तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 November 2019

परळीत 55 वर्षीय महिलेची आत्महत्या चोरीचा आरोप झाल्याने विष प्राशन केल्याचा नातलगांचा आरोप


परळी(प्रतिनिधी)
शहरातील  स्नेह नगर भागात राहणाऱ्या व घरकाम  करत उपजीविका करणार्या 55 वर्षीय महिलेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज घडली.सदरील महिलेवर चोरी केल्याचा आरोप झाल्यानेच विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचा आरोप नातलगांनी करत महिलेचे शव संभाजीनगर पोलिस ठाण्यापुढे आणुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
या प्रकरणी मयत महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरुन एका महिलेविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 परळी शहरातील स्नेहनगर भागातील छबुबाई नारायण पाचमासे वय 55 वर्षे ही महिला धुनी भांडी करत उपजीविका भागवत होती.ती अनेक घरात हे काम करत असे.दि.29 ऑक्टोबर रोजी पाय घसरुन पडल्याने ती कामावर जावुन शकली नाही यानंतर घरकाम करत असलेल्या ठिकाणुन एक महिला येवुन तु आमच्या घरी कामावर चल नाहीतर तुझ्यावर चोरीचा आरोप करुन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करु अशी धमकी दिल्याने छबुबाई यांनी दि.7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 8 वा.विषारी औषध प्राशन केले.त्यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन दि.8 रोजी पुढील उपचारासाठी स्वा.रा.ती.रुग्णालय अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले परंतु दि.8 रोजी सायंकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.माझ्या आईवर चोरीचा आरोप केल्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयत छबुबाईचा मुलगा दिलीप नारायण पाचमासे यांनी दिली असुन या फिर्यादीवरुन मंजुबाई गणेश पुजारी यांच्याविरुध्द कलम 306,323,104 भा.द.वि. प्रमाणे परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन  आरोपींचा शोध घेवुन अटक करावी अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a comment