बस स्थानका समोर, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज जय,शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,महाविकास आघाडीचा विजय असो उद्धवजी ठाकरे तुम आगे बडो हम आपके साथ है अशा गगन भेदी घोषणा देत विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांच्या नेतृत्वाखाली आनंद उत्सव साजरा करण्यात आला. 
या वेळी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपप्रमुख मोहन परदेशी, महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेचे आगार अध्यक्ष व्यंकटेश गित्ते,आगार सचिव सचिन राठोड,विद्यार्थी सेनेचे तालुका समन्वयक अमित कचरे,शहर प्रमुख गजनन कोकीळ,संजय सोमाणे,माणिक घुगे,सचिन लोढा,बबन ढेंबरे,लक्ष्मण मुंडे,प्रदीप सावंत,अंबाजी अटपळकर, मोहन गित्ते,प्रसन्ना दहिवाळ,संस्कार पालिमकर, शिवम मोहिते,नवनाथ वरवटकर,सोमनाथ गायकवाड,दयानंद गित्ते, सुनील गुट्टे,राजकुमार हळदे, अशोक चव्हाण, साईराम सोळंके, सिद्धार्थ गायकवाड, योगेश घेवारे,बजरंग औटी,बालाजी सातपुते,प्रकाश देवकर आदि उपस्थित होते.

परळीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांचा अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने सत्कारपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी वैजनाथ पंचायत समितीला  प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मा. महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल गटविकास  अधिकारी संजय केंद्रे यांचा पुष्पगुच्छ व शाल, श्रीफळ  फेटाबांधून सत्कार तसेच केशोड विस्तार अधिकारी , वैजनाथ माने संगणक परीचालक , अमर देशमुख ग्रामीण गृह निर्माण अभियंता यांचा देखील यथोचित सत्कार अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
    यावेळी वारकरी मंडळाचे शहर अध्यक्ष आशोक महाराज काळे, उपाध्यक्ष अविनाश महाराज शिंदे, संपर्क प्रमुख रूक्षराज महाराज अंधळे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी अविनाश लहुरीकर,ग्रह निर्माण प्रशांत कराड, अंगद मस्के ग्रामसेवक, नागरगोजे ग्रामसेवक, कनिष्ठ लिपीक उत्तर मुंडे  सोमनाथ गित्ते, राजेश मुंडे  यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला व पुढील कार्यस कोकाटे महाराज यांनी  शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आधार नोंदणी केंद्र सुरु

 परभणी, दि. 29 :-  सर्व शासकीय कार्यालयात आधार नोंदणी संच सुरु करण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र  राज्य  यांनी दिले असून या उपक्रमाची सुरूवात प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 29 नोव्हें्बर 2019 रोजी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर,  व  पृथ्वीराज बी.पी.मुख्य  कार्यकारी अधिकारी, जिल्हाा परिषद परभणी यांचे हस्ते2 आधार नोंदणी केंद्र स्थापीत करुन करण्यात आली.
          सदर उपक्रमाअंर्तगत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाल लवकरच आधार सेवा केंद्र चालू होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र चालकांना शासकीय कार्यालयात जागा उपलब्ध  करून देण्याआत आलेली आहे. सध्या  जिल्ह्यामध्येय ३० ठिकाणी आधार नोंदणी, अद्ययावती करणाचे काम सुरू आहे. लवकरच जिल्ह्यातील जिल्हा  परिषद, महानगरपालिका, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगर पालिका, नेमून दिलेली महसूल मंडळे इत्याहदी शासकीय कार्यालयात ९० आधार नोंदणी केंद्र चालू होणार आहेत.
          शुन्य ते ५ वयोगटातील बालकांचे आधार नोंदणी पूर्ण केल्याास जिल्ह्यातील आधार नोंदणी १०० टक्के होईल त्याेअनुषंगाने नागरीकांनी आपल्याक शुन्य ते ५ वयोगटातील बालकांची आधार नोंदणी करावी. नवीन आधार नोंदणी नि:शुल्कल आहे व आधार अद्ययावतीकरण करीता रु. ५० शुल्का नियमाप्रमाणेच द्यावेत. नियमाप्रमाणे आधार केंद्रचालक शुल्कव आकारत नसल्याुस तशी तक्रार संबंधित तहसिलदार तसेच जिल्हााधिकारी कार्यालय DIT - ITCELL परभणी यांचेकडे लेखी स्वसरूपात करावी. असे आवाहन डॉ. संजय कुंडेटकर, नोडल अधिकारी आधार प्रकल्पी तथा उपजिल्हांधिकारी (सामान्यि प्रशासन) परभणी यांनी केले आहे.. 
          शुभारंभ कार्यक्रमास अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हारधिकारी, डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हायधिकारी सामान्यन प्रशासन, डॉ. सुचिता शिंदे,उपविभागीय अधिकारी,सुनिल पोटेकर, सुचना व विज्ञान अधिकारी, विद्याचरण कडवकर, तहसिलदार परभणी, नानासाहेब भेंडेकर,अध्यउक्ष महसुल कर्मचारी संघटणा,  निरज धामणगावे, जिल्हास प्रकल्पि व्यावस्थाेपक, नारायण माघाडे, जिल्हाह प्रकल्पर प्रमुख, नरेंद्र आडगावकर, वरिष्ठा सहायक अभियंता, निलेश माकोडे , जिल्हाा समन्वजयक महाऑनलाईन लि. परभणी, अभिजीत तळेगावे, लिपीक जिल्हा सेतु समिती तसेच आधार संच चालक अंगद सावंत व मो. ईद्रीस इ मान्यवर तसेच नागरीक देखील  कार्यक्रमास उपस्थित होते. असे डॉ. संजय कुंडेटकर, नोडल अधिकारी, आधार प्रकल्प  तथा उपजिल्हाकधिकारी सामान्यल प्रशासन,  परभणी यांनी कळविले आहे.

