तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 November 2019

मैत्रेय ग्रृप ऑफ कंपनीज विरोधात राज्यात 31 ठिकाणी गुन्हे. 4 अधिसुचनेअन्वये 353 मालमत्ता जप्त

. ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे अर्ज करावे

बुलडाणा, दि. 6 : मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरुध्द महाराष्ट्रात 31 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच शासन स्तरावर 4 अधिसुचनांच्या माध्यमातून 353 मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. इतर नवीन मालमत्तांचा शोध लागला असून शासन स्तरावर अधिुसचना काढून त्या मालमत्ता लिलावाद्वारे विक्री झाल्यानंतर ठेवीदारांना ठेवी परत करण्यात येणार आहे.
  गुन्ह्याचे तपासात सुसुत्रता रहावी. तसेच ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करता याव्यात या उद्देशाने संनियंत्रण समिती अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई यांचे अध्यक्षेतखाली गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी तरुणकुमार खत्री यांची नियुक्ती केली आहे. बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात ए.एम बोडखे, पोलीस निरीक्षक,  आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यासंदर्भातील गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.  ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदारांचे अर्ज आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे स्विकारणे सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व ठेवीदारांनी ठेवी परत मिळण्यासाठी अर्ज आर्थिक गुन्हे शाखे कडे मुदतीत दाखल करावे, असे डी. बी तडवी, पोलीस उप-अधिक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
                                                                                   

--जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment