तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी करा - बाजीराव धर्माधिकारी नोंदणीची 5 नोव्हेंबर अंतिम तारीखपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नावनोंदणीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. पदवीधरांनी आपला मतदान हक्क बजावण्यासाठी ही मतदार नावनोंदणी आवश्यक आहे. तरी अधिकाधिक पदवीधरांनी आपली मतदार नोंदणी करून घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे. 
     औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार नाव नोंदणी सुरू आहे. 5 नोव्हेंबर नोंदणी ची अंतिम तारीख आहे. यासाठी १ नोव्हेंबर २०१६ पुर्वीचे पदवीधर असणे आवश्यक आहे.पदवी प्रमाणपत्र किंवा अंतिम वर्षाची मार्कशीट झेरॉक्स प्रत. पासपोर्ट साईज फोटो.मतदार ओळखपत्र झेरॉक्स प्रत.आधार कार्ड/ रेशन कार्ड/ रहिवाशी दाखला/ लाईट बिल यापैकी एक अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.  
      नाव नोंदणीसाठी सुनील चव्हाण 9403717777,अनंत ईंगळे 982257 6003, श्रीकांत माने 9422416222 यांच्याशी संपर्क साधावा. अधिकाधिक पदवीधरांनी आपली मतदार नोंदणी करून घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a comment