तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 23 November 2019

50वे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात अमिताभ बच्चन च्या हस्ते ; रजनीकांत यांना ‘आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबली अवॉर्ड’ने सन्मानित


मुंबई (प्रतिनिधी) :-
 आशियातील सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवाचे अर्थात इफ्फी महोत्सव-2019चे उद्‌घाटन गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर उद्यापासून रंगणार असून, या महोत्सवाचे हे 50 वे ऐतिहासिक वर्ष आहे. या महोत्सवाचे गोव्यातील पणजी इथे बांबोलिम येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये उद्या दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा उद्‌घाटन सोहळा होणार आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.


या शानदार महोत्सवासाठी पणजी सज्ज झाली असून, उद्‌घाटन समारंभाला प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि या महोत्सवाचे ‘आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबली ॲवॉर्ड’ या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी प्राख्यात अभिनेते रजनीकांत उपस्थित राहणार आहेत. तसेच जोहनाथन रेयेस नेयर्स हे बेकहॅम स्टार सुद्धा उपस्थित राहणार असून, बॉलिवुडचे दिग्दर्शक करण जोहर यजमान पद भूषवणार आहेत.

या उद्‌घाटन समारंभाला भारत सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, सचिव अमित खरे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उद्‌घाटनपूर्व पत्रकार परिषदेला संबोधित करतांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, महोत्सवाच्या ठिकाणी सर्व व्यवस्था सुसज्ज आहे. यावर्षीच्या महोत्सवाचे महत्व विषद करतांना ते पुढे म्हणाले की, जवळपास 9300 चित्रपट सृष्टीतील प्रतिनिधी या महोत्सवाला उपस्थित राहणार असून, त्यापैकी 7 हजार प्रतिनिधींची उपस्थिती निश्चित झाली आहे. मागील वर्षाच्या चित्रपट प्रतिनिधींच्या तुलनेत यावर्षी 35 टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

गोवा कला महाविद्यालयाच्या 200 विद्यार्थ्यांनी यंदा पहिल्यांदाच ‘गोवा आर्ट माईल’ या आर्ट इन्स्टॉलेशन कार्यक्रमात भाग घेतल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

यंदा प्रथमच मिनी-मूव्ही-मॅनिया या लघु चित्रपट स्पर्धेत भाग घेण्याची संधी चित्रपट निर्मात्यांना मिळणार आहे. यात राष्ट्रीय पातळीवर 10 पुरस्कार देण्यात येणार आहेत. स्थानिक चित्रपट निर्मात्यांना विविध प्रकारांमध्ये 20 पुरस्कार मिळतील. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर 352 तर स्थानिक पातळीवर 110 चित्रपटांचा सहभाग आहे.

चित्रपट महोत्सव संचालनालयाचे, महोत्सव संचालक चैतन्य प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की या महोत्सवाची संपूर्ण आखणी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सातत्याच्या देखरेखीखाली करण्यात आली. या आखणीत जुन्या नव्या चित्रपटांचा अपूर्व संतुलित मिलाप दिसतो शिवाय काही चित्तवेधक मास्टर क्लासेस आणि चर्चांचे कार्यक्रमही आखण्यात आले आहेत.

यंदाच्या इफ्फीतील तिकीट विक्रीची सुविधा तपशीलाने सांगतांना गोवा मनोरंज सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतिजा म्हणाले की, यंदा प्रथमच तिकीट विक्री ‘ पेपर लेस’ असणार आहे. प्रतिनिधींच्या कार्डावरच ही माहिती नोंदवली जाईल. तिकीटांचे तपशील एसएमएस आणि ईमेल द्वारे पाठवण्याची सोय करण्यात आली आहे. प्रवेश द्वारावरच बारकोड रिडरद्वारा कार्डचे वाचन होऊन प्रतिनिधींना प्रवेश मिळेल. ऑनलाईन तिकिटे 48 तास आधी सुरु होतील, तर खिडकीवरील वितरण दरदिवशी सकाळी सात वाजता सुरु होईल. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काऊंटर्स असतील. आयनॉक्स आणि पर्वरीतील चित्रपटगृहांना पोहचण्यासाठी मोफत वाहतुकीच्या सोयीही पुरवण्यात येणार आहेत.

फ्रेंच चित्रपटांचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री इसाबेला ह्युपर्ट यांना उद्‌घाटन सोहळ्यात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ह्युपर्ट यांनी 120 चित्रपटांहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला असून, सीझर पुरस्कारासाठी 16 नामांकनासह या पुरस्कारासाठी सर्वाधिक नामांकने मिळवणाऱ्या त्या अभिनेत्री आहेत.

अधिकृत घोषणेबरोबरच उपस्थितांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. शंकर महादेवन यांचे सांगितिक सादरीकरण हे खास आकर्षण ठरेल.काय आहे @ इफ्फी 50 मध्ये

इफ्फी 50 मध्ये उपस्थितांना जगातल्या 76 देशांमधले 200 सर्वोत्तम चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच 35 मास्टर क्लासेसमधून चित्रपट निर्मितीचे विविध कंगोरे समजून घेता येणार आहेत.

या महोत्सवात रशियातील 8 चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

या महोत्सवाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी या वर्षीच्या कार्यक्रमांमध्ये 2 विशेष विभागांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सुवर्ण मयूर विजेत्या चित्रपटांचे सिंहावलोकन करणाऱ्या विभागाचा समावेश आहे. या विभागात यापूर्वी सुवर्ण मयूर पुरस्काराने सन्मानित चित्रपटांचा तसेच 2019 मध्ये ज्या भारतीय चित्रपटांना 50 वर

No comments:

Post a comment