तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 November 2019

शेतकरी बांधवांच्या मुलांना (विद्यार्थ्यांना) शैक्षणिक शुल्क़ 100 टक्के माफ करा व बुलडाणा जिल्हा

 ओला दुष्काळ जाहीर

करा बुलडाणा जिल्हा एन.एस.यु.आय.तफें जिल्हाअधिकारी यांना निवेदन...

बुलडाणा:- संपूर्ण महाराष्ट्रात आवकाळी पावसाने धुमाकुळ घातला असुन ओला दुष्काळ सध्दृश्य़ परिस्थीती निर्माण झाली आहे. शेतक-यांचे 100 टक्के शेतीचे संपूर्ण महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. यावर्षी हाताशी आलेले पिक वाया गेले आहे. त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला असुन पुढील विवंचणेत अडकला आहे. शेतक-यांना आपल्या मुलांना शिकविण्यासाठी शेतीच्या जिवावर बॅकेतुन शैक्षणिक कर्ज काढले आहे. तर त्यांचा इतर खर्च पण त्यावर अवलंबुन होता. अनेक शेतक-यांची मुले शिक्षणासाठी मुंबई पुणे या सारख्या शहरात शिक्षणासाठी गेले आहेत. त्यांच्या गरजा कशा पुर्ण करायच्या, त्यांचे शैक्षणिक शुल्क़, परिक्षा शुल्क़ कशा भरायचे याच्या चिंतेत तमाम शेतकरी आडकला आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांनी आपल्या मुलांसाठी बँकेतून काढलेले कर्ज शंभर टक्के माफ करावे. त्याचप्रमाणे शैक्षणिक शुल्क़, परिक्षा शुल्क़, वस्तीगृह शुल्क़ सरकारने माफ करावे व शेतक-यांच्या व विद्यार्थ्यांच्या पाठी -मागे उभे राहून सरकारने मदत करावी अशी मागणी बुलडाणा जिल्हा एन.एस.यु.आय.च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी  बुलडाणा एन.एस.यु.आय.चे जिल्हाअध्यक्ष मा.शैलेश खेडकर, एन.एस.यु.आय.चे जिल्हा सरचिटणीस प्रदिप मोरे ,ज्ञानेश्वर बावने,
, सुनील बरडे, अश्विन जाधव ,गौरव बाविस्कर ,दत्ता सरोदे ,सुशिल सोनुने ,आदेश कांडेलकर, व आदि बुलढाणा जिल्हा एन.एस.यु.आय.चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

No comments:

Post a Comment