तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 November 2019

परळी उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज किसान सभेच्या वतीने तीव्र निदर्शनेपरळी वैजनाथ (प्रातिनिधी) :- 

परतीच्या पावसाने परळी तालुक्यातील शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना   प्रशासनाने सरसकट आर्थिक मदत करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने परळी येथील उपविभागीय कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी मागण्याचे निवेदन प्रशासनाला दिले.  

परतीच्या पावसाने तालुक्यातील  शेतीतील पिकाचे खुप मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील बाजरी, ज्वारी, तीळ, सोयाबीण ,कापुस यासह खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  सुरूवातीला  पाऊस न पडल्यामुळे पेरणी ऊशिरा करण्यात आली . कसेतरी थोड्याफार  पावसावर सोयाबीन व कापुस हे पिके आली होती . पण अचानक परतीचा पाऊस जास्त झाल्याने शेतीतील पिकांचे खुप मोठया प्रमाणावर नुकसान झाले . सोयाबीण तर झाडावरच ऊगऊ लागले तर पांढरे सोन्याच्या वाती झाल्या . त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात आला आहे. प्रशासनाने संकटग्रस्थ शेतक-यांच्या शेतीसंबंधी झालेल्या नुकसाणीची शासकीय स्तरावर पंचनामे करावेत. पंचनामे करताना काढलेल्या व ऊभ्या पिकाचे झालेले नुकसान पहावे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंचनामे करताना संवेदना दाखउन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळऊन देण्याचा प्रयत्न करावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत शासनाने द्यावी. तसेच मागच्या वर्षी च्या खरीपाच्या पिकाचे विमा तात्काळ वाटप करावे यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर किसान सभेच्या वतीने परळी येणार उपविभागीय कार्यालया समोर शुक्रवार ता. 8 रोजी दुपारी  तीव्र निदर्शने करण्यात आली.  या आंदोलनात  किसान सभेचे जिल्हाध्यक्ष काॅ. मुरलीधर नागरगोजे, काॅ. अजय बुरांडे, काॅ. सुदामदादा देशमुख, काॅ, सुदाम शिंदे आदींनी व तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment