तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 November 2019

सचिन जाधव युपीएससी उत्तीर्ण ; देशात 49 वा क्रमांक मिळविलापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
केंद्रीय लोकसेवा आयोगा (UPSC) तर्फे घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परिक्षेत येथील सचिन श्रीरंग जाधव हे पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत.त्यांना संपुर्ण भारतातुन 49 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.


सचिन जाधव यांनी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (COEP) येथुन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम शाखेत 2013 साली बीटेक चे शिक्षण पूर्ण केले आहे.त्यानंतर त्यांनी चार वर्षे रिलायन्स जिओ या खासगी कंपनीमध्ये नोकरी केली आहे.रिलायन्स जिओ मधील नौकरीचा राजीनामा देऊन त्यांनी दिल्ली येथे स्पर्धा परिक्षेची तयारी केली.दीड वर्षाच्या कठोर मेहनतीच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.सचिन जाधव हे सध्या नागपूर येथील पेटंट परिक्षण कार्यालयात गट 'अ’ राजपत्रित पदावर काम करतात.सचिन हे परळी पंचायत समिती मधील शाखा अभियंता श्रीरंग तोळाराम जाधव यांचा मुलगा आहे.सचिन आपल्या यशाचे श्रेय आई- वडील,बहिणी,गुरूजन वर्ग व कुटुंबियांना देतात.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a comment