तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 November 2019

खडकपूर्णा प्रकल्पाची 19 दरवाजे उघडली ; 1 लाख 7 हजार 919 क्युसेकचा विसर्ग खडकपूर्णा नदीवरील डाव्या व उजव्या तिरावरील 19 गावांना सतर्कतेचा इशारा  बुलडाणा, दि. 2 : जिल्ह्याडकपूर हा मोठा प्रकल्प 100 टक्के भरला आहे. त्यामुळे धरणात पाण्याचा येवा लक्षात घेता धरणाचे संपूर्ण 19 दरवाजे उघडण्यात आली आहेत. सध्या नदीपात्रात 1 लक्ष 7 हजार 919 क्युसेकचा विसर्ग खडकपूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तरी नदीतील पूर विसर्गामुळे नदीच्या डाव्या व उजव्या तिरावरील 19 गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
    दे.राजा, सिं.राजा व लोणार तालुक्यातील खालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या उजव्या तिरावरील गावे : टाकरखेड भागीले, निमगांव गुरू, सावंगी टेकाळे, साठेगांव, डिग्रस खुर्द, निमगांव वायाळ, हिवरखेड, राहेरी खुर्द, राहेरी बुद्रुक, ताडशिवणी व देवखेड. नदीच्या डाव्या तिरावरील गावे : डिग्रस बु, टाकरखेड वायाळ, तडेगांव, पिंपळगांव उंडा, लिंगा, खापरखेडा, सावरगांव तेली.  त्याचप्रमाणे नदीपात्रातील विसर्गामुळे दे.राजा ते चिखली राज्य महामार्ग क्रं 176 वरील टाकरखेड भागीले गावाजवळ रस्ता बाधीत होतो. तसेच रोहणा – किनगांव राजा रस्ता, डिग्रस बु जोडरस्ता, डिग्रस खुर्द जोडरस्ता, राहेरी खुर्द जोडरस्ता, मुंबई – नागपूर राज्य महामार्गावरील राहेरी बु. गावाचे आगमनाजवळील रस्ता, रूम्हणा –देवखेड रस्ता, ताडशिवणी जोडरस्ता, दुसरबीड – लिंगा इतर जिल्हा मार्ग, सावरगांव तेली – खापरखेड जोडरस्ता, भुमराळा – वझर आघाव जोडरस्ता, वझर सरकटे – भवन रस्ता, वाघाळा – इंचा रस्ता, कानडी जोडरस्ता, किरला – दुधा रस्ता, मंठा – लोणार या राज्य महामार्गावर सासखेडा गावाजवळील रस्ता, लिंबखेड – हनुवतखेड – उसवद रस्ता, वझर भामटे – सायखेड रस्ता, वझर कुटे जोडरस्ता तसेच तळणी – कापडशिंगी रस्ता पुरामुळे बाधीत होण्याची शक्यता आहे, असे बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून कळविण्यात येत आहे.
================
जिल्हाधिकारी कार्यालयात
4 नोव्हेंबर रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, दि. 2 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन यावेळी सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत.
तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

==============
पालकमंत्री डॉ संजय कुटे यांचा दौरा
  बुलडाणा, दि. 2 : राज्याचे कामगार मंत्री तथा बुलडाणा जिल्हा पालकमंत्री डॉ. संजय कुटे 3 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : 3 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 12 वा जळगांव जामोद येथून नांदुरा तहसिल कार्यालयाकडे प्रयाण, दु 1 वाजता तहसिल कार्यालय, नांदुरा येथे आगमन व प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत पिक नुकसानीसंदर्भात बैठकीस उपस्थिती, दु 1.30 वा नांदुरा येथून मोताळा तहसिल कार्यालयाकडे प्रयाण, दु 2 वाजता मोताळा तहसिल कार्यालय येथे आगमन व प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत पिक नुकसानीसंदर

No comments:

Post a comment