तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 November 2019

आता आमच्याच जीवन -मरणाचे पंचनामे करा ! संतप्त शेतकरी वर्गातून भावनिक प्रतिक्रिया

फुलचंद भगत
वाशिम-परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असुन मदतीसाठी शेतकरी शासनाचे ऊंबरठे झिजवत असुनही शासनाला शेतकर्‍यांची हाक येकु येत नसेल का?की निवडणुकीपुरताच पुढार्‍यांना शेतकरी आठवतो?हा प्रश्न सध्या समस्त वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पडलेला आहे.अशा संकटसमयी शेतकर्‍यांना शासनाने मदतीचा हात द्यावा अशी शासनाकडे मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.
              विधानसभेच्या निवडणूका झाल्या तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही .सरकार तुमचे की आमचे यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे .सत्ता स्थापनेच्या नादात इकडे शेतकरी जगतोय की मरतोय याकडे गंभीरतेने पाहिला जात नाही.आधीच विविध बाबतीत पिळलेला बळीराजा हातातोंडाशी आलेली पिकं गेले ;आणी आता उरली सुरली पिकं परतीच्या पावसाने पळवून नेली आहेत .त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे . आम्ही आता जगायचे तरी कसे ? अशा परिस्थित हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची आणी आधाराची गरज असतांना सरकार कडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य लाभत नाही . त्याचप्रमाणे मिळणाऱ्या तोकड्या नुकसान भरपाईने आपल्या कुठूंबाचा उदनिर्वाह चालणार नाही या भितीपोटी आता आमच्याच जीवन -मरणाचे पंचनामे करा अशी संतप्त शेतकरी वर्गातून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे .
सोयाबिनसह अन्य पिके ऐन कापणीच्या वेळेत वादळी वाऱ्यासह आणी विजेच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने पिकांची वाटच लावली आहे. त्यामुळे याआधीच शेतकऱ्यांच्या मानेवर संकटांचा डोंगर असताना आणखीन संकट वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत .
    दरम्यान शेतकऱ्यांसह जनावरांवरही उपासमारीची वेळ आली असून चारा टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे . वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने धुमाकुळ घातल्यामुळे डोंगरमाथ्यावरील गवत चारा जमिनीवर लोदळल्याने कुजला आहे ;तर सोयाबिन कापणी  दरम्यान पावसात भिजल्यामुळे कुजले आहे . परिणामी जनावरांच्या उन्हाळी चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून जनावरांची देखील उपासमार होणार असल्याच्या भितीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे .
    सध्या बळीराजा नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याच्या प्रतिक्षेत असला तरी पिकांच्या पंचनाम्यानंतर प्रशासनाकडून मिळणाऱ्या तोकड्या नुकसान भरपाईने झालेल्या नुकसानीची पोकळी भरून निघणार नाही याची पुरेपूर कल्पना बळीराजाला आहे . त्यामुळे बळीराजा आणखीनच चिंताग्रस्त झाला आहे .
     रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून रक्ताचा घाम गाळूनही हातातोंडाशी आलेली पिकं कधी ओल्या तर कधी कोरडया दुष्काळात वाया जातात . कधी महापूरात वाहून जातात तर कधी अवकाळी -गारपिठात झडून जातात . कधी _ कधी वन्यजीवांकडुन फस्त होतात तर कधी रोग किडीच्या प्रादूर्भावात नष्ठ होवून जातात . वर्षानुवर्ष या ना त्या कारणाने पिकांचे नुकसान होतच आहे .
     बळीराजाच्या संकटात वर्षानुवर्ष वाढ होत आहे . पण कितीही संकटे आली तरी देखील संकटांना समोरे जात शेती पिकवत आहे . स्वताच्या कुटूंबासह जगाच्या पोटची खळगी  भरत आहे ;मात्र पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेती व्यावसाय धोक्यात असल्याचे चित्र बळीराजाला दिसत असल्यामुळे आणि कर्जाचा डोंगर  वाढल्यामुळे बळीराजाला जीव नकोसा झाला आहे .पण अशाही परिस्थीतीत खंबिर राहून जीवन जगावे,शासनानेही शेतकर्‍यांना मदत करुन दिलासा द्यावा असे आवाहन सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a comment