तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 November 2019

शेतकऱ्यांना सरसकट तातडीने मदत द्या ; मालेवाडी येथील शेतकऱ्यांचा गतवर्षीचा पिक विमा तात्काळ वाटप करा-त्रिंबक बदने
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. संपूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. तालुक्यातील सर्वाधिक घेतल्या जाणारे सोयाबीनची पिकाची काढणी सुरु असताना पावसामुळे अर्धवट सोडावी लागली. शेतात उभी सोयाबीन सडून खराब झाली, तर सुड्या घालून ठेवलेल्या सोयाबीनमध्ये पाणी घुसल्याने सोयाबीनला कोंब फुटले, शिवाय मका, ज्वारी, शाळू च्या कणसांनाही कोंब फूटून संपूर्ण पीक वाया गेले आहे. घाटातील कपाशीची बोंडे काळे पडून कपाशीचेही प्रचंड नुकसान झाले.  शासनाने शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन पिकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. किमान हेक्टरी एक लाख रुपयांची सरसकट तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी त्रिंबक बदने यांनी केली आहे. परंतु मालेवाडी गावातील शेतकऱ्यांचा 2018-19 चा खरीप व रब्बी हंगामातील गतवर्षीचा पिक विमा अद्याप मिळाला नाही. पीक विमा कंपन्यानी तात्काळ द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

     परळी तालुक्यात प्रचंड प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचले आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे.  याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्याच्या हातात आलेली सुगी वाया  गेली आहे. या पावसाने झालेल्या नुकसानी मुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानभरपाईचे तात्काळ पंचनामे करावेत. तसेच  तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावातील शेतकर्‍यांना खरीप पिक विमा 2018-19 चा लाभ मिळाला आहे. मौजे मालेवाडी ग्रामस्थ अद्याप यापासुन वंचित असल्याचे बदने यांनी म्हटले आहे. तसेच पिक विमा तात्काळ वाटप करण्याची मागणी ऑरिएंटल इंन्शुरन्स लि.कंपनीला शेतकऱ्यांनी वेळोवेळी निवेदनाद्वारे केली आहे. यापुर्वी मालेवाडी अतर्गत दत्तवाडी हे गाव अंबाजोगाई तालुक्यात येत होते. परंतु आता परळी तालुक्यात आले आहे. खरीप पिक विमा 2018 च्या शेतकर्‍यांना बँकद्वारे वाटप करुन लाभ मिळाला नाही. सततच्या दुष्काळी परिस्थती व आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान केले आहे. अशा परिस्थतीत मालेवाडी गावातील शेतकर्‍यांना अद्याप पिक विम्याच्या अनुदानाचा लाभ मिळाला नाही. ऑरिएंटल विमा कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकांना शेतकऱ्यांनी वेळोवेळी निवेदन सादर करून देखील कारवाई झाली नाही. अनेक वेळा सरपंच सौ.वैशाली बदने यांनी ही  एका निवेदनाद्वारे खरीप पिक विमा 2018 चा लाभ देण्याची मागणी केली आहे. परंतु  तालुक्यतील असे अनेक शेतकरी आहेत. जे पिक विम्याची प्रतिक्षा करीत आहेत. परळीतील कृषी कार्यालयात या संदर्भातील शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या आहेत.  सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी काढणीस आलेल्या सोयाबीन ,हायब्रिड, बाजरी, पिवळा, वेचणीस आलेल्या कापसाचे व अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटामुळे वारंवार शेतकरी आर्थिक समस्याला तोंड देत आहे. या वर्षी सुरवातीला पावसाने उगाड दिली होती. परंतु परतीच्या पावसाने मात्र शेतकऱ्याच्या हाता तोंडाला आलेला घास पळविला आहे शेतकऱ्याला या आर्थिक विवेचनेतून बाहेर काढण्या साठी शासनाने हेक्टरी एक लाख रुपये व उर्वरित पिक विम्याची रक्कम तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकरी त्रिंबक बदने यांनी केली आहे.  कृषी कार्यालय, विमा कंपन्या, प्रशासनाने नेही शेतकर्‍यांना तात्काळ विम्याचे व नुकसान भरपाई अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

No comments:

Post a comment