तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 November 2019

उडिद, मुंग व सोयाबीन खरेदीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी करावी-जिल्हा पणन अधिकाऱ्याचे आवाहन
बुलडाणा,9 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडच्यावतीने उडीद, मुंग व सोयाबीन शेतमालाची खरेदी शेतकऱ्यांकडून करण्यात येणार आहे. ही खरेदी केंद्र शासनाच्या हमी भावानुसार होणार आहे. उडीद शेतमालासाठी प्रति क्विंटल 5700 रूपये, मुंगासाठी 7050 प्रति क्विंटल आणि सोयाबीनकरीता प्रति क्विंटल 3710 रूपये हमीभाव असणार आहे.  तरी शेतकऱ्यांनी उडीद, मुंग व सोयाबीन शेतमाल आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत देण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.                                                             …………………………
तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करा

-   कृषी  व जलसंधारण सचिव एकनाथ डवले
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
बुलडाणा, दि. 9 : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार अवकाळी व परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. यामुळे शेतकरी बांधवाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान  झाले आहे. अशा परिस्थितीत विमा काढलेल्या पिकांची व विमा न काढलेल्या पिकांसाठी करण्यात येत असलेले पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करा व नुकसानग्रस्त कुणीही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी  असे निर्देश  कृषि, मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी आज दिले.
   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीक नुकसान पंचनाम्या संदर्भातआढावा बैठकीचे आयोजन आज 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ निरूपमा डांगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक श्री. लहाने आदी उपस्थित होते.
   विमा कंपनीने कृषि, महसूल विभागशी समन्वयाने काम करीत विमा क्लेम तातडीने पूर्ण करावे  . झालेल्या नुकसानीची गंभीरता लक्षात घेऊन  नुकसान झालेल्या विमा संरक्षीत प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई दमिळेल याची दक्षता घ्यावी. विमा कंपनीने   शेतकऱ्यांच्या समस्या असल्यास त्यांचे निराकारण तातडीने निराकरण करावे असे श्री डवले यांनी सांगितले. या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामाचे क्षेत्र दुपटीने  वाढणार असल्याची माहिती श्री नाईक, जिल्हा कृषी अधीक्षक यांनी सांगितले
 श्री. डवले यांनी, वाढत्या रब्बी क्षेत्राला पुरेल एवढे बियाणे व खताचे नियोजन करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.  त्यामुळे शेतकऱ्यांना पर्याप्तरित्या बियाणे व खते रब्बी हंगामासाठी मिळतील. महावितरणने रब्बी हंगामात विजेचा व्यवस्थित पुरवठा होण्यासाठी नादुरूस्त रोहीत्रांची दुरूस्ती  तातडीने करून घ्यावी. जेणेकरून शेतकऱ्यांना रोहीत्र नादुरूस्त असल्यामुळे विज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकाराला सामोरे जावे लागणार नाही. याप्रसंगी संबधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment