तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 November 2019

सन 2018-19 चा मंजुर प्रधानमंत्री खरीप पिकविमा तात्काळ द्या ; मोरेवाडी येथील शेतकर्‍यांचे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदनअंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 
सन 2018-19 चा मंजुर असलेला प्रधानमंत्री खरीप पिक विमा परतावा अद्यापही मिळालेला नाही.ओरीएंटल इंन्सुरंन्स कंपनी,दिल्ली या कंपनीकडे मोरेवाडी येथील शेतकर्‍यांनी खरीप पिक विमा काढला होता.तो मंजुर असूनही 90 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी सदर विमा लाभापासुन वंचित आहेत.सदरील शेतकर्‍यांना सन 2018-19 चा मंजुर प्रधानमंत्री खरीप पिकविमा तात्काळ द्यावा.अशा मागणीचे निवेदन मोरेवाडी येथील शेतकर्‍यांनी उपजिल्हाधिकारी यांना शुक्रवार,दि.1 नोव्हेंबर रोजी दिले.


सदरील निवेदनावर अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हणमंतराव मोरे,माजी सरपंच वसंतराव मोरे,ज्ञानोबा चव्हाण,वसंत चव्हाण,गंगाधर मोेरे,उद्धव मोरे,भारत मोरे,अंकुश मोरे, सतिष मोरे,सुदाम मोरे,फुलबंड, मारूतीराव मोरे,गजानन मोरे, सोपान मोरे,नितीन मोरे,सुरेश चौधरी,धर्मराज मोरे,जयपाल मोरे,श्रीरंग मोरे,आत्माराम मोरे,अरूण मोरे,चंद्रकांत मोरे, काकासाहेब मोरे,दिलीप मोरे, लक्ष्मण मोरे, व्यंकटेश मोरे,वसंत शंकरराव मोरे,दत्तात्रय मोरे, रामेश्‍वर मोरे,अ‍ॅड.व्यंकटराव मोरे,वसंत कोळपे,हरिश्‍चंद्र मोरे यांच्यासहीत सुमारे 120 हुन अधिक शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.या प्रश्‍नी प्रशासनाने कोणतही कार्यवाही केली नाही व न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मोरेवाडी येथील शेतकर्‍यांनी दिला आहे.सदरील निवेदन जिल्हाधिकारी,जिल्हा कृषी अधिक्षक,तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी व ओरीएंटल इन्सुरंन्स कंपनी दिल्ली यांना देण्यात आले आहे.
मुदतीत अर्ज सादर करूनही विमा मिळेना

अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथील शेतकर्‍यांना सन 2018-19 चा मंजुर झालेला प्रधानमंत्री खरीप पिक विमा परतावा अद्यापही मिळालेला नाही.या बाबत 16 सप्टेंबर 2019 रोजी कंपनीने दिलेल्या मुदतीत पिक विमा न मिळालेल्या शेतकर्‍यांनी मुळ कागदपत्रासह अर्ज सादर करावेत असे सांगितले होते. सदरील शेतकर्‍यांनी त्यानुसार आपले अर्ज दाखल केलेले आहेत.परंतु,ओरीएंटल इंन्सुरंन्स कंपनीच्या वतीने मुदतीत अर्ज सादर करूनही विमा मिळालेला नाही. तरी तो देण्यात यावा अन्यथा शेतकरी कंपनीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतील.
-हणमंतराव मोरे (व्हाईस चेअरमन,अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना)

No comments:

Post a Comment