तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 November 2019

शासकीय कापुस खरेदीचा जिल्ह्यात 2 डिसेंबरला शुभारंभ                                                            
 पर
भणी, दि. 29 :-हंगाम 2019-20 मध्ये परभणी विभागातील शासकीय कापूस खरेदी सीसीआयचे सबएजंट म्हणून कापुस पणन महासंघातर्फे पाथरी व गंगाखेड येथे सोमवार दि.2 डिसेंबर 2019 रोजी केंद्र शासनाच्या शासनाच्या किंमत आधारभूत किमतीनूसार कापुस खरेदीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कापुस शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीस आणावा. असे आवाहन कापुस पणन महासंघ परभणी विभागाचे संचालक पंडितराव चोखट व विभागीय व्यवस्थापक ए.डी.रेणके यांनी केले आहे.
 कापुस खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना अदा करावयाची रक्कम आरटीजीएस, एनईएफटीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तरी चालु हंगामातील कापुस पेऱ्याची अद्यावत नोंद असलेला सातबाराचा उतारा, बँकचे नाव, बँक शाखा, आयएफएससी कोडसह पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधारकार्डची प्रत व शेतकऱ्यांचा बँकेशी संलग्न केलेला मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रे सोबत आणावेत. 
 शासकीय कापुस खरेदी केंद्रावर फक्त एफएक्यु दर्जाचाच कापूस स्विकारण्यात येणार आहे. एफएक्यु दर्जाच्या कापसाला रुई धाग्याची लांबी, तलमता व आर्द्रता यानुसार भाव देण्यात येईल. 12 टक्के पर्यंत आर्द्रता असलेला कापुस स्विकाहार्य असेल तर यापेक्षा जास्त आर्द्रता असलेला कापुस स्विकारला जाणार नाही. असे महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक, परभणी यांनी कळविले आहे.

No comments:

Post a comment