तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 November 2019

हत्ता (ना)येथे 25 वर्षीय अनोळखी तरुणीचा संशयास्पद रित्या मृत्युदेह आढळला(विश्वनाथ देशमुख सेनगावकर)

सेनगाव/प्रतिनिधी 
सेनगाव तालुक्यातील हत्ता (ना) गावालगत पुलाखाली पाण्यात दि.01 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी 11 च्या सुमारास अंदाजे 23 ते 25 वर्षीय अनोळखी  तरूणीचा मृत्युदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 
सेनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्ता (ना) ते साखरा रोडवरील हत्ता गावालगत पुलाखाली पाण्यात तरंगत असलेला अंदाजे 23 ते 25 वर्षे वय असलेल्या अनोळखी तरुणीचा मृत्युदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.या अनोळखी तरूणीच्या अंगावर पिवळसर चौकडी निळसर पंजाबी ड्रेस असुन रंगाने निमगोरी व कमरेला काळ्या रंगाचा करदोडा उंची अंदाजे पाच फुट व उजव्या हाताच्या मनगटावर ओम असे गोंदले आहे.या अनोळखी तरूणीचा गळा आवळून जिवे मारले असावे असा दाट संशय व्यक्त केल्या जात आहे.या अनोळखी तरूणीचा मृत्युदेह हिंगोली येथील ग्रामिण रूग्णालयात शितगृह येथे ठेवण्यात आला आहे. अनोळखी तरूणी बद्दल कोनाला माहीती असल्यास सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर (9823184558) किंवा पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव (9923795077) यांच्याशी संपर्क करावा

No comments:

Post a Comment