टोनी' चित्रपटाचे पोस्टर्स आणि ट्रेलर विरोधात ख्रिश्चन समाजात रोषमुंबई (प्रतिनिधी) :-  चित्रपट निर्माते विपुल के. 'ख्रिश्चन रिफॉर्म युनायटेड पीपल्स असोसिएशन'च्या सेक्रेटरीने रावल यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली
रिपाम, इक्बाल, मुंबई-वाराणसी एक्सप्रेस जसे की अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटाचे लेखक विपुल के. रावल आता ‘टोनी’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहेत. उल्लेखनीय आहे की या चित्रपटाचे ट्रेलर आणि पोस्टर्स गेल्या आठवड्यातच रिलीज झाले होते. हा चित्रपट चार मनोविज्ञान विद्यार्थ्यांची कथा आहे ज्यांना टोनी नावाच्या सीरियल किलरचा सामना करावा लागला, जो पुजारी ठार केल्याची कबुली देतो. दरम्यान, सिरिल दारा नावाच्या एका व्यक्तीने असा दावा केला आहे की संपूर्ण ख्रिश्चन समुदाय या चित्रपटाच्या ख्रिश्चन समुदायाच्या व्यक्तिरेखेतून खूप रागावला आहे आणि अशा परिस्थितीत चित्रपट निर्मात्याविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
उल्लेखनीय आहे की चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक विपुल के. रावळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, "हा चित्रपट टोनी नावाच्या सीरियल किलरवर आधारित आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटात धार्मिक घटकांचा वापर करणे अत्यावश्यक बनले आहे. माझा चित्रपट सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्मकडे जावा लागेल. सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ला ग्रीन सिग्नल प्राप्त झाला आहे. पोस्टर बदलण्याचा किंवा ट्रेलर परत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. "
पोलिस महिला सिरिल दारा यांच्या म्हणण्यानुसार, "मी एक धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे आणि मी सर्व धर्मांचा समान आदर करतो. या चित्रपटाचे सर्व पोस्टर्स आणि ट्रेलर कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आहे आणि एक भारतीय नागरिक म्हणून मी हे अजिबात सहन करू शकत नाही. यामुळे दोन्ही समुदायाच्या भावना दुखावल्या जात आहेत. चित्रपटातील एक कैथल एक व्यक्ती एक सिरीयल किलर म्हणून प्रस्तुत केले जाते आहे. मी हा चित्रपट उत्पादनशील परत करण्याचा अधिकार नाही आहे की रावल च्या हेतू. आणि त्यांच्या स्वत: च्या छुपा अजेंडा मागे. "
सिरिल दारा यांनी आम्हाला सांगितले की अग्रिपाडा पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी आपली तक्रार नोंदविली आहे आणि तपास सुरू केला आहे, परंतु या संदर्भात ना एफआयआर दाखल झाला नाही ना कुठली एनसी. परंतु या विषयावर बरेच पाळक, बिशप आणि चर्चदेखील त्यांच्याबरोबर उभे आहेत असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या मते, चर्च आणि ख्रिश्चन समुदाय जाहीरपणे निषेध करण्यास तयार आहेत, परंतु ते द्वेषाच्या बाजूने नाहीत आणि म्हणूनच त्यांनी असा निषेध आत्तापर्यंत थांबविला आहे. तो म्हणतो की या कारणास्तव तो कायदेशीर आणि शांततेने चित्रपट न दाखविण्याच्या बाजूने आहे.
ख्रिश्चन समुदाय आणि चित्रपट निर्माते विपुल के. रावल यांच्यातील ही लढाई मिटण्याची आशा नाही. विपुल म्हणतात, "सर्वप्रथम, माझ्या पोस्टर्समुळे संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या नाहीत, तर त्याबद्दल नाराजी व्यक्त करणार्‍या लोकांच्या एका छोट्या गटाला, ज्यांना माझ्या सर्जनशीलतावर आधारित स्वस्त प्रसिद्धी मिळवायची आहे." जर सिरिल दारा असा दावा करीत आहे की बरेच पास्टर त्याच्याबरोबर आहेत, तर तो वैयक्तिकरित्या मला या सर्वांची नावे विचारण्यास का विचारत आहे? मी वैयक्तिकरित्या ट्रेलर सर्वांना दाखवित आहे मी विचारण्यास तयार आहे आणि उत्सुक आहे की या ट्रेलरमध्ये त्यांना काय चुकीचे वाटले हे जाणून घेण्यास मी तयार आहे. गरज भासल्यास मी यावर वादविवाद करण्यासही तयार आहे. मी त्यांना कोणत्याही प्रकारच्या निष्कर्षापूर्वी येण्याची विनंती करतो. ते येऊन चित्रपट पाहतात. जोपर्यंत कोर्टाने मला काही मार्गदर्शक सूचना दिली नाही तोपर्यंत मी चित्रपटात कोणताही बदल करणार नाही, यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात जावे. मी लढण्यासही तयार आहे. "
'टोनी' हा चित्रपट मनोविज्ञानच्या चार विद्यार्थ्यांची कथा आहे जे चर्चच्या मिठाईच्या बॉक्समध्ये कॅमेरा चोरतात. मग या कॅमेर्‍यामध्ये केलेल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्यांना कळले की एका सीरियल किलरने एका हत्येबाबत कबुली दिली आहे. जेव्हा टोनीला स्वत: चा सामना आला तेव्हा या चौघांच्या जीवनाला एक विचित्र वळण लागले आणि मग ते सर्वजण त्याच्याबरोबर लोकांना मारण्यासाठी बाहेर पडले. या चित्रपटात यशोधन राणा, अक्षय वर्मा, मनोज चंदलिया, महेश जिलोवा मुख्य भूमिकेत आहेत. मनोज चंडिलामध्ये कबीर चिलवाल, जिनल बेलानी दिसणार आहेत. उल्लेखनीय आहे की हा चित्रपट विपुल के. रावल यांनी लिहिले आहे, निर्मित आणि दिग्दर्शन केले आहे.

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान: जिल्ह्य़ात द्वितीय क्रमांक पटकावलेल्या टोकवाडीची विभागिय स्तरासाठी तपासणी ; विभागिय तपासणी पथकाकडून समाधान व्यक्त

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
        प्रत्येक सार्वजनिक कार्यात आपल्या सामाजिक जाणिवा दर्शवत काम करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रमांची जोड देत गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेल्या टोकवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या कामातही आपला ठसा उमटविला आहे.संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात बीड जिल्ह्यातून टोकवाडी ग्रामपंचायतने  द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे.या पार्श्वभूमीवर विभागस्तरावरील पारितोषिकासाठी नुकतीच टोकवाडी येथे तपासणी करण्यात आली. विभागीय तपासणी पथकाकडून यावेळी  समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
       टोकवाडीच्या सरपंच सौ. गोदावरी राजाराम मुंडे यांच्या माध्यमातून गावातील विविध विकासात्मक बदल मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य डाॅ. राजाराम मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली टोकवाडी येथे सामाजिक,शैक्षणिक, भौतिक सुविधा, स्वच्छता, शालेय गुणवत्ता आदी सर्वदृष्टीने सातत्यपूर्ण अभिनव उपक्रम राबवत सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न असतो.या अनुषंगानेच स्वच्छतेबाबत जाणीव जागृती बरोबरच घंटागाडी व दैनंदिन स्वच्छता विषयक व्यवस्थापन करत टोकवाडी ग्रामपंचायत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून अव्वल ठरलेली आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१८-१९ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर अव्वल ठरलेल्या ग्रामपंचायतींची  विभागस्तरावर निवड करण्यासाठी विभागीय परिक्षण समितीच्या वतीने तपासणी दौरा काढण्यात आला होता. या अंतर्गत  टोकवाडी ग्रामपंचायतीची पहाणी व तपासणी करण्यात आली.
        यावेळी तपासणी पथकातील उप सहाय्यक आयुक्त सौ.सुपेकर मॅडम, पथकातील सहभागी सदस्य कुलकर्णी साहेब, येवले साहेब , घुमरे साहेब, बीड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काकडे साहेब, वाणी मॅडम, जि.प.बांधकाम उप अभियंता नागरगोजे साहेब, बाभळे साहेब, जाधव साहेब, श्रीमती देशमुख, डी.एम.होळबे, अशोक नागरगोजे  पंचायत समिती कर्मचारी राहुल दुबे, कुणाल मुंडे, शेख एम.एच. वचारे, वडमारे आदींनी पहाणी केली. या वेळी तपासणी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत पंचायत समितीचे उपसभापती बालाजी (पिंटु) मुंडे, सरपंच सौ. गोदावरी राजाराम मुंडे, उपसरपंच मंदाकिनी संदिपान काळे,  सर्व ग्रा. प. सदस्य  यांनी केले. याप्रसंगी गावातील तरुणवर्ग, जेष्ठ नागरीक, सर्व शिक्षकवृंद, वर्धिनी ताई,ग्रामसंघ अध्यक्ष, स्वच्छताग्रही, बचत गट महिला मंडळ, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

रामेश्वर विद्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम संपन्न
सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २९ _ तालुक्यातील रामेश्वर विद्यालय सिंदखेड येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम घेण्यात आला. आरोग्य विभाग बीड येथील अधिकारी डॉ.अजयकुमार राख (जिल्हा कार्यक्रम अधिकारी,बीड) यांनी मधुमेह या रोगाची लक्षणे काय आहेत हा रोग कशामुळे होतो हा रोग आपल्याला नाही होणार या वर उपाय कशा पद्धतीने करावा या विषयी मार्गदर्शन केले.
          श्री.सुरेश दामोदर (सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बीड) यांनी तंबाखूजन्य पदार्थाचे तंबाखू,धूम्रपान,गुटखा या पदार्थचे सेवन केल्यावर मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देऊन व्यसना पासून आपण दूर राहावे आपले घरचे मित्र नातेवाईक यांंना या वेसना पासून दूर कस ठेवायचे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर व्यसनमुक्ती विषयी शपथ देण्यात आली. श्री.संतोष हरणमारे (कार्यक्रम समन्वय जिल्हा रुग्णालय बीड ) यांनी मानवी जीवनात विप्स गोळ्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तंबाखूजन्य पदार्थाचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर विद्यालयात मुला मुलींची वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत चि. येवले दत्ता परसराम (प्रथम), कु.करांडे नम्रता रामराव (दितिय), कु. बांगर तेजस्विनी पांडुरंग (तृतीय) आले. या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते (स्कूल बॅग) बक्षिस देण्यात आली. त्याच बरोबर विद्यालयास राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अंतर्गत ट्राँँफि देण्यात आली.
    कार्यक्रमाच्या अध्यक्ष विद्यालयाचे सचिव/मुख्याध्यापक श्री.संभाजी (दादा) करांडे सर हे होते तसेच विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.बांगर सर यांनी केले तर मान्यवरांचे आभार शेरकर सर यांनी मानले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याबद्दल अंबाजोगाईत आनंदोत्सवअंबाजोगाई (प्रतिनिधी) :-  महाराष्ट्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होवून मुख्यमंत्रीपदी उद्धवजी ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील सहा नेत्यांनी गुरूवार,दि.28 नोव्हेंबर रोजी मुंबईत शिवतीर्थावर शपथ घेतली.हा शपथविधी सोहळा नयनरम्य व दिमाखदार होता. प्रचंड संख्येने लोक शिवतीर्थावर जमा झाले होते.शपथविधी होवून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याबद्दल बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी एकत्र येत येथील सावरकर चौकात फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

अंबाजोगाई शहरातील सावरकर चौक येथे बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विष्णुपंत सोळंके,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औंदुबर मोरे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक बबनराव लोमटे,नगरसेवक मनोज लखेरा,बीड जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नंदकिशोर सोमवंशी, अॅड.घोगरे,नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक वाजेद खतीब,
नगरसेवक धम्मा सरवदे,
नगरसेवक आसेफोद्दीन खतीब,
राणा चव्हाण,माजी नगरसेवक सुनिल वाघाळकर,माजी नगरसेवक खालेद चाऊस,
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शेख मुनवरभाई, कचरूलाल सारडा,दिनेश घोडके,शेख खलील,प्रमोद गवळे,सुगत सरवदे,खंडेराव टेमकर,सचिन जाधव,शेख खलील,विकास देशमुख,शेख जावेद,भारजकर,पसारकर, सुशील जोशी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी एकत्र येत येथील सावरकर चौकात फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

महाविकास आघाडीचे सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सरकार-राजकिशोर मोदी

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा खा.सोनियाजी गांधी,माजी अध्यक्ष खा.राहुलजी गांधी यांचे मार्गदर्शनाखाली व
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेबजी थोरात,माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण, आ.अमितजी देशमुख, आ.धिरजजी देशमुख यांच्या सहभागाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचा सहभाग सदरील सरकार मध्ये आहे.जनतेच्या हिताचे हे सरकार असेल बीड जिल्ह्यातील शेतकरी,शेतमजुर यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी हे सरकार कटीबद्ध ठरणार आहे.परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.या शेतकर्‍यांना भरीव मदत देवून सहकार्य करण्याचे काम हे सरकार करेल. समाजातील बेरोजगार युवक, युवती यांना रोजगार उपलब्ध होईल.विकासाच्या अनेक संधी निर्माण होतील.बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी व मराठवाड्यात वॉटरग्रीड द्वारे हक्काचे पाणी मिळविण्यासाठी हे सरकार काम करेल असा विश्‍वास वाटतो.आगामी काळात हे सरकार जनतेची स्वप्ने व विकासाच्या प्रश्‍नांची सोडवणूक करेल यात तिळमात्र ही शंका नाही.

नागरिकांना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात डिजिटल डिस्प्ले सिस्टीमचा शुभारंभजिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी केली पाहाणी
विविध योजना आणि शासनाच्या निर्णयांची मिळेल माहिती

बीड (प्रतिनिधी) :-  जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात डिजिटल डिस्प्ले सिस्टीमची उभारणी करण्यात आली आहे याद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या जनतेला शासनाच्या योजनांची तसेच शासनाच्या विविध विषयांची माहिती मिळू शकणार आहे . जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती बाहेर हा भव्य स्वरूपातील डिजिटल बोर्ड उभा करण्यात आला असून त्यावर संगणकीय प्रक्रियेद्वारे सदर बदलता मजकूर देण्यात येणार आहे .यामध्ये विविध विषयांची माहिती ध्वनि चित्र पद्धतीने प्रदर्शित केली जाईल.
जिल्हाधिकारी श्री पाण्डेय यांनी याची आज पाहणी केली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आढाव पाटील उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर आणि श्री महेश गोले उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितास नागरिकांसाठी आवश्यक व महत्वपूर्ण माहिती देण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग करावा असे सांगितले .

शेतकरी वा गरीब व्यक्ती यांच्यासोबत बँकांनी सलोख्याची वागणूक द्यावी

बीड (प्रतिनिधी) :- 
बँक ही नागरिकांसाठी आशेचा किरण असते, अशा व्यापक अर्थाने बँकेची भूमीका ही समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. शेतकरी, मध्यमवर्गीयासह गरीब हे अनेक संघर्ष करत, शेवटचा मदतीचा आशेचा किरण म्हणून ते बँकेच्या दिशेने वाटचाल करतात त्यांच्यासमवेत बँक कर्मचाऱ्यांनी सलोख्याची वागणूक द्यावी, त्यांना समस्या ऐकूण घेऊन सोडवणूकीचे मार्गदर्शन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
        शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने बँकांच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी चावडी (बँक इन्फो) एक दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाीटन जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास स्टेट बँकेचे उपमहाप्रबंधक रवीकुमार वर्मा, क्षेत्रीय प्रबंधक नदंकिशोर भोसले, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण, व्यवस्थापक संम्राट उपस्थित होते.

       जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले, स्टेट बँक ही देशामधील सर्वात मोठी बँक म्हणून कार्य करणारी आहे. बीड जिल्ह्याच्या संदर्भात बोलायचे झाल्यास मागील दोन-तीन वर्षापुर्वी या बँकेकडून शेतकरी कर्ज वाटपाचा टक्केवारी ही शंभर टक्के पूर्ण केलेली आहे. शेतकरी असो व इतर व्यवसायीकांनाही बँकेकडून चांगल्या प्रकारची सेवा दिली जात आहे. मात्र सध्य परिस्थितीमध्ये पहायचे झाल्यास निसर्गाचा असमतोल मुळे शेतकरी हा मोठ्या अडचणीत साडपत आहे. त्यामुळे शेतकरी असो कि कोणी गरीब हे अनेक संकटांना सामोरे जात आहे. त्यांना  या परिस्थितीमध्ये बँक हीच एक मदत व आशा घेऊन येतात यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी बँकेमध्ये येणाऱ्या शेतकरी, गरीब, किवा अन्य ग्राहकांशी बँक कर्मचाऱ्यांनी सलोख्याची वागणूक द्यावी. त्यांच्यासमवेत चर्चा करुन प्रश्न सोडवणूकीविषयी त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. त्यामुळे वादाचे प्रकार कमी होतील आणि बँकेची ख्याती वाढेल असेही त्यांनी आवाहन उपस्थितांना केले. यावेळी उपमहाप्रबंधक रवीकुमार वर्मा यांनी मार्गदर्शन केले तर क्षेत्रीय प्रबंधक नदंकिशो भोसले उपस्थितांचे आभार मानले.

जिल्हाधिकाऱ्यांनी विविध स्टॉलला दिल्या भेटी
स्टेट बँकेच्या चावडी कार्यक्रमातंर्गत वीस प्रकारचे विविध योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉलची उभाणी करण्यात आलेली आहे. या स्टॉलला जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी भेट देऊन विचारणा केली. दरम्यान महिला बचत गटाच्या वस्तूंची पाहणी केली तसेच महिला बचत गटाने तयार केलेल्या धपाटे – दहीचाही जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी आस्वाद घेऊन गटाच्या महिलांना प्रोत्साहन दिले.

हेळंब येथे श्री. खंडोबा यात्रेची जय्यत तयारी सुरू!हेळंब येथील खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

2 ते 4 डिसेंबर दरम्यान यात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हेळंब येथील प्रसिध्द खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असुन चार्तुमासातील रविवारी भाविकांची ही गर्दी हजारोंच्या संख्येने होत आहे. दि.०२ डिसेंबर रोजी मोठी यात्रा भरणार असुन यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
हेळंब येथील खंडोबाचे देवस्थान प्रसिध्द असुन मुंबई, पुणे, औरंगाबाद, हैद्राबाद आदी भागातुन भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. मागील चार महिन्यापासुन प्रत्येक रविवारी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. दरवर्षी चंपाषष्ठीला तीन दिवशीय यात्रा भरत असते. यावर्षीही यात्रा २ डिसेंबर रोजी येत आहे.    

          तालुक्यातील हेळंबच्या श्री खंडोबाची यात्रा दि. 02 ते 04 डिसेंबर 2019  दरम्यान होणार आहे.  यात्रेची जोरदार तयारी सध्या  सुरु आहे. या ठिकाणी दरवर्षी यात्रेला  मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. यात्रेच्या पार्श्‍वभुमीवर हेळंब येथे  घरोघरी भाविक व नातेवाईकांच्या स्वागताची तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. दररविवारी ही या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी असते.   हेळंब येथे श्री. खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला इथे  मोठी यात्रा भरते. याहीवर्षी ही यात्रा जोरदार होणार आहे. यात्रा जवळ आली असुन यात्रेची जोरदार तयारी सुरु आहे. नवसाला पावणारा खंडेराया अशी या देवसस्थानची पंचक्रोशीत ओळख आहे. परिसरातील गावोगावचे नागरिक दर्शनासाठी, नवस करण्यासाठी व नवसाच्या पुर्तेतेसाठी येथे गर्दी करीत असतात. या पार्श्‍वभुमीवर ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छतेसह इतर तयारीला वेग आला आहे. यात्रे निमित्त गावामध्ये दि. 02 ते 04 डिसेंबर या कालावधीत श्रींची पालखी मिरवणुक, शोभेची दारु आदींसह कबड्डी स्पर्धा, कुस्त्या व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहेत. 
        श्री खंडोबाचे मंदिर हे हेळंब गावापासून  पासुन १ किलोमिटर अंतरावर असुन रस्त्याची डागडुजी व सुशोभिकरण करण्यासाठी नागरिक सरसावले आहेत.  श्रींच्या मंदिराची रंगरंगोटी करण्यात येत  असुन विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. गावातील युवक व खंडोबा भक्त यात्रेच्या तयारीला लागले आहेत. घरोघरी मोहरवासिनी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्या स्वागताचीही तयारी सुरु आहे. कामा निमित्त बाहेर गावी गेलेले नागरिकही यात्रेनिमित्त आवर्जुन गावाकडे येतात. दरम्यान पंचक्रोशीतुन मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. यात्रेची तयारी सुरू असुन यात्रोत्सव काळात लागणार्‍या सुविधा व येणाऱ्या भाविकभक्तांची सोय करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत व गावकरी तयारी करत असल्याचे सरपंच लक्ष्मीबाई होळंबे व उपसरपंच सौ.लक्ष्मी राम पाळवदे यांनी सांगितले आहे.

आदरणीय व प्रिय उद्धवजींना मनस्वी शुभकामना - पंकजा मुंडेंनी व्यक्त केल्या भावनापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
      ठाकरे व मुंडे परिवारातील राजकारणा पलीकडे असलेले नाते लक्षात घेता उद्धव ठाकरे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना पंकजा मुंडे यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ट्विटरवरून शुभेच्छा देताना पंकजा मुंडे यांनी "आदरणीय व प्रिय उद्धवजींना मनस्वी शुभकामना" अशा शब्दात आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.   
    राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान माजी मंत्री व भाजपाच्या सुकाणु समितीतील (कोअर कमेटी) एक महत्त्वपूर्ण सदस्य असलेल्या पंकजा मुंडे यांच्या प्रतीक्रीया कडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. ठाकरे आणि मुंडे परिवारातील राजकारणा पलीकडे नाते सर्वांनाच ज्ञात आहे. उद्धव ठाकरे हे पंकजा मुंडे यांना बहीण मानतात. त्यामुळे हा पारिवारिक स्नेह जपत पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की "आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!! एका ठाकरेनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले..हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे 'राज्याचे हित प्रथम '!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!' आदरणीय बाळासाहेबांच्या स्वप्नांना व मराठी माणसाला असलेल्या अपेक्षा आपण पूर्णत्वाकडे घेऊन जाल हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!"

पिक विमा प्रश्नी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्नबीड (प्रतिनिधी) :- 
गेल्या वर्षी कमी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अद्यापही विमा न मिळाल्यामुळे आज  जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी ओरिएन्टल इन्शूरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जोशी यांच्यासमवेत शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेतली.  २०१८-१९ मधील खरीप हंगामातील विम्याचा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. येत्या १४ ते १५ डिसेंबरपर्यंत शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ यामुळे मिळू शकणार आहे.
गेल्या वर्षीच्या अर्ज त्रुटींमुळे शेतकर्‍यांचा खरीपाचा विमा मिळाला नव्हता. वारंवार पूर्तता अर्ज  केल्यानंतरही बीड जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांना विमा मिळाला नाही व  अद्यापही  शेतकरी खरीपाच्या विम्यापासून वंचित आहेत. ही बाब जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी गांभीर्याने घेतली. त्या अनुषंगाने ओरिएन्टल इन्शूरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जोशी यांना बीड येथे त्यांच्यासमवेत बैठक घेतली. जे शेतकरी खरेच विम्यासाठी पात्र ठरतील अशा शेतकर्‍यांच्या खात्यावर १४ ते १५ डिसेंबरपर्यंत विम्याची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती देण्यात आली. या बैठकीला अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम यांच्यासह ओरिएन्टल इन्शूरन्स कंपनीचे अन्य अधिकारीही उपस्थित होते.

या आपले शहर घडवूया उपक्रमा अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल स्वच्छता मोहिमेतील शनिवारी दुसरा टप्पा

शहरवासीयांनी सहभागी होण्याचे आवाहन 

बीड :- 