तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 November 2019

अपशब्द वापरणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी - अनिल राठोडसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १७ _ हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांच्या बाबतीत हलकट असे अपशब्द लिहुन तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या असल्या बाबत विश्वंभर पवळे याला लवकर अटक करण्यात यावी असे मत युवा नेते अनिल राठोड व राहुल मोटे यांनी व्यक्त केले.
       महाराष्ट्रातील माजी मुख्यमंञी वसंतरावजी नाईक साहेबांनी आकरा वर्षे राज्य गाजवले आहे. १९७२ मध्ये वसंतराव नाईक साहेबांनी हरित क्रांती घडवून आणली. माजी मुख्यमंञी वसंतराव नाईक साहेब यांंच्या बाबतीत फेसबुक वर आक्षेप करणारे मस्तवाल विश्वंबर व्यंकटराव पवळे, चिखलीकर ता.कंधार जि.नांदेड येथिल रहिवाशी असुन माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक साहेबांनी फक्त बंजारा समाजाला नाहीतर सर्व जाती धर्मातील सर्व समाज बांधवांना सोबत घेवून विकासाची कामे केली व सर्व जनतेला न्याय मिळवुन दिला. वसंतरावजी नाईक साहेबांच्या बंजारा समाजाविषयी हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भुषविनारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्यावर फेसबुक माध्यमावर अपमानास्पद पोस्ट टाकल्यामुळे बंजारा समजासहित तमाम नाईक सहेबावर प्रेम करणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या असल्यामुळे आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गेवराई पोलीस स्टेशन येथे विस्वंभर चिखलीकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी म्हणुन निवेदन देण्यात आले.
           यासंबंधी पोस्ट टाकणाऱ्या आरोपीवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कठोर भुमिका घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा ही यावेळी प्रशासनाला देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शहर उपाध्यक्ष) राहुल मोटे, अनिल राठोड (खोला), ज्ञानेश्वर राठोड, अनिल राठोड, कन्हैया येवले, अविनाश पवार, रामा गायकवाड, सचिन पवार आदी उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment