तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 November 2019

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा व विदर्भासाठी प्रत्येकी 2000 कोटी रुपये स्वतंत्र निधी द्या-अॅड.माधव जाधव

 वै
जनाथ (प्रतिनिधी) :- शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा व विदर्भासाठी प्रत्येकी 2000 कोटी रुपये स्वतंत्र निधी देण्याची मागणी अशी किसान काँग्रेस चे मराठवाडा अध्यक्ष अॅङ माधव जाधव यांनी महामाहीम राष्ट्रपती रामनाथजी कोविंद व महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांचेकडे केली आहे.
भारतिय राज्यघटणेतील कलम 371(2) मध्ये मराठवाडा व विदर्भ विकास महामंडळ स्थापणेसंदर्भात विशेष अधिकार राष्ट्रपती व राज्यपाल यांना दिलेले असताना स्वातंत्र्यानंतर 45 वर्षानी म्हणजे 1995 मध्ये मराठवाडा व विदर्भ विकास महामंडळ स्थापन केली. परंतु आजपर्यंत ही महामंडळे असून नसल्यात जमा आहेत. मराठवाडा व विदर्भ या दोन्ही भागाचा विकास झाला नाही. त्यामुळे वस्तुस्थिती समोर येण्यासाठी महाराष्ट्रात 3 वेळा वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या.( *1) फॅक्ट फायडींग कमिटी ( दांडेकर कमिटी )1984, (2) बॅक लाॅग कमिटी 1997 (3) हाई लेवल कमिटी आॅन बॅलन्सड डेव्हलपमेंट ईश्यूज 2013.या सर्व कमिटींच्या  अहवालात मराठवाडा व विदर्भ भाग मागासलेला असुन विकास दर खुप कमी आहे हे स्पष्ट दिसुन येते. 1984 मध्ये मराठवाडा 22.85% व विदर्भ 35% , सण 1997 मध्ये मराठवाडा 32.37 % व विदर्भ 47% , सण 2013 मध्ये मराठवाडा 37% व विदर्भ 39% विकासापासुण मागे असल्याचे अहवाल दिले.महाराष्ट्र विधीमंडळाने 1983 व 1989 मध्ये ठराव मंजूर करून मराठवाडा व विदर्भासाठी स्वतंत्र मदतीची गरज असल्याबाबत योग्य ती पाऊले ऊचलण्याचा निर्णय घेतला. *महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपालांनी 1994 मध्ये 2476 कोटी रुपये,  सण 2004 मध्ये 4685 कोटी रुपये, सण 2006-07 मध्ये 2480 कोटी रुपये मदतीची गरज असल्याबाबत शिफारशी केल्या. परंतु मा. राज्यपालांच्या शिफारशी विरूध्द मा.मुंबई उच्च न्यायालयात बाळासाहेब  धोंडीराम जगदाळे व ईतर यांनी याचिका दाखल केली. परंतु मा.मुंबई उच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळून लावल्या. व मा.राज्यपालांनी केलेल्या शिफारशी योग्य असल्याचा निर्णय दिनांक 6 नोव्हेंबर 2008 मध्ये दिला.परंतु आजपर्यंत राज्यघटणेतील कलम 371(2) नुसार विषेश कोणतीही भरीव तरतूद केली नाही व त्यामुळे मराठवाडा व विदर्भ कायदेशीर व घटनात्मक हक्क व अधिकारापासुन वंचित राहिले. 
प्रचंड दुष्काळ, अवकाळी पाऊस व वाढती महागाई व बेरोजगारी , निसर्गाची अवक्रपा , अस्मानी व नैसर्गिक  संकट व कर्जबाजारिपणा या सर्व बाबीना कंटाळुन मराठवाडा व विदर्भातील शेतकरी बांधवांनी आत्महत्या करण्यास सुरुवात केली. *गेल्या 6 वर्षात 15000 पेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी आत्महत्या केली. नॅशणल क्राईम रेकाॅर्ड ब्युरो च्या अहवालानुसार हा आकडा 15256 आहे. 
वाढत्या आत्महत्या थांबवण्यासाठी व शेतकरी व शेतमजुर यांच्या हितासाठी *मराठवाडा व विदर्भासाठी प्रत्येकी स्वतंत्र 2000 कोटी रुपये स्वतंत्र निधी तात्काळ ऊपलब्ध करून देण्याची मागणी किसान काँग्रेस चे मराठवाडा अध्यक्ष अॅङ माधव जाधव यांनी महामाहीम राष्ट्रपती रामनाथजी कोविंद व महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी जी यांच्याकडे केली आहे.तसेच विनंती पत्र रजिस्टर पोस्टाने व मेल द्वारे अॅङ माधव जाधव यांनी पाठविले आहे.

No comments:

Post a comment