तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 November 2019

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या बळकटीकरणासाठी ‘कलम 10 ड’ अन्वये सुधारणा - नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे


अमरावती, दि. 8 : नोंदणी व मुद्रांक विभाग हा जनतेच्या मलम

त्ता व्यवहारांचे अभिलेखन करणे व मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात महसूल गोळा करण्याचे काम करतो. याअनुषंगाने प्रत्येक दस्तऐवजाची नोंदणी, मुल्यांकन निश्चिती, सत्यप्रती काढणे, दस्त नोंदीचा शोध घेणे व विवाह नोंदणी आदी कामाबाबत हा विभाग नागरिकांना सेवा देतो. या नागरी सेवा कामांमध्ये अधिक सुसुत्रता व पारदर्शकपणा निर्माण होण्यासाठी तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाची प्रभावी अमंलबजावणी होण्याच्या दृष्टीने ‘कलम 10 ड’ अन्वये सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. प्रभारी जिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, मनपा आयुक्त संजय निपाणे, नोंदणी उपमहानिरीक्षक सी. बी. भुरकुंडे, अमरावतीचे नोंदणी उपमहानिरीक्षक मोहन जोशी यांचेसह विभागातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी, लीड बँक मॅनेजर एन के. झा, बँक अधिकारी, सेवा पुरवठादार आदी यावेळी उपस्थित होते
श्री कवडे म्हणाले की, शासनास मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात मिळणाऱ्या महसूलाची चुकवेगिरी होवू नये व सर्व प्रकारच्या दस्तऐवजांवर मुद्रांक शुल्काची यथोचित वसुली होण्यासाठी मुद्रांक अधिनियमाच्या कलम 10 ड मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहे. यासंदर्भातील व्यवहाराचे दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्क वसून करण्याची जबाबदारी प्रशासकीय विभाग, बँका तसेच वित्तीय संस्थावर सोपविण्यात आली आहे. आज आयोजित कार्यशाळेत प्रत्येक व्यवहाराच्या दस्त नोंदणी व त्याअनुषंगाने वसूल करावयाची मुद्रांक शुल्क याविषयी सादरीकरणाच्या माध्यमातून सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आलेल्या प्रश्न व शंकाचे निरसन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम आणि नोंदणी अधिनियम 1908 नुसार प्रत्येक दस्ताची नोंद करणे अनिवार्य आहे तसेच त्याअनुषंगाने नियमानुसार मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे. मुद्रांक अधिनियमातील कलम 3, कलम 33, कलम 34 व कलम 10 ड अन्वये कायद्याच्या महत्वपूर्ण तरतुदीविषयी नागरिकांनी जाणून घेतले पाहिजे.  नोंदणी अधिनियम 1908 मधील कलम 17 नुसार मृत्युपत्र वगळता रुपये शंभरच्या वरील किमतीच्या हस्तांतरणाच्या सर्व व्यवहाराच्या दस्तांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर कलम 49 अन्वये नोंदणी आवश्यक दस्तांची नोंदणी केली नसल्यास त्यामध्ये नमूद स्थावर मालमत्तेवर त्याचा कोणताही परिणाम किंवा असा अधिकार प्रदान करणाऱ्या कोणत्याही व्यवहाराचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही असे सूचीत केले आहे.
नोंदणी ऐच्छीक असलेल्या दस्तामध्ये मृत्युपत्र, कार्यकंत्राट, टीडीआर हस्तांतरणाचे दस्त, किवसन करार, हडपतारण, हक्कलेख निक्षेप, प्रतिभूती बंधपत्र, मुखत्यारपत्र इत्यादी दस्तांचा समावेश आहे. कार्यशाळेत मुद्रांक शुल्क भरण्याची पध्दत याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ई चालन व्दारे अमर्यादीत रक्कमे पर्यंतचे मुद्रांक शुल्क भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. स्टॅम्प पेपर, फॅ्रकींग, ग्रास इएसबीटीआर, ई चलान  आदीव्दारे करण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्क भरणामध्ये सुसुत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी कलम  10 ड अनुसार सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती श्री. कवडे यांनी दिली.
कलम 10 ड नुसार वित्त संस्थेने करावयाची कार्यवाही, कलम 10 ड अन्वये प्राधिकृत अधिकाऱ्याने करावयाची कार्यवाही, ग्रास प्रणालीव्दारे प्राधिकृत अधिकाऱ्यास पुरविण्यात येणारा युजर आयडी व पासवर्ड, प्रत्येक मालमत्ता खरेदीचे बाजार मुल्य व दस्त नोंदणी शुल्क तसेच मुद्रांक शुल्क चुकविल्यामुळे शिक्षा व दंडाच्या तरतूदी, विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधा याविषयी सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली.


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment