तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 November 2019

500 युवकांचा रक्तदानाचा संकल्प
सीएससी व्हीएलई सोसायटी व एचडीएफसी बँकेच्या वतीने आज वाशीम येथे रक्तदान शिबिर

फुलचंद भगत
मंगरुळपीर:-  रक्तदानाचे महत्व पाहता सामाजिक योगदान म्हणून सीएससी व्हीएलई सोसायटी व एचडीएफसी बँकेच्या वतीने आज वाशीम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन चेतन बांगर सेंटर हॉल वाशीम येथे करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन  सर्व व्हि एलई  धारकांना करण्यात आले असून रक्तदान करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. जवळपास 500 युवकांनी याप्रसंगी रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. 
रक्तदान हे श्रेष्ठ दान असून भारतातील हजारो युवक स्वयंस्फूर्तीने रक्तदान करीत असतात अनेक ठिकाणी गरजू रूग्णांना रक्तदान करता यावे यासाठी युवकांनी रक्तदान समूह स्थापन केले आहेत.
रक्तदानाचे महत्व पाहता सीएससी व्हीएलई सोसायटी व एचडीएफसी बँकेच्या वतीने आज सकाळी 10 ते 4 वाजता दरम्यान नवीन आरटीओ कार्यालयासमोर चेतन बांगर सेंटर हॉल वाशीम येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात वाशीम जिल्यातील सर्व 
सीएससी व्हीएलई व एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनी सहभागी व्हावे असे आवाहन 
सीएससी व्हीएलई सोसायटीचे अध्यक्ष सागर पाटील मैसने यांनी केले आहे.
या कार्यक्रसाठी 
ई गव्हर्नरनन्स चे जिल्हा व्यवस्थापक भगवंत कुळकर्णी, एचडीएफसी बँकेचे वाशीम व्यवस्थापक हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सागर पाटील मैसने यांनी दिली आहे.
रक्तदानाच्या माध्यमातून देश सेवा करण्याची महत्त्वपूर्ण संधी असून रक्तदात्यांनी रक्तदानात सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a comment