तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 November 2019

परळीत 55 हजार शेतकऱ्यांचे कृषी कार्यालयात अर्ज दाखल- तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवनेपरळी वैजनाथ(प्रतिनिधी) :- परळी तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन शासनाकडुन नुकसान भरपाई मिळावी म्हणुन तालुका 
कृषी कार्यालयात 55 हजार शेतकऱ्यानीं अर्ज दाखल केले अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवने यांनी दिली आहे.

             तालुक्यातील पाच महसुल मंडळात 68 हजार 193 हेक्टरवर पेरणी झाली होती त्यात सोयाबीन,कापुस, मुग,बाजरी,
मका अशी पिके शेतकऱ्यांनी पेरली होती. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता,तोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला असुन निसर्गाच्या माऱ्यापुढे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतात काढुन ठेवलेल्या सोयाबीनला कोबें फुटले तर बुचडे मारून ठेवलेली बाजरी काळी निळी पटली आहे. कापसाच्या बोंडाच्या वात्या झाल्या असुन मक्याचे पिकं भुईसपाट झाली आहे. तसेच मुग तर पावसाच्या माऱ्यामुळे होत्याचा नव्हता झाला आहे. सदर पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असुन शासनाकडुन पिकांच्या नुकसानीची भरपाई  मिळावी या साठी तालुका कृषी कार्यालयात तीन ते चार दिवस शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केली होती त्यात एकुण 55हजार शेतकऱ्यानीं नुकसान भरपाईचे अर्ज दाखल केले.  असल्याची माहिती तालुकाकृषी अधिकारी अशोक सोनवने यांनी दिली आहे.

No comments:

Post a comment