तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 23 November 2019

‘आरटीओ’ विशेष वाहन तपासणी मोहिम; 273 वाहनधारकांना दंड:-- स्वत: विभागीय आयुक्त व
 जिल्हाधिकारी यांनी दंड ठोठावला

:-- वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन

 बुलडाणा, दि. 23 : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने आज 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात विशेष वाहन तपासणी मोहिम राबविण्यात आली. केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानिमित्ताने जिल्ह्यात आलेल्या विभागीय आयुक्त पियुष सिंग, तसेच दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी स्वत: या तपासणी मोहिमेत सहभाग घेत वाहतुक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनधारकांना दंड ठोठावला. यावेळी स्वत: विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी चलान दिल्या. तसेच वाहनधारकांना वाहतुक नियमांचे पालन करीत वाहन चालविण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे उपस्थित होत्या.
   जिल्ह्यात आज करण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत हेल्मेट न वापरणे, फॅन्सी नंबरप्लेट, अवैध प्रवाशी वाहतूक, विना नोंदणी वाहने, विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, सिट बेल्ट न लावणे, अनुज्ञप्ती सादर न करणे, विमा सादर न करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे या गुन्ह्यांअंतर्गत सदर कार्यालयाने चार पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात खामगांव ते मलकापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व ईतर मार्गांवर एकुन 273 वाहन धारकांवर कार्यवाही केली. तपासणी मोहिमेत बुलडाणा-  चिखली -दे.राजा रस्त्यावर मोटार वाहन निरीक्षक निशिकांत वैद्य, संदीप मोरे, वरिष्ठ लिपिक गजानन तनपुरे, कनिष्ठ लिपिक प्रविण मुंगळे, अनंता सोर यांचा समोवश होता. तर  नांदुरा – खामगांव- कलोरी फाटापर्यंत मोटार वाहन निरीक्षक संदीप तायडे, संदीप पवार, वरिष्ठ लिपीक संतोष घ्यार, कनिष्ठ लिपीक विजय माहुलकर, अमोल खिरोडकर, यांनी तपासणी मोहिम राबविली. तसेच नांदुरा ते मलकापूर रस्त्यावर मोटार वाहन निरीक्षक संताजी बर्गे, अविनाश भोपळे, वरिष्ठ लिपीक सुनील सोळंकी, कनिष्ठ लिपीक राजेश काळे, मिलींद उईके यांनी, तर चिखली – खामगांव महामार्गावर मोटार वाहन निरीक्षक फारूक शेख, वरिष्ठ लिपीक सुनील सुर्यवंशी, कनिष्ठ लिपीक रोहीत काळे यांनी तपासणी मोहिमेत सहभाग घेतला, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment